Today’s Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर! स्टीलच्या किंमतीत झाली मोठी घसरण, येणाऱ्या काही दिवसात तब्बल एवढ्या हजारांनी होणार घसरण
Today’s Steel Rate: लग्न आणि घर या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्यातील खूप महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात. माणसाला या दोन्हीं गोष्टींमधून कधी ना कधी तरी जावे लागतेच. या दोन्हीं गोष्टींसाठी सर्वसामान्य माणूस काबाडकष्ट करतो. मात्र त्याने या दोन गोष्टींसाठी राखून ठेवलेली रक्कम अपुरी पडते. आपण त्यामुळेच लग्न बघावं करून आणि घर पाहावं बांधून, असं आपण नेहमी ऐकतो. सर्व सामान्य माणसाला आजकाल स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आजकाल घर बांधण्याच्या साहित्यामध्ये झालेली वाढ ही खूपच अन्यायकारक आहे. दिवसेंदिवस स्टीलच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ होत चालली असल्याने आता सर्व सामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न हे स्वप्नच बनले राहिल्याचे पाहायला मिळते. मात्र आता स्टीलच्या किंमती (Today’s Steel Rate) उतरल्याने सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षापासून बांधकाम साहित्यांच्या किंमती कमालीच्या वाढल्या आहेत. सर्वसामान्य माणूस नेहमी सिमेंट, स्टील ई. वस्तूंच्या किंमती कमी झाल्याचे पाहून आपले घर बांधायला सुरुवात करतो. हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता याच संदर्भात एक माहिती समोर आली आहे. जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, घराच्या बांधकामासाठी लागणारे स्टील आता स्वस्त झाले आहे. स्टीलच्या दरात आता घसरण झाली आहे.
सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना घर बांधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच लोकांचे आत्तापर्यंत शिल्लक ठेवलेले पैसे घरासाठी खर्ची होत असतात. त्यामुळेच साहजिकच सर्वसामान्य व मध्यमवर्गीय घर बांधताना बांधकामाच्या साहित्याच्या स्वस्त-महाग या गोष्टीचा विचार करतो. युक्रेन-रशिया युद्धजन्य परिस्थितीच्या धर्तीवर काही दिवसांपूर्वी बांधकामाला लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात महागलं होतं. बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी देखील दर कमी होत असल्याने व विक्री होत नसल्याने स्टीलचा स्टॉक करत नव्हते. व्यापाऱ्यांनी स्टीलच्या किंमती कमी करण्याची मागणी देखील केंद्र सरकारकडे केली होती.
मार्च 2022 मध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलची किंमत जवळपास प्रति टन 70 हजार रुपये म्हणजे 70 रुपये किलो एवढी झाली होती. तर तेच स्टील एप्रिल 2022 मध्ये 76 हजार रुपये प्रति टन झालेले पाहायला मिळते. म्हणजेच 76 रुपये प्रति टन स्टीलचे दर वाढले होते. परंतु आता मे महिन्यात स्टीलच्या किंमतीत घट होऊन आता स्टील 61,525 रुपये टनांवर पोहोचले आहे. म्हणजेच, आता स्टीलचे दर 61-62 रुपये प्रति किलो आहेत. एवढंच नव्हे तर आता यापेक्षाही दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
या अगोदर लोखंडाच्या किंमतीमध्ये दिवसाला 100 ते 200 रुपयांची वाढ होताना पाहायला मिळत होती. परंतु सध्या दरात एका दिवसांत जवळपास 1000 ते 2000 रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 3000 रुपयांनी दर कमी झाले होते. मे आणि जून महिन्यामध्ये लोखंड विकले जाते. परंतु कोरोना आणि बाजारात असलेल्या मंदीचा विक्रीवर खूप परिणाम झालेला पाहायला मिळाला. दराच्या चढ उतारामुळे व्यापाऱ्यांची देखील कोंडी होत आहे.
स्टील उद्योगाद्वारे वापरल्या जाणार्या कोकिंग कोळसा आणि फेरोनिकेलसह काही कच्च्या मालाच्या आयातीवर केंद्र सरकारने आयात करात सूट दिली आहे. त्यामुळे देशांतर्गत स्टीलच्या किंमती कमी व्हायला मदत होईल. तसेच, देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी लोखंड खनिजाच्या निर्यातीवरील शुल्क 50 टक्क्यांपर्यंत आणि काही स्टील साठी लागणाऱ्या घटकांवर 15 टक्क्यांपर्यंत निर्यात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे आता देशात स्टीलच्या किंमती आवाक्यात येण्याची शक्यता आहे. रविवार पासूनच हे शुल्क आकारण्यात येणार आहे. लोखंडाच्या निर्यात करात 30 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Playoffs: विराट कोहली प्ले ऑफमध्ये पोहचवण्यासाठी दिल्लीने केली मॅच फिक्सिंग; पहा व्हिडिओ..
Home Remedies: घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..
IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम