माणुसकीला काळीमा फासणारी घटना..! ‘या’ विचित्र कारणामुळे नवऱ्यानेच पत्नीला दहा वर्षे घरात डांबून ठेवले; पहा व्हिडिओ..
समाजात आजही पुरुष प्रधान संस्कृती अनेक ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं. आज महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून, अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. घरातील महिला सुखी असेल तर परिवार सुखी असतो असं आपण नेहमी ऐकतो. मात्र बीडमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली असून, 35 वर्षाच्या एका महिलेला तब्बल दहा वर्षे घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पती-पत्नीचं नातं हे खूप पवित्र मानलं जातं. आपली बायको ही सगळ्यात भारी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. एकीकडे अनेकजण मोठ्या अभिमानाने सुंदर बायको मिरवत असतात, मात्र दुसरीकडे सुंदर बायको आहे म्हणून, घरात डांबून ठेवणारी देखील प्रवृत्ती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आपल्या दोन मुलांसहित नराधमाने पत्नीला घरात दोन वर्ष डांबून ठेवलं. आपली बायको सुंदर आहे, तिच्यावर कोणाची नजर पडू नये, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
पीडित महिलेचा नवरा अंधश्रद्धेला बळी पडला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं?
विज्ञानाच्या या युगात आजही काही लोक अंधश्रद्धेला बळी पडतात. पीडित महिलेचा पति देखील अंधश्रद्धेला बळी पडण्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणासंदर्भात बोलताना पीडित महिलेचे शेजारी ‘शेख मुसा’ एका माध्यमांनी बोलताना म्हणाले, त्या महिलेचा नवरा एका कुठल्यातरी साधूच्या आहारी गेला आहे. तो सांगेल तसं हा वागतो. जिवंतपणी या माणसाने त्याच्या पत्नीला मारल्यासारखी ही घटना आहे. हा माणूस सारखा महाराज.. महाराज करत राहतो. चांगल्या परिवाराचे याने वाटोळे केले असल्याचं त्यांनी म्हटलं.
काय म्हणाली पिडीत महिला
दहा वर्षापासून घरात डांबून असणारी पीडित महिला माध्यमांशी बोलताना म्हणाली, पुर्वी मी एका दुकानात काम करत होते. मात्र त्यांचा संशय वाढला. आणि मला घरातच डांबून ठेवलं. संसार करायचा म्हणून मी देखील सहन करत गेले, मात्र आता सहन होत नाही. मानसिक त्रास खूप होत आहे. त्यामुळे आता एकत्र राहणं शक्य नाही.
कसं उघडकीस आले प्रकरण
पीडित महिलेच्या बहिणीने यासंदर्भात सामाजिक महिला कार्यकर्त्या ‘संगिता धसे’ यांना माहिती दिली. यानंतर सामाजिक कार्यकर्ता ‘संगिता धसे’ यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात एक अर्ज दिला. पोलिसांनी लगेच या पिडीत महिलेची सुटका करण्यासाठी बीडला गाडी रवाना केली. पीडित महिलेच्या घरी आम्ही गेल्यानंतर, दोन-तीन दरवाज्याच्या आतमध्ये ही महिला आपल्या मुलासहीत होती. दोन ते तीन दिवसांपासून या महिलेने काहीही खाल्लं नव्हतं.
दहा वर्षापासून पीडित महिला चालली नसल्याने, तिला व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं. तिच्या शरीरातील अवघड जागांवर जखमा देखील झाल्या होत्या, अशी माहिती ‘संगीता धसे’ यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना संगिता धसे म्हणाल्या, आता आम्ही या पीडित महिलेला आणि तिच्या दोन मुलांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन आलो आहोत, पोलीस या महिलेला खायला देतील, या महिलेचा आम्ही हॉस्पिटललाझेशन करू, आणि पुढे योग्य ती कारवाई होईल. असंही त्या म्हणाल्या.
हे देखील वाचा ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..
Raj Thackeray: शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यात येत असतानाच राज ठाकरे यांनी खाल्ली मटनाची उकड..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम