दत्तनगर ते चाकण शिक्रापूर रस्ता नूतनीकरणाचे भूमिपूजन आमदार मोहिते यांच्या हस्ते, तसेच विविध विकास कामांसाठी निधी मंजूर

0

चाकण नगरपरिषद हद्दीतील दत्त नगरी ते चाकण शिक्रापूर रस्त्याचे नूतनीकरणाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चाकण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून दत्तनगरी ते चाकण शिक्रापूर या रस्त्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तात्काळ येथील ड्रेनेज लाईन करण्यासाठी  निधीमधून निधी जाहीर केला. सदर कामासाठी चाकण चे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धीरज मुटके यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार दिलीप मोहिते यांनी देखील या कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. अशी माहिती नगरसेवक धीरज मुटके यांनी दिली.

यावेळी चाकण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष धीरज मुटके, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कैलास सांडभोर, चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राम गोरे, माजी नगरसेवक प्रकाश भुजबळ, माजी नगरसेवक विशाल नायकवडी, युवा नेते गणेश जाधव सुधीर कानपिळे, स्वामी कानपिळे, उद्योजक वसंतराव कड, विष्णू कड, शांताराम कानपिळे, मधुकर कानपिळे, विशाल कड,बाळासाहेब म्हेत्रे,सयाजी गांडेकर, स्मिता शाह, कुणाल चकोर, सोसायटी संचालक सदस्य अभिषेक मुटके,प्रथमेश गवते, महेश कानपिळे, संतोष म्हेत्रे, बनेश्र्वर कड, संकेत कड, चेतन कर्णावट, तुकाराम बदाले, प्रसाद बदाले, चेतन मुटके, आकाश मुटके, आकाश पवळे, सुभाष होले, निखिल मोहिते पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार मोहिते यांनी विविध विकास कामांसाठी दिला ३७ लाखांचा निधी, धीरज मटके यांच्या प्रयत्नांंना यश 

मौजे चाकण शिक्रापूर रोड ते दत्तनगरी रोडच्या गटर लाईन साठी पाच लाख रुपये निधी आमदार दिलीप मोहिते यांनी दिला आहे. त्याचसोबत चाकण शिक्रापूर रोड ते बारणे बिल्डिंग पर्यंत (मेदनकरवाडी लेन) पेविंग ब्लॉक्स बसवण्यासाठी पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. तसेच पुणे नाशिक हायवे ते मारुती मुटके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्यासाठी दहा लाख रुपये निधी देण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालय ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँककडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 17 लाख रुपयांचा निधी आमदार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

चाकण परिसरातील बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IdFf1yVsiFR3rEVvLow2fv

हेही वाचा:चाकणचे माजी उपनगराध्यक्ष धिरज मुटके यांचा राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  

फोटोशूट साठी नव्हे तर रात्रीच्या काळोखात रत्यावरील खड्डा मुजवणारा नगरसेवक तुम्ही पाहिलाय का? 

Renu Sharma: पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचं हे आहे कनेक्शन; जाणून तुम्हीही म्हणाल..  

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! IT सह या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज.. 

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.