Viral Video: मालक पडला पाण्यात, कुत्र्यांनी असं काही करून मालकाला वाचवलं; बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..

Viral video: आजकाल जिवाभावाची माणसं अडचणीच्या काळात साथ सोडून गेलेली, आपण पहात असतो. काहीही होऊदे मी आहे, असे बोलणारे मित्र देखील जेव्हा गरज असते, तेव्हा गायब होतात. आपण अडचणीच्या काळात ज्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, असे लोक देखील अडचणीच्या काळात आपली साथ देत नाहीत. एवढंच काय तर ज्या आई बापाने मुलांना जन्म दिला, लहानाचे मोठे केले, आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट पुरवलेली असते, तीच मुले आपल्या आई बापाला तुम्ही आमच्यासाठी काय केले? असे विचारतात. बरीच मुलं म्हातारपणी आपल्या आईबापाला वृद्धाश्रमात ठेवतात. (Viral Video: Seeing the love of a dog for its owner will bring tears to the eyes, the owner fell into the water and something that dogs did..)

हे सगळं पाहिल्यानंतर वेळ आल्यावर आपले कोणीच नसते, असे वाटते. आजकाल सख्खे भाऊ एकमेकांचा जीव घेऊ लागले आहेत. आईबापाला देखील मारहाण करणारी मुले या समाजात पाहायला मिळतात. ज्या मित्रावर जीव तोडून प्रेम केले, असे मित्रदेखील आपल्याच मित्राचा काटा काढल्याच्या घटना आपण पहिल्या असतील. मित्राच्याच पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन, मैत्रीचा घात केल्याच्या देखील घटना आपण पाहिल्या असतील. एवढच काय तर सख्या भावाच्या बायकोशी देखील अनैतिक संबंध ठेवणाऱ्या घटना आपण बघितल्या असतील.

तुम्ही जर अगदी इतिहासात जाऊन पाहिले तर, तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळच्या बऱ्याच नातेवाईकांनी महाराजांची साथ दिली नाही. महाराजांच्या रक्ताच्या नात्यांनी देखील महाराजांना अडचणीत आणलेले आपण पाहिले असेल. अगदी सध्याच्या काही राजकीय घडामोडी पाहिल्या तरीदेखील तुमच्या लक्षात येईल. आज एका पक्षात असणारे नेते, ज्यांच्या हातात सर्व सूत्रे पक्षाच्या प्रमुखांनी दिली होती. त्याचाच फायदा घेत कित्येक आमदार घेऊन गटबाजी करून, आपल्याच पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले. मग अशावेळी विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित होतो.

कुत्र्याच्या इमानदारीच्या बऱ्याच घटना तुम्ही वाचल्या असतील. कुत्र्या एवढं इमानदार कोणच नाही, असे वारंवार आपण ऐकत असतो. मालकाचा जीव वाचवण्यासाठी अनेक कुत्र्यांचा जीव गेलेला आपण बघितले असेल. मालक झोपेत असताना मालका जवळ साप आल्यानंतर त्याला प्रतिकार करून स्वतःचा जीव देणारा आणि सापाला बळी घेणारा कुत्रा देखील आपण पाहिला असेल. अशा घटनांमुळे कुत्र्याएवढं इमानदार कोणच नाही, हे सिद्ध होत असते. कुत्र्याला ज्या ठिकाणी खायला प्यायला मिळते. त्या कुटुंबाची सेवा कुत्रा एवढा मनोभावे करतो की मालक देखील कधीकधी अवाक होतो.

कुत्र्याच्या मालकावरील प्रेमाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओला प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या व्हिडिओ मध्ये मालक पाण्याच्या कडेला झोका घेऊन पाण्यात पडत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसत असल्या प्रमाणे छोटासा तलाव वाटत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती पडताना पाहायला मिळत आहे. पाण्याच्या मध्यभागी झोका घेऊन पडल्यामुळे काठावर असणारे त्यांचे दोन कुत्रे सैरभैर होताना पाहायला मिळत आहेत.

त्यानंतर पाण्यामध्ये एक कुत्रा उतरून मालकाचा वाचवण्यासाठी धावपळ करत मालकाजवळ पोहोचताना पाहायला मिळत आहे. काळया रंगाचा कुत्रा प्रचंड वेगाने पाण्यात अंतर कापत पोहोचताना पाहायला मिळत आहे. अगदी कुठलीही चिंता न करता, तो वेगात पोहोचत मालकाजवळ पोहोचतो. तर दुसरा पांढऱ्या रंगाचा कुत्रा डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारत मालकाजवळ पोहोचतो. ज्यावेळी त्यांना समजते की, आपला मालक सुरक्षित आहे, त्यावेळी मग दोन्ही कुत्रे सुटकेचा श्वास घेताना पाहायला मिळतात. यातून मालकावर कुत्र्यांचा किती जीव आहे, हे समजते. आजकाल काही दुर्घटना घडली की, बघे लगेच खिशातून मोबाईल काढून व्हिडिओ काढताना पाहायला मिळतात. हेही वाचा: Wedding Tips: लग्न करण्यासाठी मुली मुलांमध्ये बघतात या पाच गोष्टी, जाणून घ्या लगेच नाहीतर पुन्हा लग्नाला अडचण..

या व्हिडिओवर (Viral Video) सीमा राजुळे म्हणतात, मालका विषयी किती प्रेम, आपुलकी आणि काळजी असते या मुक्या जीवांना स्वतःच्या जीवाचा विचार न करता मालकाला वाचवण्यासाठी दोन्ही श्वानांनी उडी घेतली, स्वतःच्या पोटची मुले देखील एवढा जीव आपल्या मुलांवर लावणार नाहीत. तर मनीषा पवार – सकपाळ म्हणतात, खरं आणि निस्वार्थ प्रेम पाहिजे असेल तर खरंच घरी एखादा तरी प्राणी पाळावा…, याच उत्तम उदाहरण समोर आहे. महादेव कोथळे यांना या निमित्ताने दादा कोंडके यांची आठवण येते. ते म्हणतात, हा व्हिडिओ बघून मला दादा कोंडके याचं वाक्य आठवलं, माणसा परास मेंढर बरी, पण इथे सगळंच उलट आहे; माणसापरास कुत्री बरी. हेही वाचा: Electricity Tower: शेतातून विजेची लाईन गेली असेल, तर मिळते तब्बल एवढी रक्कम; असा घ्या लाभ..

एखादी व्यक्ती कितीही अडचणीत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवण्याची प्रथा समाजात रुजू होत आहे. एखादी दुर्घटना घडली असेल तर खुशाल खिशातून मोबाईल काढून लोक व्हिडिओ बनवत बसतात. आपला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हावा, अशी अपेक्षा या भावनाशून्य लोकांची झालेली असते. खरंतर एखादी व्यक्ती अडचणीत सापडली असेल, एखादी दुर्घटना घडली असेल तर माणूस म्हणजे जागे होऊन, त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याला अर्थ राहील.

व्हिडिओ लिंक: https://www.facebook.com/reel/788381015520067?fs=e&s=cl&flite=scwspnss

 हेही वाचा: Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा.. 

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी.. 

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी.. 

Children’s Health: मुले आणि मुली वयात आल्यानंतर त्यांच्यावर होतात हे परिणाम, जाणून तुम्हालाही धक्का बसेल.. 

Wedding Tips: लग्न करण्यासाठी मुली मुलांमध्ये बघतात या पाच गोष्टी, जाणून घ्या लगेच नाहीतर पुन्हा लग्नाला अडचण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.