Leopard rescue: वन अधिकाऱ्याने झाडावर चढून कसं वाचवलं बिबट्याला; तुम्हीच पहा हा व्हिडिओ…

0

Leopard rescue: सिंह, वाघ,बिबट्या, हे प्राणी किती अफलातून शिकार करतात, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जंगलातले हे प्राणी बेताज बादशाह मानले जातात. यांच्या नादी फारसं कोणी लागत नाही. आणि यांना मदत करण्याचे धाडस देखील कोणी करत नाही. मात्र ‘आसाम वन विभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातला एक व्हिडीओ पोस्ट केला. जंगलातून भटकून लोकवस्तीत आलेल्या जखमी बिबट्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याचा हा व्हिडिओ आहे.

अलीकडच्या काळात कॉंक्रिटीकरण वाढल्याने लोकं जंगलं देखील तोडू लागली आहेत. साहजिकच त्यामुळे जंगलातले प्राणी भटकून लोकवस्तीत आल्याचे पाहायला मिळते. असाच एक बिबट्या गुवाहाटीच्या पांडू लोको कॉलनीमध्ये भटकून आला होता. हा बिबट्या जखमी झाल्याचे पाहायला मिळत असून, एका वन अधिकाऱ्याने बिबट्याला झाडावरून खाली उतरवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे कारण एका बिबट्याला झाडावरून खाली उतरवून ही सोपी गोष्ट नाही.

बिबट्याला झाडावरून खाली घेत असतानाचा हा व्हिडिओ 19 एप्रिल रोजी @assamforest या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना वन विभागाने म्हटले आहे, ‘गुवाहाटीमधील ‘पांडूच्या लोको कॉलनी’मध्ये बिबट्या भरकटला होता. या बिबट्याची आता यशस्वीपणे सुटका करण्यात आली असून, या बिबट्याला वाचवण्यासाठी अनेक स्थानिकांनी देखील मदत केल्याचं म्हटलं आहे. बचाव कार्याचे हे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी देखील केली होती.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक वन अधिकारी बिबट्याला खाली घेण्यासाठी झाडावर चढला असल्याचे दिसत आहे. अधिकारी झाडावर चढून बिबट्याला खाली ढकलून देतो. वनविभागाचे अनेक अधिकारी खाली जाळी घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. झाडावरून ढकलून दिलेला बिबट्या बरोबर या जाळीत पडतो.

बिबट्या जाळीत पडल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत असल्याचे या व्हिडिओ दिसत आहे. कदाचित उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्यामुळे बेशुद्धावस्थेत पडला असावा, असं सांगण्यात येत आहे. बिबट्याला आता प्राणिसंग्रहालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. स्थानिक मिडीया रिपोर्टनुसार, या बिबट्याने, काल मालीगाव परिसरात एका महिलेनेवर हल्ला केला होता, या महिलेचा उपचार गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सुरू असल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर होतंय कौतुक

वन अधिकाऱ्याने झाडावर चढून बिबट्याचा जीव वाचवल्यामुळे आसाम वनविभागात सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. या प्राण्यांच्या जवळ कोणी जात नाही, मात्र मोठे धाडस करून वन विभागाने झाडावर चढून या बिबट्याला वाचवलं हे कौतुकास्पद आहे. बिबट्या जरी बेशुद्धावस्थेत असला तरी तो काहीही करू शकतो. मात्र याची पर्वा न करता वनविभागाने उत्कृष्ट काम केलं असल्याचं, सोशल मीडियावर म्हटलं गेलं आहे.

हे देखील वाचा Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

इतर पुरुषासोबत से क्स करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ही‌ धक्कादायक अट..

Lifestyle: माझं तुझ्यावर प्रेम राहिलं नाही म्हणत माणूस एकमेकांचा तिरस्कार केव्हा करू लागतो? वाचा सविस्तर..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.