Raj Thackeray: अखेर ब्रजभूषण सिंह यांच्या पुढे राज ठाकरे झुकलेच; चूक झाल्याचं मान्य करून मागितली माफी! पहा व्हिडिओ..

0

Raj Thackeray: मशिदीवरील भोंग्यायाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेचे नेते राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी तरूणांना प्रथम रोजगार मिळाला, यासाठी उत्तर भारतीयांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांना आता चांगलाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक उत्तर भारतीयांना मुंबई सोडून उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जावं लागलं होतं. आता हाच धागा पकडत उत्तर प्रदेशचे भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नसल्याचं म्हटल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

राज ठाकरे यांना जर अयोध्येत यायचं असेल, तर सर्वप्रथम त्यांनी जाहीरपणे उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी टोकाची भूमिका खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी घेतल्याने, राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दिल्लीत भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत ‘साध्वी कांचनगिरी’ यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खळबळजनक दावा केला आहे.

या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हणाल्या, चार महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना मी पत्र लिहिलं होतं, यासंदर्भात त्यांनी मला भेटीचे निमंत्रण दिलं, मी त्यांना मुंबईत जाऊन भेटले. यावेळी राज ठाकरे यांनी माझे स्वागत मोठ्या सन्मानाने केलं. त्यांना भेटल्यानंतर, मी प्रश्न केला तुम्ही जे उत्तर भारतीयांसोबत केलं, ते योग्य होतं का? त्यावर त्यांनी मला सांगितलं, माताजी माझी चूक झाली. राज ठाकरे यांनी माफी मागितली त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पत्रकार देखील उपस्थित असल्याचं साध्वी कांचन यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातला माझ्याकडे व्हिडीओ आहे, असे देखील त्या काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

राज ठाकरे यांनी जर संतांची माफी मागितली असेल, तर मला वाटतं, तुम्ही देखील त्यांना माफ करावं. असं त्या खासदार ब्रजभूषण सिंग यांना म्हणाल्या. या पत्रकार परिषदेत त्या पुढे असंही म्हणाल्या, तुम्ही आयोध्येत स्टेज सजवा, राज ठाकरे यांना त्या स्टेजवरून माफी मागायला लावायची जबाबदारी माझी असेल. साध्वी कांचनगिरी यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

राज ठाकरे यांचा ५ जूनला अयोध्या दौरा

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आयोध्या दौऱ्यावर शिवसेनेने देखील जोरदार टीका केली आहे. एवढेच नाही, तर शिवसेनेने उत्तरप्रदेशमध्ये “असली आ रहा है नकली से सावधान” असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळालं. मात्र आरोप-प्रत्यारोप हे राजकारणात नवीन नाही. त्याने फारसा फरक पडत नाही. मात्र भाजपाचे उत्तर प्रदेशचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांनी माफी मागितल्या शिवाय उत्तर प्रदेशमध्ये पाऊल देखील ठेवू दिलं जाणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं.

खासदार ब्रिजभूषण सिंग यांची भूमिका

भाजपा खासदार बृजभूषण सिंह राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. त्याची त्यांना माफी मागावी लागेल. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये पाऊल देखील ठेवू दिलं जाणार नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय असून, यावर मी ठाम आहे. जर तुम्ही देशाचे नेते बनायला निघाला असाल, तर तुम्हाला माफी मागण्यात काही अडचण असण्याचं कारण नाही.

जो व्यक्ती माफी मागू शकत नाही, तो नेता होऊ शकत नाही. राज ठाकरे उंदीर आहेत, आतापर्यंत ते बिळात राहत होते, आता ते बिळातून बाहेर आलेले आहेत. उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊ दिलं जाणार नाही, यावर मी ठाम आहे. हे योग्य आहे की अयोग्य आहे, हे काळ ठरवेल, मात्र मी कोणाचंही ऐकणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी घेतलेल्या भूमिकेवर अद्याप राज ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसून, पाच तारखेला नक्की काय होणार? हे पाहणं आता खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

Buy laptop: नवीन लॅपटॉप खरेदी करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवूनच खरेदी करा, अन्यथा पैसे जातील पाण्यात..

Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आपल्या नातवाचे नाव ठेवले आगळे वेगळे; जाणून घ्या, नावाचा नावाचा अर्थ..

SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

E-gram swaraj: असा चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी, आणि उठवा सरपंचाचा बाजार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.