भाजपनेच ‘आण्णा हजारे’ना आंदोलनासाठी मदत पुरवली; अनेक धक्कादायक खुलाशाने देशात खळबळ

0

ज्येष्ठ समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ला देशात भ्रष्टाचार विरोधी चळवळ सुरू झाली. लोकपाल बिल पारित करावं, यासाठी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर अण्णा हजारेंनी आंदोलनाला सुरुवात केली. देशातली हजारों सर्वसामान्य लोकं या चळवळीत सहभागी झाली. या चळवळीमुळे तत्कालीन कॉंग्रेसच्या सरकारचा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवही झाला. मात्र आता अण्णा हजारेंनी केलेले हे आंदोलन, भाजप प्रेरित होतं, शिवाय यासाठी भाजपने प्रचंड पैसा पुरवल्याचा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली देशात २०११ ला भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी राहीली. ‘लोकपाल विधेयक’ हा आंदोलन करण्यामागचा प्रमुख मुद्दा होता. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली २०११साली दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं. देशात प्रचंड भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप तत्कालीन काँग्रेसवर सरकारवर सर्व स्तरातून होताना पाहायला मिळालं. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनामुळेच देशातून काँग्रेसची सत्ता गेल्याचं अजूनही बोललं जातं.

ज्या लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे यांनी हे आंदोलन पुकारलं होतं, ते अजूनही लागू झालेलं नाही. तरीदेखील अण्णा हजारे या विषयी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. असा आरोप गेल्या काही वर्षांत वारंवार होताना पाहायला मिळतोय. काही माध्यमांनी यावर अण्णा हजारेंना प्रश्न देखील विचारला होता. मात्र अण्णा हजारे यांनी मी नरेंद्र मोदींना जवळपास 40 पत्र यासंदर्भात लिहीली आहेत‌. मात्र त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारेचे उत्तर मिळालेले नाही. असं देखील सांगण्यात आले होते. तरीदेखील अण्णा हजारे भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करायला तयार नाहीत, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

पत्र लिहून देखील हे सरकार मला उत्तर द्यायला तयार नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं. एवढंच नाही तर, भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर यांनी हे लोकपाल विधेयक कमजोर करण्याचा कायदाही पारित केला. असंही अण्णा हजारे बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते. एवढंच नाही तर अण्णा हजारे भारतीय जनता पार्टीवर कधीकधी टीका करताना देखील पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टीचे सरकार आश्वासन खूप देते परंतु पाळत नाही.

देशाचे पंतप्रधान आपल्या देशाच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्याऐवजी जगभरातून उगीचच फिरत आहेत. आणि म्हणून या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी मी आंदोलन करणार असल्याचे देखील एकदा अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं. मात्र याविषयी आंदोलनाबाबत पुढे काहीही झालं नसल्याचं पाहायला मिळाले. अण्णा हजारे यांच्या भूमिकेमुळे अनेक जण अण्णा हजारे हे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा चालवत आहेत. असा आरोप गेल्या काही वर्षापासून सातत्याने त्यांच्यावर होताना पाहायला मिळतो आहे.

भारतीय जनता पार्टीचा अण्णा हजारे अजेंडा चालवतात, असा आरोप एकीकडे अण्णा हजारेंवर अलीकडच्या काळात सातत्याने होत असतानाच,आता दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबतचा ‘भ्रष्टाचार विरोधी चळवळ’उभा राहण्याचा अगोदरचा फोटो, आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांसोबतचा अण्णा हजारे यांचा आंदोलन सुरु करण्याच्या अगोदरचा फोटो राजू परूळेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

राजू परूळेकर यांनी ट्विटरवरून शेअर केलेल्या फोटोकडे पाहिल्यानंतर, ही नेते मंडळी अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन कस़ यशस्वीरित्या पार पाडायचं? याविषयीच चर्चा करत असल्याचं, अनेक जणांनी सोशल मीडियावरून म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो क्षणात प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांच्या आण्णा हजारेंबाबतच्या तिव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे, पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.