Viral video: भल्यामोठ्या सिंहावर कुत्र्याने पाठलाग करून केला हल्ला; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित..
Viral video: सोशल मीडियावर (social media) प्राण्यासंदर्भातले रोज नवनवीन व्हिडिओ तुफान व्हायरल (video Viral) होत असतात. सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सिंह, (lion) वाघ (tiger) चित्ता, (leopard) मगर, हरीण यांसारखे अनेक प्राणी एकमेकांची शिकार करताना आपण पाहिले असतील. या हिंस्र प्राण्यांचे व्हिडिओ पाहताना अनेकदा आपल्या काळजाचे पाणी होते. तर कधी काळजाचा थरकाप उडविणारे व्हिडिओ देखील आपण पाहिले असतील. मात्र सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्ही अचंबित व्हाल.
अपनी गली में कुत्ता भी शेर होता है! असं का म्हणतात? हे तुमच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लक्षात येईल. वास्तविक पाहता सिंहाने एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवलं तर, तो हमकास शिकार करतोच करतो. सिंहाने जर एखाद्या प्राण्याची शिकार करायची ठरवली आणि त्याच्या जबड्यात एखादा प्राणी सापडला, तर देव जरी आला तरी, सिंहाच्या तावडीतून त्या प्राण्याला वाचवू शकणार नाही. सिंहाच्या नादी कोणी लागलं, तर नवलच होईल.
जंगलात सिंह दिसला तरी, भलेभले प्राणी आपली वाट बदलतात. पण सिंहाच्या नादी लागत नाहीत. सिंहाच्या जर मनात आलं तर, तो कुठल्याही प्राण्याची शिकार सहज करू शकतो. हे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल. हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक कुत्रा सिंहाला भारी पडल्याचे पाहायला मिळत आहे. होय हे खरं आहे. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. मात्र एका कुत्र्याने भल्यामोठ्या सिहावर हल्ला केला. आश्चर्य म्हणजे हा भला मोठा सिंह कुत्र्याला घाबरून दोन पाऊले मागे सरला.
काय घडलं नेमकं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आयएफएस सुशांत नंदा या अधिकारऱ्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओत एक कुत्रा एका सिंहावर हल्ला करताना पाहायला मिळत आहे. सिंह देखील डरकाळी फोडताना दिसत आहे, मात्र या डरकाळी कुत्रा किंचितही घाबरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. कुत्रा देखील जोरजोरात भुंकत सिंहाच्या अंगावर चाल करून जातो. कुत्र्याचे रौद्र रूप पाहून, सिंह देखील अचंबित होतो. आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्हिडीओत कुत्रा सिंहाच्या अंगावर चाल करून जाण्याचे कारण म्हणजे, कुत्र्याचा हा इलाका असल्याचं बोललं जात आहे. काही काळ या दोघांची धरपकड उपस्थित असणारे अनेक जण पाहत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सिंहाच्या डरकाळीला न घाबरता कुत्र्याने देखील आपला जलवा दाखवला. कुत्र्याने रौद्र रूप धारण केलेले पाहून, सिंह या ठिकाणाहून पळ काढताना पाहायला मिळतो. मात्र तरी देखील कुत्रा सिंहाचा पाठलाग करून त्यांच्यावर सल्ला करताना पाहायला मिळत आहे. अखेर या लढाईत काय होतं, हे तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओ पाहूनच पाहा.
Need this much confidence in life. Dog vs Lion. It also highlights issue of stray dogs & wildlife interaction. @zubinashara pic.twitter.com/lNu7X4ALm5
— Parveen Kaswan (@ParveenKaswan) January 10, 2021
Lifestyle: महिलांमध्ये he पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम