Ration shop: ‘या’ कारणामुळे रेशन दुकानात आता ‘गव्हा’ऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..
Ration shop: दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असतानाच, आता रेशन कार्ड धारकांच्या (ration card holder) पोटाला सरकारने कात्री लावली आहे. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या मालावर अनेक गरीब कुटुंबाचं पोट भरतं, हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक सर्वसामान्य लोकं दर महिन्याला रेशन दुकानातून मिळणारा माल म्हणजेच, धान्य कधी मिळणार याची वाट पहात असतात. को रो ना काळात केंद्र सरकारने मानसी पाच किलो धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने, अनेक जणांना या धान्याची आता सवय झाली होती. मात्र आता सरकारकडून स्वस्त धान्य दुकानातून मानसी ३ किलो मिळणाऱ्या गव्हामध्ये कपात केली आहे.
बाजारामध्ये गव्हाच्या (wheat? किंमती कमालीच्या वाढल्या असतानाच, सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांच्या एक प्रकारे ताटातली चपाती हिरावून घेतल्याचा प्रकार आहे. खेडेगावात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांना बाजारातून गहू खरेदी करणे परवडत नाही. अशी अनेक कुटुंबे आहेत, जी फक्त सणासुदीलाच या गव्हाच्या पोळ्या किंवा चपात्या करत असतात. त्यामुळे साहजिकच ही कुटूंबे दर महिन्याला रेशन दुकानातून मिळणाऱ्या गव्हाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र अन्नपुरवठा विभागाने माणसी 3 किलो मिळणाऱ्या गव्हामध्ये कपात केल्याने आता या सर्वसामान्य लोकांना चपात्या खाण्यापासून मुकावे लागणार आहे.
खरंतर बाजारपेठांमध्ये गव्हाच्या किंमती कमालीच्या वाढल्या असताना, सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचं अनेकांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता सरकारने बाजारपेठेत गव्हाच्या किंमती वाढल्या असल्याने, सर्वसामान्य बाजारातून गहू खरेदी करू शकणार नाही. ही बाब लक्षात घेऊन, हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र याचा कसलाही विचार करण्यात आला नाही. सर्वसामान्य नागरिक या गव्हाच्या सणासुदीला पोळ्या करत असतात. मात्र त्यांना आता पोळ्या शिवाय सण साजरे करावे लागणार आहेत.
काय आहे निर्णय?
गेल्या काही दिवसांपासून गव्हाच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गव्हाचे उत्पादन देखील जास्त झालं आहे. मात्र तरीदेखील गव्हाच्या किंमती वाढत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. गव्हाचे वाढते उत्पादन पाहून केंद्र सरकारने देखील गहू निर्यात करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र खुल्या बाजारात गव्हाच्या किंमती वाढत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय माघारी घेत असल्याचं जाहीर केलं.
खुल्या बाजारात गव्हाच्या किंमती वाढल्याने येणाऱ्या काळात गव्हाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, म्हणून केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानांमधून देखील सर्वसामान्यांना दिला जाणारा प्रतिमाणसी तीन किलो गहू कपात करून माणसी एक किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहायला गेलं, तर हा निर्णय अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला नाही, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अन्नपुरवठा विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना याबाबत माहिती दिली असल्याचं समजतं. रेशन कार्डधारकांना मानसी पाच किलोच धान्य मिळणार आहे. मात्र तीन किलो गव्हाऐवजी एक किलो गहू मिळणार आहे. तर दोन किलो तांदळाऐवजी चार किलो तांदूळ (rice) मिळणार आहे. दोन किलो गव्हाची कपात करून अतिरिक्त दोन किलो तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अजून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी येत्या काही दिवसांत हा निर्णय घेण्यात येणार आहे.
IPL 2022: आयपीएलला गालबोट! ऋषभ पंतने केली मॅच फिक्सिंग; व्हिडिओ झाला व्हायरल..
Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..
Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम