चाकणचे माजी उपनगराध्यक्ष धिरज मुटके यांचा राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश 

0

चाकणचे मा.उपनगराध्यक्ष सभापती अपक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्यासह भामा आसखेड पुनर्वसन बाधित शेतकरी आणि युवा नेते ॲड.सुयोग शेवकरी, खेड तालुका चे नेते अमोल मोहिते, सुखदेव तागड ,महादेव लगड, वीरेंद्र घोलप यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील याच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

 

यावेळी चाकण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते जीवन सोनावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चाकण शहर अध्यक्ष राम गोरे , युवा नेते राहुल नाईकवाडी , किरण कौटकर, मोबीन काझी राहुल नाईकवाडी उपस्थित होते. पुणे शहराचे माजी महापौर कै. भारतदादा सावंत यांचे चिरंजीव अजय सावंत, नगरसेवक संजय बाळासाहेब तापकीर यांनीसुध्दा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 

मा. श्री. धिरज मुटके हे 24 तास जनतेच्या सेवेत हजर असणार व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण चाकण परिसरात परिचित आहेत. आपली नाळ लोकांशी आहे. लोकांची कामे करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दिलीप मोहिते यांच्या विचारांना प्रेरित होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे धिरज मुटके यांनी महाराष्ट्र लोकशाही सोबत बोलताना सांगितले.

हेही वाचा: दादा बघा माझी अवस्था; किरीट सोमय्यांचा चंद्रकांत पाटलांसमोर हंबरडा, चंद्रकांत पाटील म्हणाले

भाजपनेच आण्णा हजारेना आंदोलनासाठी मदत पुरवली; अनेक धक्कादायक खुलाशाने देशात खळबळ 

धक्कादायक खुलासा..! शिवसेनेच्या या बड्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच किरीट सोमय्यांवर हल्ला 

धक्कादायक सुप्रिया सुळे नाही, चित्रा वाघ याच पि.., महागड्या दारूच्या बाटल्या, फोटो व्हायरल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.