भारताच्या विकेटकीपरचा खुलासा; कोहली ‘त्या’ दिवशी ड्रेसिंग रूममध्ये कोपऱ्यात ढसाढसा रडत होता
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्यासाठी मोहलीच्या मैदानावर जोरदार तयारी झाली आहे. विराटचा सन्मान म्हणून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या कसोटी सामन्यात पन्नास टक्के लोकांना मॅच पाहण्यासाठी प्रवेश देखील दिला जाणार आहे. विराट हा भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा केवळ बारावा खेळाडू ठरणार आहे.
आतापर्यंत केवळ कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, व्ही व्ही एस लक्ष्मण, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग व इशांत शर्मा या खेळाडूंनी शंभर कसोटी सामन्यांचे प्रतिनिधित्व केले आहे. या महान खेळाडू नंतर या यादीत आता विराटची वर्णी लागली आहे. विराट कोहलीचा इथर्यंतचा प्रवास हा खूप आव्हानात्मक आणि खडतर राहिला आहे. मात्र या सगळ्यांवर मात करत त्याने आता जगातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून मान मिळवला आहे.
२००८ साली विराटच्या नेतृत्वात भारताने अंडर १९ विश्वचषक जिंकला. या कामगिरीच्या जोरावर त्याला २००८ लाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संघी मिळाली. आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस त्याचा खेळ बहरतच गेला. मात्र या पूर्वी त्याच्या आयुष्यात अनेक दुःखाचे डोंगर कोसळल्याचे पाहायला मिळाले आहे.
रणजी सामन्यातला 2006 ला अशीच एक दुःखद घटना त्याच्या आयुष्यात घडली. दिल्लीच्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या 2006 मध्ये दिल्लीचा खेळाडू पुनित बिश्त ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करत असताना, त्याने पाहिले तर, एका खोलीत केवळ 17 वर्ष वय असणारा, विराट कोहली ढसाढसा रडत असल्याचे, त्याने पाहिले. विराटचे डोळे रडून रडून लाल झाले होते. बिश्तला नक्की काय झालं आहे, याची कल्पना नव्हती. नंतर सगळ्यांना समजले, कोहलीचे वडील प्रेम यांचे काही तासांपूर्वीच ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले आहे.
आदल्या दिवशी विराट आणि बिश्त दिल्लीसाठी फलंदाजी करत होते. ही बातमी समजल्यानंतर दिल्लीचे कोच चेतन चौहान आणि अनेक खेळाडूंनी विराटला घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र विराटने आपला संघ अडचणीत आहे, आणि मी फलंदाजी करतोय, त्यामुळे त्याने खेळण्याचा निर्णय घेतला. आणि ९० धावांची खेळी केली. एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळत असताना विराटने घेतलेला हा निर्णय त्याला एक दिवस महान खेळाडू बनवणार, हे त्याच दिवशी ठरलं होतं, अशा खुलासा एकेकाळी दिल्लीचा विकेटकीपर राहिलेला बिश्तने केला आहे.
त्या प्रसंगाची आठवण करून देताना बिश्त म्हणाला, ‘अशा वेळी विराटला मैदानात उतरण्याची हिंमत कुठून आली? या गोष्टीचं आजही मला आश्चर्य वाटत. मोहालीत चार मार्चला विराट आपला 100वा कसोटी सामना खेळणार आहे, यापूर्वी बिश्तने घडलेल्या घटनेची आठवण करून देताना तो बोलत होता.
बिश्तला आजही 16 वर्षांपूर्वीची विराट बाबत घडलेली ती दुःखद घटना आठवते, त्याने आपल्या कुटुंबात परतावे, असे संघाचे कोच आणि संघातील प्रत्येक खेळाडूंचे मत होते, पण विराट कोहलीचे क्रिकेट प्रेम अफलातून होते. तो वेगळ्याच मातीचा बनलेला आहे. हे आम्हा सर्वानाच त्या दिवशी अनुभवायला मिळाले. असं बिश्त या घटनेला उजाळा देताना म्हणाला. माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतची १५२ धावांची विराटसोबत केलेली भागीदारी सर्वात संस्मरणीय असल्याचे त्याने सांगितले.
बिश्त पुढे म्हणाला, ‘विराट त्या सामन्यात उत्तम फलंदाजी करायचा. तो चांगले शॉट्स खेळत होता. आम्ही मैदानावर फलंदाजी करत असताना संभाषण खूप कमी झाले. तो म्हणायचा,मला खूप लांब खेळायचं आहे. मला काहीच सुचत नव्हते. मला एकीकडे वाटायचे, विराटच्या डोक्यावर हात ठेवून सांत्वन करावे, तर दुसरीकडे, माझे मन म्हणायचे, विराटला त्याचा कामावर लक्ष केंद्रित करू द्यावे. असंही बिश्त म्हणाला.
हेही वाचा– अजित पवार झुकले! या कारणांमुळे करतायत मोदींचं कौतुक; लवकरच होणार धमाका…
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस; निर्यात वाढवण्यासाठी ‘हे’ विशेष प्रयत्न सुरू…
पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम