धक्कादायक: तासंतास मोबाईल वापरत बसल्याने होतायत ‘हे’ गंभीर परिणाम, वेळीच सावध व्हा नाहीतर…

0

मुंबई: जर तुम्ही मोबाईलवर तासंतास सोशल मीडिया वापरत असाल. त्यामुळे जर तुम्ही ठरवलेली कामे पुढे ढकलत असाल, आरोग्यासाठी खूप महत्वाची असणारी झोप व्यवस्थित घेत नसाल, समोरासमोर संवाद, समाजातील तुमचा वावर बाजूला ठेवून सोशल मीडियावर विनाकारण वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही ‘डूमस्क्रोलिंग’ला बळी पडले  आहात. डूमस्क्रोलिंग म्हणजे विनाकारण फोन पाहत राहण्याची सवय. तुमच्या आरोग्यासाठी डूमस्क्रोलिंग खूप घातक आहे.

विनाकारण सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. चिंताग्रस्तता निर्माण होऊन ती वाढत जाते. तसेच ताणतणाव, नैराश्य, अस्वस्थता देखील वाढते. विनाकारण चिडचिडेपणा वाढतो. जर तुम्ही हे वेळीच थांबवले नाही तर तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा मोठा धोका नाकारता येणार नाही. त्याचसोबत इतर शारीरिक व्याधीही जडतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. तासंतास  मोबाइलमध्ये पाहात राहिल्यामुळे ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलिसिस’सारखे मानेचे आजार होऊ शकतात.  एकाच ठिकाणी खूप वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्याने मणक्यांचे विकार किंवा संधिवात होण्याचा धोका वाढतो.

त्याचबरोबर सतत मोबाईल हातात पकडल्यामुळे  हाताचा पंजा व हात बधिर करणारा ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’, लठ्ठपणा, डोळ्याचे आजार अशा विविध आजारांना तुम्ही बळी पडू शकता. एका संशोधनातून पाठीमागील दोन वर्षांमध्ये असे आजार वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच रेडिओलहरींच्या सतत संपर्कात आल्यामुळे मेंदूत गाठ होण्याचा धोकादेखील वाढला आहे. फेसबुक शॉर्ट व्हिडिओज, इंस्टाग्राम रिल्स, स्टोरीज, स्टेटस, यूट्यूब शॉर्ट व्हिडिओज हे सगळ पहात असताना माणूस एक गोष्ट विसरून जातो की आपण किती वेळ झालं मोबाईल वापरत आहोत. या सर्व गोष्टींनी लोकांना त्यांच्या ताब्यात घेतले आहे.

जर तुम्ही देखील अशाच प्रकारे आपला बहुमूल्य वेळ  वाया घालवत असाल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. त्यामुळे आपण यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची एकाग्रता देखील नष्ट होऊ शकते. त्याचसोबत मेंदू व मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात किती कमी मोबाईल वापरता येईल यावर भर द्यायला हवा. दिवसभर ठराविक वळेपुरता मोबाईल वापरण्याची गरज आहे. सतत मोबाईल पाहण्याचा मोह सोडून द्या. रात्री पासून सकाळपर्यंत मोबाईल पासून लांब रहा. सकाळ सकाळी मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा व्यायामावर भर द्या. मोबाईलपासून लांब होऊन निसर्गाशी जोडा यामुळे तुम्ही आणि तुमचे मन ताजेतवाने होईल असे तज्ञांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या:

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी, आणि उठवा सरपंचाचा बाजार 

Hero Motocorp Requirement: Hero कंपनीमध्ये इंजीनियरिंग तसेच या उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी! असा करा अर्ज.. 

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक.. 

Marriage tips: या 4 गोष्टी पत्नीपासून लपवून ठेवाव्याच लागतील, अन्यथा होईल सत्यानाश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.