मोजणी: ‘असा’ करा घरबसल्या जमीन मोजणीसाठी अर्ज; किती शुल्क आकारलं जातं, काय आहे ई-मोजणी प्रणाली? जाणून घ्या सविस्तर..
मोजणी: अलीकडच्या काळात शेतीवरून मोठमोठे वाद होताना पाहायला मिळतात. वारंवार सांगून देखील आपला शेजारी आपल्या शेताचा बांध पोकरताना पाहायला मिळतो. यावरून अनेक वेळा कडाक्याचं भांडण देखील होतं असतं. बांधाच्या वादावरून मारामाऱ्या झाल्याच्या घटना देखील आपण नेहमी ऐकतो. शेजाऱ्याने आपला बांध वारंवार पोकरल्यामुळे आपली शेतजमीन जेवढी सातबाऱ्यावर नमूद आहे, त्याच्यापेक्षा कमी असल्याचं शेतकऱ्यांना नेहमी वाटतं.
आता जर तुम्हाला आपल्या शेजारच्या शेतकर्याने अतिक्रमण केलं आहे, असं वाटत असले तर, घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. किंवा त्याच्याशी वाद घालण्यात देखील काहीही अर्थ नाही. तुम्ही सरळ आपल्या शेतजमिनीची शासकीय मोजणी करणं गरजेचे आहे. शेतकऱ्याला जर आपले शेतजमीन शासकीय पद्धतीने मोजायचे असेल, तर आम्ही तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहोत.
शासकीय पद्धतीने आपल्या शेतजमिनीच्या मोजणीचा ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा? यासाठी किती शुल्क आकारले जाते? सोबतच यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यासंदर्भातील सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
मोजणीचा अर्ज आणि कागदपत्रे
आपली शेतजमीन सातबाऱ्यावर नमूद केल्याप्रमाणे नाही, असं वाटत असेल, किंवा आपल्या शेतजमिनीच्या हद्दीबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास, तुम्ही भूमी अभिलेख विभागाच्या तालुका पातळीवर उप-अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयांमध्ये अर्ज करू शकता. या अर्जासंदर्भातला सविस्तर नमुना महाराष्ट्र शासनाच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल. आता आपण शेतकऱ्यांनी हा अर्ज कसा भरायचा या संदर्भात माहिती घेऊ.
असा करा अर्ज
तुमच्याकडे जर ‘मोजणीसाठी अर्ज’ उपलब्ध नसेल तर तुम्ही bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करू शकता. तुम्ही जो फॉर्म हातामध्ये घेतला आहे, त्या ‘फॉर्म’चं शीर्षक “मोजणीसासाठी अर्ज” असं असेल. यात सर्वप्रथम तुम्हाला, तुमची शेतजमीन ज्या तालुक्यात आहे, त्याच तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकणं आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला जो पहिला पर्याय दिसेल, त्या पर्यायांमध्ये अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, तुमचा संपूर्ण पत्ता तालुका तसेच जिल्ह्याचं देखील नाव या पर्यायात तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे.
यानंतर तुमच्या हातामध्ये असणाऱ्या फॉर्ममध्ये दुसरा पर्याय “मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील” असा आहे. या फॉर्ममधील “मोजणीच्या प्रकार” या पर्यायासमोर तुम्हाला मोजणीचा कालावधी आणि उद्देश देखील लिहावा लागणार आहे. यानंतर समोरच्या पर्यायांमध्ये तुम्हाला गावाचं नाव, तालुक्याचे नाव, आणि मोजणी करायची शेतजमीन ज्या गटात येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे.
आता तुमच्या हातामध्ये असणाऱ्या फॉर्ममध्ये तिसरा पर्याय “सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम.” असा असणार आहे. या रकान्यात तुम्हाला मोजणीच्या ‘फी’ची रक्कम लिहावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला चलन आणि दिनांक लिहावा लागणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, यात किती फी भरायची आहे. तर याविषयी देखील आम्ही सविस्तर सांगत आहोत.
आता हा रकाना भरताना एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे, कुठल्याही सरकारी मोजणीची ‘फी’ ही क्षेत्र किती आहे, यानुसार ठरतं असते. त्यासोबतच किती कालावधीत ही मोजणी करायची आहे, यावर देखील ही रक्कम ठरवली जाते. त्यामुळे तिसरा पर्याय भरताना तुमचं क्षेत्र किती आहे? आणि तुम्हाला किती दिवसांत मोजणी करायची आहे? याचा विचार करूनच तुम्हाला तिसरा पर्याय भरावा लागणार आहे. आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया शुल्क कसे आकारले जाते.
