Aryan Khan Drug case: समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ‘दाउद’ कसं पडलं? त्याच्याच भावाने सांगितलेले कारण वाचून बसेल धक्का…
Aryan Khan Drug case: आर्यन खान( Aryan Khan) ड्रग्स(drugs) प्रकरणात आता रोज नवीन नवीन धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले असल्याने या प्रकरणाचा तिढा आणखीनच वाढत चाललेले दिसत आहे. दोन ऑक्टोबरला आर्यन खानला कार्डिलीया क्रुझ ड्रग्स प्रकरणात अटक केल्यापासूच संबंधित एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर हे प्रकरण खोटं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता.On October 2, Aryan Khan was arrested in the Cardilia Cruise Drugs case
नवाब मलिक या प्रकरणाचे समीर वानखेडे संदर्भात रोज नवनवीन खुलासे करत असल्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून देशभर हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. काल पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी खोटं जात प्रमाणपत्र वापरल्याचा खळबळजनक आरोप केला होता. वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ‘दाऊद’ असल्याचं प्रमाणपत्र नवाब मलिक यांनी ट्वीटरवर सादर करत एकच खळबळ उडवून दिली होती. (Wankhede’s father’s name is ‘Dawood’ said nawab Malik)
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ‘दाउद’ असल्याचे प्रमाणपत्र ट्वीटरवर सादर करत म्हटले होते, “इथूनच फ्रॉड करण्याला खरी सुरुवात होते” याशिवाय नवाब मलिक यांनी ‘समीर वानखेडे’ यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो देखील ट्विटरवर शेअर केले होते. यामध्ये समीर वानखेडे एका मुस्लीम मुलीशी लग्न करताना दिसत आहेत. नवाब मलिक यांनी केलेल्या या सगळ्या आरोपांना नंतर समीर वानखेडेने स्पष्टीकरणही दिले. (Nawab Malik also shared photos of Wankhede’s first wedding on Twitter)
मलिक यांच्या आरोपाला उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले होते, माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. आणि माझी आई एक मुस्लिम आहे. याचा मला अभिमानही आहे. मी एक हिंदू आहे. नवाब मलिक यांनी सादर केलेले प्रमाणपत्र खोटं असून, ते माझ्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याचंही समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं. (The certificate submitted by Nawab Malik is false and is interfering in my personal life)
मात्र दाऊद हे नाव नेमकं आलं कुठून? हे आता समीर वानखेडेंचे काका शंकर कचरूजी वानखेडे यांनी एका मीडिया वेबसाईटशी बोलताना स्पष्ट केले आहे. आम्ही कधीही कोणत्याही राजकारण्याची संबंध कधी ठेवला नाही. आणि ठेवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. समीर वानखडे हा एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून, त्याच्यावर झालेले हे आरोप खोटे असल्याचे देखील समीरचे काका शंकर कचरूजी सांगतात.
वाशिम जिल्ह्यात रीसोडमध्ये ‘वरूड’ असं आमच्या मुळ गावाचं नाव आहे. या गावात आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी शेत जमीन, असल्याचं समीर वानखेडे यांचे काका शंकर कचरूजी सांगतात. आम्ही नंतर लोखंडवाला परिसराजवळ राहत होतो. लोखंडवाला परिसरात सगळे मुसलमान असल्यामुळे, त्यांनी समीरच्या वडिलांना तुमचं नाव ज्ञानदेव कसं काय असं विचारायचे? आणि आम्ही तुम्हाला ‘दाऊत’ बोलू शकतो का? अशी विचारणा केली.
त्यावेळी समीर यांचे वडील ज्ञानदेव म्हणाले, मला तुम्ही ‘दाउद’ म्हणा, अकबर म्हणा, काहीही म्हणा,असं त्या मुस्लिम बांधवांना म्हणाले. आणि त्यानंतर ज्ञानदेव वरून त्यांचं नाव ‘दाऊद’ पडल्याचे वानखेडे यांचे काका ‘शंकर कचरू वानखेडे’ यांनी एका मीडियाशी बोलताना सांगितले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.