Aaryan Khan: आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवीन ट्विस्ट; प्रकरणाचे धागेदोरे माहित असलेल्या प्रभाकर साईलची ‘ह ‘त्या’..
Aryan Khan: 2 ऑक्टोबरला कार्डिलिया क्रुझवर छापा टाकत, एनसीबीचे तत्कालीन जोहरी अधिकारी समीर वानखेडे (Sameer wankhede) यांनी प्रसिद्ध बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात अटक केली. शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक केल्याने, देशभरात एकच खळबळ उडाली. मात्र नंतर एनसीबीचा कुठलाही अधिकारी नसणऱ्या किरण गोसावीने (kiran gosavi) आर्यन खानच्या हाताला पकडून एनसीबीच्या ऑफिसला घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, या कारवाईवर अनेकांनी शंका उपस्थित केली. आणि पुन्हा एकदा खळबळ उडाली.
बॉलीवूड सुपरस्टारचा मुलगा या ड्रग्स प्रकरणात अटकेत असल्याने, ही बातमी जगभरात वार्यासारखी पसरली. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साईलने, (prabhakar Sail) धक्कादायक आरोप केल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. किरण गोसावीचा पर्सनल बॉडीगार्ड असणाऱ्या प्रभाकर साईलने एनसीबी ऑफिस मधील काही फोटो व्हायरल केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
प्रभाकर साईलने काही फोटो व्हायरल केल्यामुळे, एनसीबी ऑफिसमध्ये किरण गोसावी नावाचा व्यक्ती आर्यन खानच्या कानात काय सांगत होता? आर्यन खानला आपल्या फोनवरून फोन लावून कोणाशी बोलायला लावत होता? असे असंख्य प्रश्न उपस्थित झाले, आणि या प्रकरणाने पुन्हा वेगळं वळण घेतलं. एवढेच नाही, तर प्रभाकर साईलने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीच्या माध्यमातून शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा केला. प्रभाकर साईल हा या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार आणि किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड असल्याने, या आरोपाला कमालीचं महत्त्व प्राप्त झालं.
या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने अनेक धक्कादायक आरोप केल्यानंतर, अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या किरण गोसावीने एक व्हिडिओ जारी करत प्रभाकर साईल खोट बोलत असल्याचं म्हटलं. यानंतर प्रभाकर साईलने, आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. नंतर त्याने मुंबई पोलीस आयुक्तांकडे संरक्षण देखील मागितले. आता अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला नसून, हा घातपात असल्याची शंका देखील अनेकांकडून व्यक्त केली जात असून, गृहमंत्र्यांनी या मृत्यूच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.
प्रभाकर साईल यांच्या मृत्यू संदर्भातली माहिती त्यांचे वकिल ‘तुषार खंदारे’ यांनी दिली आहे. चेंबूरमधील माहुल भागात असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रभाकर यांचा मृत्यू संशयास्पद असून, या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत. प्रभाकर साईल यांच्या झालेल्या अचानक मृत्यूमुळे, या प्रकरणाने पुन्हा एकदा नवीन वळण घेतल्याचं बोललं जात असून, या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत, ते शोधण्याची गरज असल्याचं देखील बोललं जात आहे.
नुकतेच आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या चौकशी समीतीने आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रिटेलरशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नसल्याने, तो ड्रग्स घेणार होता, हे स्पष्ट होत नाही. असे देखील या समितीने म्हटलं आहे. याचा अर्थ आर्यन खान या प्रकरणातून निर्दोष सुटण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून ,आर्यन खानला जाणून-बुजून पैशासाठीच या प्रकरणात अडकवण्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
मोठी बातमी! आर्यन खानकडे ड्रग्स सापडलेच नाही; एसआयटी तपासात झाले स्पष्ट, वानखेडेनेच रचला कट
प्रभाकर साईच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे हे प्रकरण जाणून बुजून रचले गेले असल्याचे, आता स्पष्ट होत आहे. असे देखील आता बोलले जाऊ लागले आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचे अनेक धागेदोरे या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणाऱ्या प्रभाकर साईला माहित होते. कदाचित येणाऱ्या काही दिवसांत तो काहीतरी मोठा गैप्यस्पोट देखील करणार असल्याने, त्याचा जीव गेला. त्याचा मृत्यू झाला नसून, त्याला मारलं असल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे. मात्र या मृत्यूच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असून, चौकशीनंतरच सत्य काय ते सर्वांसमोर येईल असं देखील बोललं जात आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची एंट्री; समीर वानखेडे फडणवीस कनेक्शन उघड
समीर वानखेडेने निष्पाप आर्यनला पैशासाठीच अडकवल्याचं उघड;न्यायालयाने वानखेडेंना ठरवलं दोषी
फरारअसणाऱ्या किरण गोसावीचे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट
शेती: शेतात जाईला रस्ता नाही? चिंता करू नका, असा करा घरबसल्या अर्ज तहसिलदार येईल बांधावर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम