फोटोशूट साठी नव्हे तर रात्रीच्या काळोखात रत्यावरील खड्डा मुजवणारा नगरसेवक तुम्ही पाहिलाय का?

0

आपण बऱ्याचदा लोकप्रतिनिधींना मोठमोठ्या लक्झरी गाड्यांमधून फिरताना नेहमीच पहात असाल. रस्त्यावर कितीही खड्डे असले तरी त्यांच्या गाड्यांच्या सस्पेंशनमुळे त्यांना कदाचित जाणवतही नसेल. परंतु रस्त्यावरील खड्डे काही नीट होत नाहीत. अनेक शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळतात. अनेक वेळा यावरून राजकीय टीका टिपण्णी होत असते.
अगोदरचा खड्डा

रस्त्यांवरील खड्यांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खूप कमी लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य लोकांना यातून कसा मार्ग काढावा लागत असेल याचा विचार येत असेल. परंतु काही लोकप्रतिनिधींना आपल्याला निवडून दिलेल्या लोकांबद्दल प्रचंड निष्ठा असते. सामाजिक कामाबद्दल मोठ्या प्रमाणात आवड असते.

लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांचे नात कसं असाव? याचे एक उत्तम उदाहरण चाकण येथे पाहायला मिळाले. गेल्या चार पाच दिवसांपूर्वी चाकण शिक्रापूर रोड वर २ वेळा अपघात झाला. एका खड्यामुळे हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्यामुळे दोन अपघात खडल्याची बातमी स्थानिक लोकप्रतिनिधींना समजली. ही बातमी कळताच तेथील स्थानिक नगरसेवक व चाकणचे माजी उपनगराध्यक्ष मा. धिरज प्रकाश मुटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चाकणचे मा.उप नगराध्यक्ष, व स्थानिक नगरसेवक धिरज प्रकाश मुटके , गड किल्ले संवर्धनचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब दिघे सर, उद्योजक अप्पासाहेब कड, उद्योजक बोरकर, आबा मेदनकर , युवा उद्योजक पंकज पोटेकर व इतर नागरिकांनी एकत्र येत स्वतःहून सिमेंट वाळू खडी आणली व रस्त्यावरील खड्डा मुजवला. त्यामध्ये स्थानिक नगरसेवक धिरज मुटके यांनी व त्याच्या साथीदारांनी स्वतः सिमेंट खडी कालवून रात्रीच्या अंधारात हा खड्डा मुजवला.

अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी गर्दीमध्ये येऊन चर्चा होण्यासाठी प्रयत्न करत असतात. तर काही फोटोशूटसाठी अनेक खटापटी करताना पाहायला मिळतात. परंतु या टीमने रात्रीच्या अंधारात येऊन त्या ठिकाणी सिमेंट, खडी व इतर सामग्री जुळवून रस्त्यावरील खड्डा मुजवण्याचे काम केले. खरंतर त्यांना दिवसा सर्वांसमोर येऊन देखील हे काम करता आले असते. यामुळे त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली असती.

परंतु वेळ आणि काळाचे भान ठेऊन ज्यावेळी गरज आहे त्यावेळी खरंतर लोकांसाठी लोकांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे असते आणि असे लोकप्रतिनिधी लोकाच्या अडचणीच्या वेळी गरजेला धाऊन जात असतात. नगरसेवक धिरज मुटके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “यामध्ये विशेष काही आहे असे मला वाटत नाही. लोकांची कामे करण्यासाठी तर मला लोकांनी मला निवडून दिले आहे. हे आमचे कर्तव्य आहे. अशी प्रतिक्रिया धीरज मुटके यांनी दिली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.