Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

0

Aadhar card: आधारकार्ड हे प्रत्येक माणसाची ओळख बनले आहे. सरकारी काम असो किंवा खाजगी आधारकार्ड हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर आधारकार्ड हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग बनलं आहे. आधारकार्ड वेवस्थित राहावं यासाठी नेहमी काळजी घेतली जाते. मात्र आधारकार्ड विषयी अजूनही अनेकांना फारशी माहिती नसल्याचे पाहायला मिळते. यापैकीच एक म्हत्वाची बाब म्हणजे, आधारकार्डची एक्सपायरी डेट.

अनेकांना आधारकार्डला एक्सपायरी डेट असते, हे माहिती नाही. ज्या प्रमाणे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डला एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे, आधारकार्डला देखील एक्सपायरी डेट असते. जसे की आपल्याला माहीत आहे, आधारकार्डचा क्रमांक हा बारा अंकी असतो. अनेकांचा हा बारा अंकी नंबर पाठ देखील असेल. मात्र तुमच्यापैकी अनेकांना आपल्या आधारकार्डची एक्सपायरी डेट माहिती नसेल, तुम्हाला देखील तुमच्या आधारकार्डची एक्सपायरी डेट जाणून घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला या विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.

या पद्धतीने आधारकार्डची वैधता तपासा

प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांसाठी uidai कडून वेगवेगळी आधार कार्ड दिली जातात. जर तुमचे वय हे पाच वर्षाहून कमी असेल, तर तुमच्या आधारकार्डची वैधता पाच वर्षापर्यंत असते. मात्र जर तुम्ही प्रौढ असाल, तर मात्र तुमच्या आधारकार्डची वैधता ही तुमच्या आयुष्यमान एवढी असते. ज्या मुलांचे वय पाच वर्षाहून कमी आहे, अशा मुलांना निळे आधारकार्ड दिले जाते. आता आपण आधारकार्डची वैधता कशी तपासायची हे पाहूया.

या सोप्या पद्धतीने तपासा आधारकार्डची वैधता

जर तुम्हाला तुमच्या आधारकार्डची वैधता किती आहे, हे तपासायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोमवर जाऊन https://uidai.gov.in/  असं सर्च करणं आवश्यक आहे. तुम्ही क्रोमवर जाऊन https://uidai.gov.in/ असं सर्च केल्यानंतर, तुमच्या समोर युआयडीएआयची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. या नंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.

होमपेज ओपन झाल्यानंतर, तुम्हाला ‘आधार सेवा’ हा पर्याय दिसेल. आधार सेवा पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्याच्यासमोर “Verify Aadhar number” हा पर्याय ओपन होईल, तुम्हाला बरोबर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. Verify Aadhar number” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर तुम्हाला तुमचा आधारकार्ड नंबर टाकायचा आहे.

आधारकार्ड नंबर टाकल्यानंतर, समोर दिसणारा कॅपच्या कोड तुम्हाला वेवस्थीत टाकून, Verify या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथपर्यंत वेवस्थित प्रोसेस केल्यानंतर, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला आधारकार्डची सर्व डिटेल्स पाहता येणार आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्ष्यात घेण्याची गरज आहे ती म्हणजे, तुमच्या आधारकार्डला जो मोबाइल नंबर लिंक आहे, त्याच मोबाइल नंबरवरून ही सगळी प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे.

हे देखील वाचा लहानपणीच मुलांना या पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

आधार कार्डवर जन्मतारीख चुकीची असल्यास घेता येणार नाही या योजनांचा लाभ; या सोप्या पद्धतीने बदला जन्मतारीख.. 

आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने चुटकीसरशी घरबसल्या डाऊनलोड करा..

घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पॅन कार्ड कसं काढाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.