Buy laptop: नवीन लॅपटॉप खरेदी करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवूनच खरेदी करा, अन्यथा पैसे जातील पाण्यात..

0

Buy laptop: डिजिटलच्या या युगात लॅपटॉपचे महत्त्व खूप वाढले आहे. बाजारात अनेक कंपनीचे विविधता असणारे, लॅपटॉप देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकांना लॅपटॉप खरेदी करताना नेमका कोणता लॅपटॉप परचेस करायचा? हेच समजत नसल्याचे पाहायला मिळतं. लॅपटॉप फक्त आता मनोरंजन साधन नसून लॅपटॉपद्वारे तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. अलीकडच्या काळात भारतामध्ये गेमिंगने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. गेमिंग देखील आता मग फक्त मनोरंजनाचं साधन राहिले नसून, यातून अनेक जण पैसे देखील कमावतात. जर तुम्हाला गेमिंग आणि सॉफ्टवेअरच्या इतर कामासाठी लॅपटॉपची आवश्यकता असेल, तर तुम्ही कोणता लॅपटॉप खरेदी करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बाजारात आज अनेक कंपन्यांचे विविधता पूर्वक अनेक लॅपटॉप उपलब्ध असल्याने, आपण लॅपटॉप खरेदी करायला गेल्यावर गोंधळून जातो. आपल्याला नक्की समजत नाही, कोणता लॅपटॉप खरेदी करायचा. लॅपटॉप खरेदी करायला जाताना तुम्ही लॅपटॉपची संपूर्ण माहिती घेऊनच लॅपटॉप खरेदी करणं आवश्यक आहे. आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. जर तुम्ही यूट्यूबर असाल, किंवा या क्षेत्रात पाऊल ठेवणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

कीबोर्ड तसेच बॅटरी बॅकअप

कुठल्याही लॅपटॉपमध्ये कीबोर्ड खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यातल्या त्यात जर तुम्ही गेमिंगसाठी लॅपटॉप खरेदी करणार असाल, तर कीबोर्ड पाहणं अत्यंत महत्वाचे आहे. जर तुम्ही गेमिंगसाठी लॅपटॉप खरेदी करणार असाल तर, त्यामध्ये अंगभूत कीबोर्ड आहे की नाही, हे पाहणं खूप गरजेचं आहे. याबरोबरच तुम्ही खरेदी करत असणाऱ्या लॅपटॉपमध्ये कीबोर्डची RGB लाईट चालू असल्याची खात्री करूनच लॅपटॉप खरेदी करा. किबोर्ड बरोबरच दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे, कीबोर्ड फ्रेमची जाडी देखील पाहणं महत्वाचं आहे. कमीत कमी कीबोर्डची जाडी ही 2 मिलीमीटर असणे आवश्यक आहे. मोबाईल असो की लॅपटॉप तुम्हाला सर्वात जास्त विचार हा बॅटरी बॅकअपचा करावा लागतो. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना बॅटरी पाहूनच खरेदी करणे आवश्यक आहे.

स्टोरेज

कुठलाही लॅपटॉप खरेदी करताना स्टोरेज पाहणं खूप महत्वाचं ठरतं. लॅपटॉपमध्ये जेवढी अधिक पेस असते, तेवढा तो उत्तम वर्क करतो. अलीकडच्या काळात ऑनलाइन गेमसाठी खूप जागा लागते. साहजिकच यामुळे लॅपटॉपचे स्टोरेज उत्तम असणे आवश्यक आहे. तुम्ही लॅपटॉप खरेदी करताना, त्या लॅपटॉपमध्ये DDR5 आहे की नाही हे पाहणं आवश्यक आहे. तसेच RAM, PCI व SSD या सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही लॅपटॉप घेणे आवश्यक आहे. लॅपटॉप अगदी स्मूथ चालण्यासाठी SSD khup महत्वाची भूमिका पार पाडते.

ग्राफिक्स

कोणताही लॅपटॉप खरेदी करताना ग्राफिक्सचा देखील विचार करणे आवश्यक आहे. लॅपटॉप वापरताना उत्तम ग्राफिक्स असेल तर त्याचा फिल कमाल असतो. जर तुम्ही गेमिंगसाठी लॅपटॉप घेणार असाल, तर ग्राफिक्सला खूप महत्त्व प्राप्त होतं. AMD तसेच Nvidia हे एक जबदस्त GPU प्रदान करतात त्यामुळे तुमच्या लॅपटॉपमध्ये हे पाहूनच खरेदी करा.

सीपीयू (CPU)

लॅपटॉप खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते सीपीयू आहे. जसं माणसाच्या शरीरात मेंदू खूप महत्त्वाचा मानला जातो, तसंच लॅपटॉप मधला cpu हा मेंदू आहे, असे बोलले जाते. त्यामुळे कोणताही लॅपटॉप आपल्याला कोणत्याही कामासाठी खरेदी करायचा असेल, तर त्याचा सीपीयू उत्तम आहे, की नाही हे पाहूनच खरेदी करणं आवश्यक आहे.

Display

लॅपटॉपमध्ये सीपीयू प्रमाणे डिस्प्लेला देखील तितकंच महत्त्व आहे. लॅपटॉप खरेदी करत असताना डिस्प्लेचा रिफ्रेश रेट काय आहे? हे पाहणं आणि लॅपटॉप खरेदी करणं खूप महत्त्वाचं ठरतं. डिस्प्ले उत्तम असेल, तर तुमच्या डोळ्यांना देखील त्रास होणार नाही. त्यामुळे सहाजिकच डिस्प्ले खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जितका जास्त रिफ्रेश रेट तितकाच लॅपटॉप स्मूथ आणि स्क्रोलिंगसाठी सोपा पडतो.

हे देखील वाचा Home Remedies: हा घरगुती उपाय केल्यास, एकाच रात्रीत शरीरावर असणारी चामखीळ पडेल गळून..

Vivo smartphone: जबरदस्त कॅमेरा आणि 5000 mAh ची बॅटरी असणारा स्मार्टफोन Vivo ने केवळ नऊ हजारांत केला लॉन्च..

Post office Scheme: आता पोस्ट ऑफिस खातेधारकांना मिळणार १३००० महिना; तुम्हीही घेऊ शकता लाभ जाणून घ्या सविस्तर..

Pradhan Mantri Ujjwala Yojana: या योजनेअंतर्गत मिळतोय मोफत गॅस सिलिंडर; असा करा अर्ज आणि घ्या योजनेचा लाभ..

SSC Phase 10 Recruitment: केंद्रीय कर्मचारी निवड आयोगात दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..

धक्कादायक: तासंतास मोबाईल वापरत बसल्याने होतायत हे गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा नाहीतर..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.