dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे
dog run behind the bike: मानसांपेक्षाही जास्त भावना प्राण्यांना असतात, असं बोललं जातं. त्यात कुत्र्याचं (dog) नाव प्रामुख्याने घेतलं जातं. कुत्र्यासारखा इमानदार प्राणी जगात दुसरा कुठलाही नाही, हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. कुत्र्याला जीव लावणारा घरातला एखादा सदस्य काही काळासाठी परगावी किंवा निघून गेला, तर कुत्र्याची ज्याप्रमाणे घालमेल होते, कुत्रं ज्या पद्धतीने अस्वस्थ होतं, हे पाहण्यासारखं असतं. मात्र कुत्र्याची एक वाईट सवय आहे जी अनेकांना खूपते. कुत्रं धावत्या टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर गाडीच्या पाठीमागे अनेकदा धावताना तुम्ही पाहिलं असेल, मात्र कुत्री असं का करतात तुम्हाला माहिती आहे? आज आपण याच संदर्भात सविस्तर जाणून घेणार आहोत.
तुम्ही देखील टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलरने रस्त्याने प्रवास करत असताना विनाकारण कुत्रं पाठीमागे बरंच अंतर धावत असल्याचा अनुभव असेल. तुम्ही त्या कुत्र्यांचं काहीही वाकडं केलं नसताना, देखील कुत्रा विनाकारण तुमचा पाठलाग का करतो? याला खूप मजेशीर आणि शास्त्रीय कारण आहे. आता अनेक जण गाडीवरून प्रवास करताना कुत्रं पाहिलं तर गाडीचा वेग कमी करतात कारण आपल्याला अनेकदा अनुभव आलेला असतो, कुत्रा आपल्या गाडीच्या पाठीमागे धावणारच धावणार. अशावेळी गाडीचा वेग कमी नाही केला, तर अपघात होण्याची शक्यता असते. अनेकांचे अपघात देखील झाल्याच्या घटना आहेत.
या कारणामुळे गाडीच्या पाठीमागे धावतात कुत्री
अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है! तुम्ही हिंदीतील ही प्रसिद्ध म्हण अनेक वेळा ऐकली असेल. अनेक चित्रपटांमधून हा डायलॉग देखील तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. खरंतर याच्यातच धावत्या गाड्या पाठीमागे, कुत्रा का लावतो, या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. रस्त्यावरील कुत्रांचा एक ठरवून दिलेल्या परिसर असतो, ती त्यांची हद्द असते. या हद्दीत इतर कुठलाही कुत्रा आलेला या कुत्र्यांना अजिबात सहन होत नाही. आपली सीमा निश्चित करण्यासाठी कुत्री त्या परिसरामध्ये असणारे झाडे, झुडपे, विद्यूत खांब, परीसरात उभ्या केलेल्या गाड्या अशा वस्तूंवर कुत्री नेहमी मू त्र विसर्जन करत असतात.
अनेक गाड्यांवर कुत्री मू त्र विसर्जन करताना तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, हा अनुभव तुम्हाला स्वतःच्या बाबतीत देखील आला असेल. एखाद्या रस्त्याच्या कडेला तुम्ही काही काळासाठी गाडी लावली असेल, तर त्या गाडीवर कुठुनतरी कुत्रा येऊन कार्यक्रम करतो. आता तुमची हीच गाडी दुसऱ्या गावात केली, तर त्या हद्दीतील कुत्र्याला वाटतं, आपल्या हद्दीत कोणीतरी घुसलं आहे. आणि म्हणून कुत्रा त्या गाडीचा पाठलाग करतो.
कुत्रं वासावर माणसं ओळखतं, असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. कुत्रा आपल्या हद्दीत कोणी घुसला आहे की नाही, हे पाहण्यासाठी देखील वासाचा उपयोग करून, ज्या गाडीवर दुसऱ्या एखाद्या कुत्र्याने मु त्र विसर्जन केले आहे, अशा गाडीचा त्या हद्दीतील कुत्रा गाडीचा पाठलाग करतो. आपल्या हद्दीमध्ये येणाऱ्या वाहनांचा गंध जर अनोळखी असेल, म्हणजेच एखाद्या कुत्र्याने त्या गाडीवर मु त्र विसर्जन केले असेल, तर कुत्रा त्याचा पाठलाग करतो.
मात्र जर तुम्ही तुमची टू-व्हीलर स्वच्छ धुऊन प्रवास करत असाल, तर तुम्हाला कुठलीही कुत्री पाठलाग करत नसल्याचा अनुभव देखील आला असेल. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, तर कुत्र्याने मुत्र विसर्जन केलीही एखादी टू-व्हीलर दुसऱ्या गावात घेऊन जावा. तसेच सोबत स्वच्छ धुवलेली दुसरी एखादी टू-व्हीलर त्याच्या पाठीमागे घेऊन जा, म्हणजे हा हा अनुभव तुम्हाला हमखास येईल. त्यामुळे अनेक वडीलधारी मंडळी देखील तुम्हाला, गावाला जाताना गाडी स्वच्छ धुऊन घेऊन जा, म्हणजे प्रवासात काही अडचणी येणार नाहीत, असं म्हणतात. याच कारणामुळे तुमची वडीलधारी मंडळी गाडी स्वच्छ धुऊन घेऊन जाण्याच्या सल्ला देत होते.
गाडीच्या मागे कुत्रा लागला तर घाबरून जाऊ नका
रस्त्याने जात असताना धावत्या गाडीच्या पाठीमागे कुत्रा का धावतो, हे आपण पाहिलं. मात्र अशा वेळी तुम्ही काय करायला हवं? आपण या विषयी देखील जाणून घेऊ. तुम्ही टू व्हीलरवरून जात असाल, आणि तुमच्या पाठीमागे कुत्रा लागला असेल, तर तुम्ही घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कुत्रा तुमच्या पाठीमागे लागला आहे, हे पाहून जर तुम्ही घाबरला, तर अपघात होण्याचे सर्वात जास्त चान्सेस असतात. हे तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या पाठीमागे कुत्रा लागला, तर सर्वप्रथम तुम्ही गाडीचा वेग कमी करा कुत्रा जोपर्यंत तुम्ही त्याच्या हद्दीतून बाहेर जात नाही, तोपर्यंत भुंकतो. एकदा तुम्ही त्याच्या हद्दीतून बाहेर गेला की, कुत्रा तुमचा पाठलाग करायचं बंद करतो, त्यामुळे अशा वेळी अजिबात न घाबरता, संयमाने सामना करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम