जेष्ठ कायदेतज्ञ ‘मुकुल रोहतगी’ यांनी आर्यन खानचा युक्तिवाद केल्यानंतर, न्यायालयाने ‘एनसीबीला’ युक्तीवादच करु दिला नाही, कारण जाणून बसेल धक्का…

0

कार्डिलिया ‘ड्रग्ज’ प्रकरणावरून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 2 ऑक्टोंबर पासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सत्र न्यायालयाने आर्यन खानचा दोन वेळा जामीन फेटाळल्यानंर त्याच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. भारताचे माजी एटर्नी जनरल ‘मुकुल रोहतगी’ यांनी आर्यन खानच्या बाजूने युक्तिवाद चालवल्यानंतर आजची सुनावणी न्यायालयाकडून तहकूब करण्यात आली, असून उर्वरित सुनावणी उद्या दुपारी होणार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

भारताचे माजी एटर्नी जनरल आणि जेष्ठ कायदेतज्ञ ‘मुकुल रोहतगी’ आर्यन खानच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी कोर्टात आले. मुकुल रोहतगी यांनी जवळपास एक तास युक्तिवाद केला असून, या युक्तिवादाची सोशल मीडियावर देखील चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या बाजूने युक्तिवाद करताना अनेक मुद्दे उपस्थित केले. जोपर्यंत एखाद्याला ड्रग्स तस्करीच्या आरोपाखाली पकडलं जात नाही, तोपर्यंत त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देता येत नाही. असा युक्तिवाद करताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

‘एनडीपीएस’ कायद्यामध्ये देखील एखादा माणूस ड्रग्सच्या आहारी गेला तर, त्याला सुधारण्याची एक संधी देण्यात यावी असं म्हटलं आहे. आहारी गेलेल्या लोकांना पुनर्वसन कक्षात पाठवलं जातं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीकडे कमी प्रमाणात ड्रग्स सापडलं तर, त्याला जेलमध्ये देखील पाठवलं जात नाही. आणि या प्रकरणात तर, आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाही. तरीदेखील गेले वीस दिवस तो जेलमध्ये आहे. असाही युक्तिवाद ज्येष्ठ कायदेतज्ञ ‘मुकूल रोहतगी’ यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

आर्यन खानच्या बाजूने युक्तिवाद करणारे मुकुल रोहतगी यांनी,एनसीबीने या प्रकरणात ज्या ‘व्हाट्सअप चॅट’चा संदर्भ जोडला आहे, ती चॅट एका ‘पोरक गेमबद्दल’ असल्याचा युक्तीवाद मुकुल रोहतगी यांनी केला. आर्यनला या प्रकरणात अडकवण्यासाठी ‘एनसीबीने’ २०१८ ची ‘व्हाट्सअप चॅट’ या प्रकरणाला जोडली आहे. मात्र या चॅट मधून काहीही सिद्ध होत नाही. ‘एनसीबी’च्या दृष्टीने हा पुरावा महत्त्वाचा असेल, मात्र या प्रकरणाचा आणि या ‘व्हाट्सअप चॅट’चा कसलाही संबंध आढळत नाही. असाही युक्तिवाद मुकुल रोहतगी यांनी केला आहे.

कायद्याचा विचार केला तर, आरोपींकडे अमली पदार्थ सापडणं आवश्यक असतं. त्याच्या सोबत असणाराकडे काय सापडलं? याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या एका साक्षीदाराने एनसीबी अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर हे प्रकरण एका राजकीय नेत्याशी संबंधित आहे. मात्र याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमची केस वेगळी असून, ती गुणवत्तेच्याच आधारावर जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद, मुकुल रोहतगी यांनी केला.

‘मुकुल रोहतगी’ यांनी जवळपास एक तास हा युक्तिवाद केल्यानंतर, ‘अर्बाज मर्चंट’ यांचे वकील,अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाकडे कमी वेळ असल्यामुळे, तुम्हाला आणखी किती वेळ लागेल? असं न्यायालयाकडून विचारण्यात आलं. त्याचबरोबर सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त ‘सॉलिसिटर जनरल’ अनिल सिंग यांनीही, मला युक्तिवाद करण्यासाठी ४५ ते ५० मिनिटे लागतील, असं सांगितलयाने, न्यायालयाने आजच्या जामीन अर्जावरील सुनावणी थांबवत, उर्वरित सुनावणी उद्या दुपारी होईल असं स्पष्ट केलं.

उद्या दुपारी होणाऱ्या उर्वरित सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून,उद्या तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? हे पाहणं देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘एनसीबी’कडून अतिरिक्त ‘सॉलिसिटर जनरल’ अनिल सिंग हे देखील काय युक्तिवाद करतायत? याकडेही लक्ष असणार आहे.

महत्वाच्या बातम्या- फरार असणाऱ्या किरण गोसावी चे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट

आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का 

आर्यन खान नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत; शाहरुख खानची दिवाळी कडू 

समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव कसं पडलं? त्याच्याच भावाने सांगितलेले कारण वाचून बसेल धक्का 

Insurance चे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्णाची सापाचा दंश देऊन ह’त्या’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.