Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..,”; पुढे काय झालं पहा तुम्हीच..
Viral video: सोशल मीडियावर क्षणाक्षणाला अनेक मजेशीर आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. खासकरून प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात त्या व्हिडीओंना नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात पसंत करतात. आणि शेअर देखील करतात. वानर हे मारुतीचा अवतार असल्याचा आपण बोलतो. आणि म्हणूण अनेक जण वानराला खायला देखील देत असतात. वानर देखील हक्काने लोकांच्या हातातील अनेक पदार्थ पळून घेऊन खूप मजेशीर पद्धतीने खातात. हे दृश्य अनेकांना पहावसं वाटतं. आणि याचा अनेक जण आनंद देखील घेतात. मात्र एक वानर चक्क एका लहान मुलासोबत दोन हात करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आपण नेहमी लहान मूल रडत असले तर, गप्प बस नाहीतर वानर येऊन खाऊन टाकेल, असं म्हणतो. सहाजिकच त्यामुळे लहान मुलांच्या मनात वानरांविषयी मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होते. आणि मग वानर पाहिलं तरी, अनेक लहान मुलं मोठमोठ्याने ओरडताना पाहायला मिळतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक लहान मुलगा चक्क वानराशी कुस्ती खेळताना पाहायला मिळत आहे. वानर देखी लहान मुलाला पराभूत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना या व्हिडिओत दिसत आहे. वानर आणि लहान मुलाच्या झुंजीचा हा थरारक व्हिडीओ तब्बल दोन लाखाहून अधिक जणांनी पाहिला असून, अनेकांनी शेअर देखील केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत साधारण आठ नऊ वर्षाचा मुलगा एका वानराची खोड काढताना पाहायला मिळत आहे. लहान मुलाने वानराची खोड काढल्यानंतर, वानर देखील संतापल्याचे दिसत आहे. आणि मग संतापल्यानंतर हे वानर या लहान मुलासोबत दंड थोपटून मैदानात उतरलं. लहान मुलाने देखील घाबरून न जाता या वानराशी दोन केले. वानर आणि लहान मुलाची झुंज अनेकांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार नसल्याचं या व्हिडिओस पाहायला मिळत असून, अखेर या जंगीचा अंत फारच भयानक झाला.
काय घडलं नेमकं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ dalpat__rana_21 नावाच्या इन्स्टाग्राम अकांऊट वरून पोस्ट करण्यात आला आहे. एका आठ-नऊ वर्षाच्या मुलाचा आणि वानराच्या कुस्तीचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत वानर मुलाच्या डोक्यावरच्या केसाला घट्ट पकडून खाली पाडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. हा लहान मुलगा देखील घाबरून न जाता वानराच्या दोन पायाला घट्ट पकडून, तो देखील खाली लोळवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघेही हार मानायला तयार नसल्याचे या व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
वानर हे नेहमी आपल्या हाताने समोरच्याला बोचकारतं, आणि आपल्या धारधार दातांनी चावा घेतो,असं आपण ऐकलं आहे. त्यामुळे वानराच्या कोणीही नादी लागायचं धाडस करत नाही. मात्र या ठिकाणी लहान मुलाला असं काहीही करताना वानर पाहायला मिळत नाही. हा व्हिडिओ पाहताना असं वाटत आहे की, हे वानर लहान मुलांची मजा घेत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लहान मुलगा देखील वानराला खाली पडण्याचा प्रयत्न करताना हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. या कुुुस्तीीत दोोघंंंहीह घेही हार मानायला तयार नसल्याचे पाहायला मिळत आहेे. मात्र अखेर हे वानर मुलाला माफ करून निघून जात असल्याचं दिसत आहे.
काय म्हणाले नेटकी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आत्तापर्यंत तब्बल दोन लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. तर हजारो जणांनी लाईक देखील केला आहे. अनेकांनी या व्हिडिओ खाली कमेंट करताना म्हटलं आहे या मुलाच्या धैर्याला आणि चिकाटीला सलाम केला पाहिजे. अनेक लहान मुलं वानराला पाहून धूम ठोकून पळून जातात, मात्र याने घाबरून न जाता दोन हात केले हे कौतुकास्पद आहे. तर दुसर्या एका इजसेम म्हटलं आहे वानराचे खासकरून कौतुक करणे आवश्यक आहे कारण मनात आणलं असतं तर बाहेर आहे या मुलाच्या एका कानशिलात लगावून घायाळ केलं असतं. मात्र वानराने देखील लहान मुलांचे मनोरंजन केलं.
हे देखील वाचा Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..
https://www.instagram.com/_u/dalpat__rana_21/?utm_source=ig_embed&ig_rid=7dc11a1d-5270-46be-b581-ecd877353b82&ig_mid=3DC8D809-D6F6-492C-AC30-AEA591C1ED51
Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हा मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम