Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..
Mahindra Thar Price Features Mileage: आपल्या स्वप्नातील एक चार चाकी गाडी आपल्याकडे असली पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत देखील घेत असतो. आज आम्ही अशाच एका SUV बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ही गाडी घेण्यासाठी प्रयत्न कराल. भारतीय ब्रॅण्डची महिंद्रा यांनी बनवलेली SUV अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या SUV चे नाव महिंद्रा थार आहे. ही एक भारतातील शक्तिशाली SUV आणि राइड-हेलिंग म्हणून ओळखली जाते. महिंद्र थारने पाठीमागच्या महिन्यात तब्बल 5,072 गाड्यांची विक्री केली.
महिंद्रा यांच्या ऑफ-रोड SUV ची प्रत्येक महिन्याला मोठया प्रमाणात विक्री होते. महिंद्र थार हे AX(O) आणि LX या दोन ट्रिम लेव्हलमध्ये तब्बल 10 प्रकारांमध्ये विकली जाते. भन्नाट स्टायलिश आणि जबरदस्त ताकद असणाऱ्या या SUV ची किंमत देखील जास्त नाही. आणि म्हणून ही SUV खरेदी करण्याकडे जास्त कल वाढला आहे. ही गाडी 13.17 लखांपासून सुरू होते, आणि याचे टॉप मॉडेल ग्राहकांना 15.53 लाख मिळते. (एक्स-शोरूम) Mahindra Thar हीची एवढ्या मोठ्या प्रमाणात का मागणी वाढली आहे. याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात.
किंमत वैशिष्ट्ये आणि मायलेज:
भारतातील SUV सेगमेंटमध्ये, Mahindra & Mahindra यांनी आतापर्यंत अनेक जबरदस्त SUV ग्राहकांच्या भेटीला आणल्या आहेत. ज्या वेगवेगळ्या बजेटमध्ये आहेत. Mahindra & Mahindra यांनी बाजारात आणलेली महिंद्रा बोलेरो ही गाडी प्रचंड विकली गेली. विशेषतः खेडेगावातल्या शेतकऱ्यांनी ही गाडी मोठ्या प्रमाणत खरेदी केली. या गाडीनंतर महिंद्रा थार आणि महिंद्रा XUV700 या गाड्यांनी देखील ग्राहकांच्या मनावर राज्य केले आणि अजूनही करतायत.
दमदार लुक-वैशिष्ट्यांसह महिंद्रा थार या गाडीने अक्षरशः ग्राहकांना वेड लावले आहे. या गाडीची प्रचंड लोकप्रियता वाढली असून, लोक या लूकवर प्रचंड फिदा आहेत. तुम्ही जर एका उत्कृष्ट गाडीच्या शोधात असाल, आणि तुमच्या लिस्टमध्ये महिंद्रा थार SUV असेल, तर आम्ही तुम्हाला या SUV विषयी सांगणार आहोत. ही SUV डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये येते. या दोन्हीं पर्यायांची किंमत आणि वैशिष्ट्ये त्याचबरोबर यांचे मायलेज काय आहे?याचा तपशील जाणून घेऊयात.
दोन ट्रिम स्तरांमध्ये एकूण वेरिएंट्स
महिंद्र थार ही 4-सीटर SUV असून, या SUV ची सुरवातीची किंमत 13.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत १५.३३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्हीं व्हेरिएंट पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये त्याचबरोबर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. ही SUV एकूण 6 कलरमध्ये मिळत असून, अनेक आकर्षक कलर ग्राहकांना मिळतात. मायलेजचा विचार करायचा झाल्यास, महिंद्र थारचे मायलेज तब्बल 15.2 kmpl पर्यंत देण्यात आले आहे. त्याबरोबरच महिंद्रा थार एसयूव्ही AX(O) आणि LX या दोन ट्रिममध्ये एकूण 10 प्रकारांचे ऑप्शन ग्राहकांना मिळणार आहे.
Mahindra Thar च्या सर्व मॉडेलच्या किंमती जाणून घ्यायच्या झाल्यास, बेस मॉडेल Mahindra Thar AX Opt Convert Top पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटची किंमत केवळ 13.17 लाख ठेवण्यात आणि आहे. (एक्स-शोरूम) त्याचबरोबर महिंद्रा थार AX ऑप्ट कन्व्हर्ट टॉप डिझेल मॅन्युअल व्हेरियंटची किंमत ही 13.38 लाख ठेवण्यात आली आहे. Mahindra Thar AX Opt हार्ड टॉप डिझेल मॅन्युअल वेरिएंटची किंमत 13.79 लाख रुपये असणार आहे. महिंद्रा थारचे जे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे ते Mahindra Thar LX 4-Str हार्ड टॉप मॅन्युअल हे आहे. हे पेट्रोलवर चालणारी SUV आहे. या व्हेरियंटची किंमत 13.79 लाख रुपये देण्यात आली आहे.
सर्वात जास्त किंमत असणारी..
महिंद्रा थार एलएक्स कन्व्हर्ट टॉप मॅन्युअल डिझेल व्हेरिएंटची किंमत ही 13.99 लाख रुपये आहे. तर Mahindra Thar LX हार्ड टॉप मॅन्युअल डिझेल व्हेरियंटची किंमत 14.10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. महिंद्रा थार एलएक्स कन्व्हर्ट टॉप ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटची किंमत 15.22 लाख आहे. तर Mahindra Thar LX हार्ड टॉप ऑटोमॅटिकची पेट्रोल व्हेरियंटवर चालणारी सर्वात महाग SUV असून हीची किंमत 15.33 लाख रुपये आहे. त्याचबरोबर महिंद्रा थार एलएक्स कन्व्हर्ट टॉप ऑटोमॅटिक डिझेल व्हेरियंटची किंमत 15.43 लाख रुपये आहे. ही थारच्या सर्व प्रकारात सगळ्यात टॉप मॉडेल आहे.
हे देखील वाचा रेडमीचा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ..‘
या’ कारणांमुळे उडालाय उष्णतेता भडका; ..उन्हात ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा उष्माघातामुळे होईल…
राज कुंद्रा नंतर शिल्पा शेट्टीच्या आईनेही शिल्पाचे तोंड केलं काळ; प्रकरण वाचून बसेल धक्का...
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम