‘फरार’ असणाऱ्या ‘किरण गोसावी’चे अजब वक्तव्य; केला ‘हा’ खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट…

0

कार्डिलिया ‘ड्रग्ज’ प्रकरणावरून ‘शाहरुख खान’चा मुलगा ‘आर्यन खान’ २ऑक्टोंबर पासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सत्र न्यायालयाने आर्यन खानचा दोन वेळा जामीन फेटाळल्यानंर त्याच्या वकिलाने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी मात्र, या प्रकरणाने पुन्हा एकदा वेगळं वळण घेतले, असून आता या प्रकरणाचा तिढा आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे.

कार्डिलिया ‘क्रुझवर’ एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र अटक करण्यात आल्यानंतर किरण गोसावी नावाचा व्यक्ती आर्यन खान एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना पाहिले गेल्याने, सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. सुरुवातीला ‘हा’ व्यक्ती एनसीबीचाच एखादा अधिकारी असल्याचं सर्वांना वाटलं. मात्र नंतर या व्यक्तीवर पुणे-मुंबईत विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद आहे. ही बाब समोर आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

2 ऑक्टोंबरनंतर किरण गोसावी हा व्यक्ती अचानक गायब झाला. आणि एनसीबी करत असलेल्या तपासात संशय व्यक्त केला जाऊ लागला. किरण गोसावी यांचा पर्सनल बॉडीगार्ड ‘प्रभाकर साईल’ याने काल एक धक्कादायक खुलासा केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचे पहिला मिळाले. विशेष म्हणजे प्रभाकर साईल याने या प्रकरणाचा सगळा घटनाक्रम, कोर्टामध्ये एफिडेविट सादर करत मांडला आहे.

२ ऑक्टोबर पासून गायब झालेला, या प्रकरणातला साक्षीदार ‘किरण गोसावी’ यांनी देखील या प्रकरणावर आपली बाजू मांडत, प्रभाकरने केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. ‘प्रभाकर साईल’ हा खोटं बोलत, असल्याचा आरोप गोसावी याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

एका न्यूज वेबसाईटशी बोलताना किरण गोसावी म्हणतात, या ड्रग्स प्रकरणाची माहिती आम्ही एनसीबीला देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. मात्र त्यांना आमच्या अगोदरच कार्डिलिया ‘क्रुझमध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती होती, असं किरण गोसावी म्हणत आहे.

प्रभाकर साईल याने, केलेल्या आरोपांची जवळपास सगळी उत्तरे किरण गोसावी यांनी दिली आहेत,मात्र त्याने दिलेल्या उत्तरांमध्ये अनेक शंका घेण्यास वाव देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभाकर साहिलच्या ‘व्हाट्सअप’वर किरण गोसावीने काही फोटो पाठवत, या फोटोंपैकी क्रुजमध्ये आत कोण-कोण येतंय? याविषयी इन्फॉर्म करायला सांगितलं होतं. मात्र तुम्ही एनसीबीचे कुठलेही अधिकारी नसतानाही असं ‘इन्फॉर्म’ कसं काय देऊ शकता? या प्रश्नाचे किरण गोसावी यांच्याकडे योग्य असं उत्तर नसल्याचे पाहिला मिळाले.

किरण गोसावी याने ‘आर्यन खान’च्या हाताला पकडून एनसीबी ऑफिसला पळवत नेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा कोणी एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

मात्र आता या व्हिडिओ विदर्भात ‘किरण गोसावी’ यांनी स्वतः एक खुलासा केला आहे. आर्यन खानच्या हाताला धरून नेण्याचे कारण स्पष्ट करताना किरण गोसावी म्हणत आहे, समोर मीडियाचा ताफा पाहून आर्यन खान स्वतः मला म्हणाला होता, “भाई मुझे लेकें चलों” त्यानंतर मी त्याच्या हाताला पकडून एनसीबी ऑफिसला घेऊन गेलो. असं स्पष्टीकरण किरण गोसावी यांनी एका मीडिया वेबसाईटला बोलताना दिले आहे.

किरण गोसावी यांचा ‘बॉडीगार्ड’ प्रभाकर साईल याने आमचे साहेब म्हणजेच,किरण गोसावी हे आर्यन खानचं, आपल्या फोनवर कोणाशी तरी बोलणं करून देताना, मी पाहिलं आहे. याचा मी एक ‘व्हिडिओ’ देखील शूट केला आहे. असा खुलासा प्रभाकर साईल याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता.

प्रभाकर साईलने केलेल्या या आरोपावर आता किरण गोसावी याने स्पष्टीकरण दिले आहे. किरण गोसावी या सर्व आरोपाचे खंडन करताना म्हणाला, आर्यन खानने स्वतः मला माझ्या घरच्याशी बोलायचं आहे,अशी विनंती केली होती. त्यानंतर मी त्याने सांगितलेल्या नंबरवर फोन केला, मात्र फोन समोरून उचलला गेला नाही. असं किरण गोसावी म्हणत आहे.

किरण गोसावी यांना आर्यन खान सोबत,काढलेल्या सेल्फी विषयी एका मीडिया वेबसाईटने विचारले. सेल्फी संदर्भात स्पष्टीकरण देताना किरण गोसावी म्हणाले,मी ज्यावेळेस सेल्फी काढला, त्यावेळेस आर्यन खान ‘आरोपी’ नव्हता. मात्र मी काढलेला सेल्फी सोशल मीडियावर टाकला, ही माझी चूक झाली. त्याविषयी मी जाहीर माफी मागतो अशी कबुलीही त्याने दिली आहे.

किरण गोसावी यांच्यावर ‘पुणे पोलिसांनी’ सहा तारखेला लुकआऊट नोटीस काढली आहे. मात्र त्याने अद्यापही सरेंडर केलेलं नाही. आमचे पोलीस अलर्ट आहेत, आम्ही पोलीस स्टेशन आणि कोर्टातही अलर्ट आहोत. अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी एका मीडिया वेबसाईटला दिली आहे. तर दुसरीकडे किरण गोसावी याने मी स्वतः सरेंडर करणार असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या- ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानचा युक्तिवाद केल्यानंतर, न्यायालयाने एनसीबीला युक्तीवादच करु दिला नाही, कारण जाणून बसेल धक्का

आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का

आतंकवादी तालिबान्यांसमोर नतमस्तक होण्यास अफगाणिस्तान संघाचा नकार; या कारणामुळे राष्ट्रगीत गाताना रडले खेळाडू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.