साधी मोजणी, तातडीची मोजणी, आणि अति तातडीची मोजणी, असे जमिनीचे एकूण तीन प्रकार पडतात. साधारणपणे या तीन प्रकारात जमीन मोजली जाते. यात तुम्हाला जी साधी मोजणी असते, ती सहा महिन्यात केली जाते. तर तातडीच्या मोजणीसाठी तीन महिने कालावधी लागतो. आणि अति तातडीच्या मोजणीसाठी तुम्हाला २ महिने मोजावे लागतात. आता तुम्हाला एका हेक्टरची साधी मोजणी करायची झाल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणी करता 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये याप्रमाणे शुल्क आकारलं जातं. हे सविस्तर समजून घेतल्यानंतर, तुम्ही तिसऱ्या पर्यायात जो ‘कालावधी’ आणि ‘रक्कम’ चा पर्याय आहे, यात सविस्तर माहिती लिहायची आहे.
आता यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मवर ‘उद्देश’ हा पर्याय दिसेल. या पर्यायात तुम्हाला मोजणीचा उद्देश लिहावा लागणार आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर, यात तुम्ही माझ्या शेजाऱ्याने शेतीची मशागत करताना माझा बांध पोकरला, आता तो बांध खाली असल्याचं म्हणत आहे. या पद्धतीने तुम्ही उद्देश लिहू शकता. माझ्या शेतजमिनीची हद्द जाणून घेण्यासाठी मी हा अर्ज करत आहे, असे देखील तुम्ही ‘उद्देश’ या पर्यायात लिहू शकता.
यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मवर चौथा पर्याय दिसेल, ज्याचं नाव “सातबारा उताऱ्याप्रमाणे जमिनीचे सहधारक” असे असेल. या पर्यायांमध्ये तुम्हाला ज्या गटाची मोजणी करायची आहे, त्या गट नंबरच्या सातबाऱ्यात कोणा-कोणाची नावे आहेत, त्या सर्वांची नावं, पत्ता आणि या मोजणीसाठी या सगळ्यांची सहमती असणाऱ्या संमतीदर्शक सह्या लागणार आहेत.
यानंतरच्या पर्यायांमध्ये म्हणजेच पाचवा पर्याय तुम्हाला “लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता” असा दिसेल, यात तुम्हाला तुमच्या क्षेत्राच्या चारही बाजूंच्या म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशांना कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहे, त्या सर्व शेतकऱ्याची नावे तसेच पत्ता तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे.
आता तुम्हाला या फॉर्मच्या शेवटी सहाव्या पर्यायासमोर “अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन” दिलेलं दिसणार आहे. तुम्हाला या अर्जाबरोबरच, मोजणी ‘फी’चं चलन, 3 महिन्यांच्या आतला सातबारा, इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. आता तुम्ही अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर, या कागदपत्रांसहीत भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा करायचा आहे.
आता तुम्ही संबंधित कार्यालयात भरलेला अर्ज जमा केल्यानंतर, हा अर्ज ई-मोजणी या प्रणालीमध्ये फीड केला जातो. तुम्ही केलेला अर्ज आणि जोडलेल्या कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर, तुमच्या मोजणीला फी किती लागणार आहे? या संदर्भातलं एक चलन काढलं जातं. हे चलन शेतकऱ्यांना बँकेत जाऊन भरावं लागणार आहे.
ही प्रोसेस झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोजणीचा नोंदणी क्रमांक तयार केला जातो. आणि मग शेतकऱ्यांनी केलेल्या मोजणीच्या अर्जाची पोच पावती त्यांना दिली जाते. या पोचपावतीमध्ये, मोजणीचा किती दिनांक आहे, याची तारीख दिलेली असते. तसेच मोजणीला कोणता अधिकारी येणार आहे? त्याचं नाव आणि मोबाईल नंबर देखील या पोचपावतीमध्ये तुम्हाला दिलेला दिसेल. सोबतच या कार्यालयाच्या प्रमुखाचा मोबाईल नंबर देखील तुम्हाला या पोचपावतीत पाहायला मिळेल.
काय आहे ई-मोजणी प्रणाली
आपण मोजणी संदर्भात पाहिलेली सगळी प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीची आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो, सोबत मानसिक त्रास देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे जे भूमी अभिलेख विभाग आहे, ते ऑनलाईन पद्धतीनं देखील जमीन मोजणी संदर्भात प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेलाच, ई-मोजणी प्रक्रिया असं म्हटलं जातं. मात्र ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून यावर काम सुरू आहे.
हे देखील वाचा Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी असा करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर..
खत: तुमच्या मोबाईलवर असा करा चेक जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..
Viral video: काळजाचा ठोका चुकवणारी मुंगसाची आणि सापाची ही लढत एकदा पहाच..
E Shram Card: केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! ई-श्रम कार्ड धारकांना मिळणार दोन लाख रुपये..
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा’ अगदी सोप्या भाषेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम