Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी! स्टीलसोबत सिमेंटचेही दर तब्बल एवढ्या हजारांनी घसरले..
Today Steel Rate: प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर उभं करायचं असते. (New house) आपले देखील एक चांगलं सुंदर देखन घर असावं, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. गेल्या काही महिन्यांपासून घर बांधकामासाठी लागणारे साहित्य एवढ्या मोठ्या प्रमाणात महागले आहे की, सर्वसामान्य लोकांना आपलं घर स्वतःचं बांधणे खूप अवघड झालं आहे. प्रचंड महागाईने सर्वसामान्य नागरिक अगोदरच त्रस्त आहेत. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बऱ्याच लोकांना आटापिटा करावा लागत आहे. वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस या सर्व गोष्टींमुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
सर्वसामान्य नागरिक आपल्या इन्कम मधील थोडी-थोडी बचत करून घर बांधकामांसाठी खर्च करत असतो. मुलांची लग्न करायची म्हंटल्यावर घर बांधणे त्यांच्यासाठी गरजेचं असते. लग्नासाठी येणारा खर्च व घरासाठी लागणारा खर्च या दोन्ही गोष्टींचा विचार करून लोक पुढील निर्णय घेत असतात. हे प्रत्येक सर्व सामान्यांच्या बाबतीत पाहायला मिळतं. गेल्या काही वर्षांपासून बांधकामासाठी लागणारे साहित्य प्रचंड महागल्यामुळे, बरेच लोक घर बांधण्यासाठी थांबल्याचे चित्र आहे.
अनेकजण बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत कमी होईल, या आशेवर बसल्याचे पाहायला मिळते. स्टिल (Steel) आणि सिमेंटच्या (cement) किंमती वाढल्यामुळे तुम्हीदेखील घर बांधण्यासाठी थांबला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची आहे. कारण गेल्या दोन महिन्यांत स्टीलच्या किंमती दोनदा कमी झाल्या आहेत. आज देखील स्टील आणि सिमेंटकही कमी झाले आहे. जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर.
कशामुळे स्टीलचा दर कमी झाला?
स्टील संदर्भात शासनाने एक मोठा निर्णय घेतला. स्टील निर्यातीवर सरकारने कर वाढवला. या पाठीमागे शासनाचा देशात आजचा दर नियंत्रणात आणणे हा उद्देश आहे. याचा परिणाम देखील स्टीलच्या दरांवर पाहायला मिळत आहे. मजबूत घर बांधण्यासाठी स्टीलचा देखील खूप महत्त्वाचा रोल असतो. या स्टीलच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने स्टीलच्या नियंत्रण आणणे गरजेचे होते. एप्रिल मध्ये 83 रुपये म्हणजेच 83 हजार रुपये प्रति टन विकले जाणारे स्टील जवळपास 61 ते 62 रुपये प्रति किलो म्हणजेच 61 हजार ते 65 हजार प्रति टन पर्यंत घसरले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून जर स्टीलचे दर आपण पाहिले तर, स्टीलच्या भावातील चढ उतार आपल्या लक्षात येतील. नोव्हेंबर 2021 मध्ये स्टीलचे दर प्रति 70 हजार रुपये टन होते, तर डिसेंबर 2021 मध्ये स्टीलचा दर 75 हजार रुपये प्रति टन एवढा वाढला होता. एवढेच नव्हे तर, जानेवारी 2022 मध्ये हेच दर 78 हजारांवर गेले होते. तर फेब्रुवारी 2022 मध्ये 82 हजार तर मार्च 2022 मध्ये 83 हजार रुपये प्रति टन एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर मात्र एप्रिल 2022 मध्ये स्टीलचे दर 78 हजार रुपयांपर्यंत घसरले. तर मे महिन्यात 62 हजार तर 63 हजार रुपये प्रति टन घसरले आहे. येणाऱ्या दिवसांत अजून दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतील.
सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात पण मंदी पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन पासून रियल इस्टेट क्षेत्रात मंदी आल्याचे पाहायला मिळते. अनेक व्यावसायिकांचे प्रकल्प रखडलेले आहेत. कोरोना काळातील आर्थिक नुकसान, वाढलेले प्रचंड महागाई, कोलमडलेली कौटुंबिक अर्थव्यवस्था यांमुळे बरेच लोक नवीन घर घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. तसेच आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नवीन घरांची बांधकामे जास्त प्रमाणात होत नाहीत. त्याचाच परिणाम आपल्याला घरासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतीत झालेला पाहायला मिळणार आहे.
सर्वसाधाणपणे, बाजारात सिमेंटचे दर 2 ते 3 आठवड्यामध्ये 60 रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात. बिर्ला सिमेंट या कंपनीच्या एका पोत्याचे दर 400 रुपयांवरून 380 रुपयांपर्यंत आले आहेत. तसेच बिर्ला सम्राट या कंपनीच्या पोत्याचा दर 440 रुपये होता. तो सध्या 420 रुपये आहे. तर सिमेंट मधील नामवंत कंपनी एसीसी सिमेंट दर 450 रुपये प्रति पोते होता, सध्या 440 रुपये प्रति पोते दर आहेत. म्हणावे तसे सिमेंटचे दर घसरले नसले तरी काही प्रमाणात का होईना परंतु सामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. बांधकाम स्टीलप्रमाणे येणाऱ्या काही दिवसांत सिमेंट देखील स्वस्त होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे देखील वाचा Viral video: तीन सिंह मगरीची शिकार करण्यासाठी तलावात घुसले, पण एकटी मगर पडली सगळ्यांवर भारी; काय झालं शेवटी? पहा हा व्हिडिओ..
Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..
Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम