धक्कादायक…! “सुप्रिया सुळे नाही, चित्रा वाघ याच पि…,” महागड्या दारूच्या बाटल्या, फोटो व्हायरल

0

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या चित्रा वाघ अलिकडच्या काळात सोशल मीडियावर कमालीच्या ॲक्टीव असल्याचे दिसून येते. खासकरून महिलांच्या प्रश्नावर त्या अधिक आक्रमक पवित्रा घेत, राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचे देखील वेळोवेळी पाहायला मिळतं. मात्र दुसरीकडे चित्रा वाघ या सरकारला टार्गेट करण्यासाठीच आपला आवाज वाढवतात. इतर प्रश्न त्यांना दिसत नाहीत, असा देखील त्यांच्यावर नेहमी आरोप केला जातो.

राज्य सरकारने किराणा,आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात दोन दिवसापूर्वी व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात ‘दंडवत दुंडका’ आंदोलन केले. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात माध्यमांशी संवाद साधताना बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे, दारू पिऊन रस्त्यावर पडतात, असे वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानामुळे राज्यात चांगलेच वादंग निर्माण झाले.

बंडा तात्या कराडकर यांनी केलेल्या विधानाचा अनेकांनी निषेध केला. बंडातात्या कराडकर यांच्याकडून देखील माझ्या तोंडून चुकीचं वाक्य गेलं, मी माफी मागतो, असंही स्पष्ट करण्यात आले. एवढंच नाही तर, त्यांना सातारा पोलिसांनी अटक देखील केली. या प्रकारावर अनेकांनी टीका करताना सुप्रियाताई सुळे नाही तर, बंडातात्या कराडकर हेच दारू पिऊन बरळले असल्याचे बोलले जाऊ लागले.

एकीकडे बंडातात्या कराडकर यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का बसणारं विधान केलं, मात्र दुसरीकडे महिलांचे प्रश्न घेऊन नेहमी आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ या प्रकरणावर मुग गिळून गप्प बसल्या आहेत. अशीही टिका त्यांच्यावर आता अनेकांकडून करण्यात येत आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले आहे. एकीकडे किराणा दुकानात वाइन विक्रीचा विरोध करायचा, आणि दुसरीकडे, महागड्या ब्रँडेड दारूच्या बाटल्या घरी आणून पित बसायचं. अशीही जहरी टिका चित्रा वाघ यांच्यावर केली असून, यासंदर्भातले फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

‘अक्षय काळे’ नावाच्या एका ट्विटर यूजर्सने चित्रा वाघ आणि त्यांचे पती यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे, चित्रा वाघ आपल्या पती सोबतचा एक सेल्फी काढतानाचा हा फोटो आहे. अक्षय काळे यांनी शेअर केलेल्या फोटोत, चित्रा वाघ सेल्फी काढत आहेत. परंतु सेल्फी काढताना या दोघांना आपण पाठीमागं दारूचा महागड्या बाटल्या ठेवलेल्या आहेत, याचा विसर पडला. आणि या फोटोत पाठीमागे महागड्या दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या त्याचाही सेल्फी निघाला.

चित्रा वाघ आणि त्याच्या पतीच्या या सेल्फीत पाठीमागे महागड्या,ब्रँडेड, दारूच्या बाटल्या आलेला हा फोटो, अक्षय काळे या यूजर्सने आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत या यूजर्सने म्हटलं आहे, चित्रा वाघ स्टँडर्ड लेव्हलची RED LABLE, BLACK LABLE N GOLDEN LABLE या महाग व्हिस्की आणतात, आणि म्हणून कदाचित त्या किराणा दुकानातून वाइन विकायला विरोध करत आहेत. त्यांना बहुतेक या त्यांच्या घरी घरी दिसणाऱ्या HIGH LABLE ब्रॅण्ड ला सपोर्ट करायचा असेल, अशी जहरी टीका केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.