मोठी बातमी! आर्यन खानकडे ड्रग्स सापडलेच नाही; एसआयटी तपासात झाले स्पष्ट, वानखेडेनेच रचला कट

0

दोन ऑक्टोबरला कार्डिलिया क्रूजवर छापा टाकत, एनसीबीचे (NCB) तत्कालीन जोहरी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर, एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटशी( international drug racket) संबंध असल्याचं प्रथम दर्शनी पाहायला मिळत असल्याचं म्हटलं. मात्र आता या प्रकरणाचा तपास करत असणाऱ्या एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या अहवालात आर्यन खानकडे( Aryan Khan) ट्रग्स सापडलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

समीर वानखेडे यांनी आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर, देशात या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली. या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या स्वतंत्र साक्षीदारांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने, हे प्रकरण चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. एवढेच नाही तर, समीर वानखेडे यांनी केलेली ही कारवाई खंडणीसाठीच केला होती. असा खुलासा या प्रकाराशी संबंधित असणाऱ्या प्रभाकर साईल (Prabhakar Sail) या साक्षीदाराने केल्याने एकच खळबळ उडाली.

किरण गोसावी, (Kiran Gosavi)मनिष भानुषाली (Manish Bhanushali) यांनी हे प्रकरण घडवून आणल्याचा आरोप झाल्यानंतर, समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यातच नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखडे हा माणूस फेक असल्याचं म्हटलं. आणि त्याने मिळवलेली ही नोकरी खोटी कागदपत्रे सादर करून मिळवली, असल्याचा धक्कादायक खुलासा दे त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाचे स्वतंत्र असणारे, साक्षीदार आणि नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणावरचा सगळा फोकस आर्यन खानवरून समीर वानखेडेंकडे वळला.

समीर वानखेडेवर अनेक आरोप झाल्यानंतर त्यांना एनसीबीच्या या पदावरून पायउतार व्हावं लागलं. एवढेच नाही तर या प्रकरणाचा तपास देखील त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. आणि या प्रकरणासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आली. आता एसआयटीने ( SIT) या प्रकरणाचा तपास करताना एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. यात आर्यन खानकडे ड्रग्स सापडलं नसल्याचं, या समितीने म्हटले आहे. त्याचबरोबर आर्यन खानचा कुठल्याही मोठ्या ड्रग्स रॅकेटची संबंध नसल्याचं, आढळून येत असल्याचे देखील या अहवालात म्हटलं आहे.

आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटकडे (Arbaaz Marchand) ड्रग्ज सापडलं होतं. मात्र तो आर्यन खानसाठीच घेऊन आला होता, हे कुठेही सिद्ध होत नाही. शिवाय त्याच्याकडे सापडलेले ड्रग्स हे बिझनेस प्रमाणापेक्षा कमी होतं. असंही या चौकशी अहवालात समोर आले आहे. आर्यन खानला आता या प्रकरणात लवकरच क्लिनचीट मिळण्याची शक्यता असून, या अहवालामुळे, समीर वानखेडे आता चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

काय होता समीर वानखेडेंचा दावा?

तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोंबरला कार्डिलिया क्रूजवर छापा टाकत, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर या प्रकरणाची माहिती देताना, एनसीबीने अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज सापडले होते असं म्हटलं. त्याचबरोबर हे ड्रग्ज अरबाज मर्चंट हा आर्यन खानसाठीच घेऊन आला होता. शिवाय अरबाज मर्चंटकडे असणारे हे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटनेच पुरवलं होतं. त्यामुळे आर्यन खानचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटशी संबंध असल्याचं आढळतं. असं या समीर वानखेडेंनी म्हटलं होतं.

हेही वाचा- भारताच्या विकेटकीपरचा खुलासा;’कोहली’ त्या दिवशी ड्रेसिंग रूममध्ये कोपऱ्यात ढसाढसा रडत होता

अजित पवार झुकले! या कारणांमुळे करतायत मोदींचं कौतुक; लवकरच होणार धमाका…

सर्वात जास्त निर्यात रशियात होत असल्याने शेतकरी चिंतेत; रशिया युक्रेन युद्धाचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार? वाचा सविस्तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.