JCB tire burst: हवा भरताना जेसीबीच्या टायरचा झाला स्पोट; कर्मचाऱ्यांच्या शरीराचे टुकडे उडाले हवेत, व्हिडिओ पाहून उडतोय थरकाप..
JCB tire burst: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओंचे व्यासपीठ आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना सोशल मीडियावर कधी व्हायरल होतील, हे आपल्यालाही कळत नाही. खासकरून सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडविणारे व्हिडिओ नेहमी व्हायरल होताना पाहायला मिळतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडिओ छत्तीसगडमधला (Chhattisgarh) आहे.
माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहून सिध्द झाले आहे. माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. याच संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) सिलतारा या ठिकाणी कारखान्यात जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना स्पोट केल्याची दुर्दैवी घटना घडल्याचं घटना समोर आलं आहे. एका कारखान्यात जेसीबीमध्ये हवा भरत असताना टायरचा स्फोट (JCB tire burst) झाला. या अपघातात त्याठीणी उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ३ मे रोजी हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील सिलतारा या ठिकाणी जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे राजपाल सिंग आणि प्रंजन नामदेव अशी आहेत. त्या दोघांचे वय बत्तीस वर्ष असल्याचे सांगण्यात येत असून, हे दोघेही रेवा या गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड भयावह आहे. जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना अचानक टायर फुटल्याने हे दोघेही चेंडूसारखे हवेत उडाले. हे दृश्य पाहताना अनेकांचा काळजाला थरकाप उडत आहे.
काय घडलं नेमकं?
मीडियावर वायरल झालेल्या मुलीवर एका कारखान्यांमध्ये जेसीबी उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. जेसीबीचा टायर काढून दोन कर्मचारी या टायरमध्ये हवा भरताना दिसत आहेत. जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना आसपास इतर देखील काही लोकं एकमेकांशी गप्पा मारताना या व्हिडिओत दिसत आहे. जेसीबीचा टायरमध्ये हवा भरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टायरमध्ये नक्की हवा किती झाली आहे? हे लक्षात आले नाही. दोघे वारंवार जेसीबीच्या टायरमध्ये टाॅमीच्या सहाय्याने हवा चेक देखील करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक कर्मचारी जेसीबीच्या टायरवर बसून, या टायरमध्ये हवा भरताना दिसत आहे. आसपास अनेक लोक देखील एकमेकांशी गप्पा मारत आहेत. मात्र नेमका टायर फुटायच्या अगोदर ही लोक या ठिकाणाहून निघून गेली होती. टायर फुटायच्या अगदी काही सेकंदाच्या अगोदरच ही मंडळी त्या ठीकाणाहून गेली होती. टायर फुटला त्यावेळी या कारखान्यातले दोनच कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते.
टायरवर बसून हवा भरत असतानाच जेसीबीचा टायर फुटला, आणि हे दोघेही चेंडू सारखं हवेत उडाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत या दोघांच्याही शरीराचे तुकडे इतरत्र पडल्याचे पाहायला मिळत आहेत. यावरून आपण हा स्पोट किती भयानक होता, याचा अंदाज लावू शकतो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
जेसीबीचा टायर फुटून घडलेली ही दुर्दैवी घटना कारखान्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारखान्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेही टायर फुटल्यानंतर कसे हवेत उडाले, हे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर टायर फुटायचे अगोदर काही लोकं देखील एकमेकांशी गप्पा मारत होते, मात्र टायर फुटायचा बरोबर काही सेकंद अगोदर ही मंडळी या ठिकाणाहून निघून गेली. आणि सुदैवाने त्यांचा जीव वाचला. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही घटना पाहताना अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी होत आहे.
हे देखील वाचा Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..
Two people were killed when a tyre of a JCB burst while they were filling air in it at a vehicle workshop in the Raipur @ndtv @ndtvindia pic.twitter.com/A4I9miCjNo
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 5, 2022
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम