Sharad Pawar: फडणवीसांनी पवारांची लाईकीच काढली; म्हणाले, “तुमच्या जिवावर अजून महाराष्ट्रात…,”

0

2019 चा विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला (bjp) सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र या निवडणुकीत एकत्र लढलेल्या शिवसेनेने( shivsena) आपली भूमिका वेगळी जाहीर केल्यामुळे, भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करता आले नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi)  स्थापन झालं. शरद पवार आणि संजय राऊत (Sharad Pawar and Sanjay Raut) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती असा कारनामा झाल्याचा पहिला मिळालं.

सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही, तर दुसरीकडे शरद पवार यांनी कूटनीतीने आपल्याला विरोधी पक्षात बसवले. या द्वेषापोटी भाजप कडून शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्ले होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यामुळे, महाराष्ट्रात आपले सरकार स्थापन होणार नाही, असे दिसत असल्याने भारतीय जनता पार्टीने देखील अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात मिळवणी करत महाराष्ट्रात दोन दिवसाचा सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यांचा हा डाव शरद पवार यांनी दोन दिवसात हाणून पाडला. कदाचित म्हणून देखील शरद पवार यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा राग असल्याचं बोललं जातं.

भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर अलिकडच्या काळात सातत्याने हल्ला करताना पाहायला मिळत आहे. शरद पवार देखील भाजपने केलेल्या टीकेला तेवढ्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. नुकतेच तरूण आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीला यापुढेही मी सत्तेत येऊ देणार नसल्याचं म्हटलं. पवारांच्या या विधानामुळे आता भारतीय जनता पार्टी अधिक आक्रमक झाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पार्टीने शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

भाजपा महाराष्ट्राने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, आदरणीय पवार साहेब तुम्ही भाजपची काळजी करू नका. आधी स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकला आहात. तुमच्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री कधी बनवू शकला नाही. तुम्ही तुमचा मुख्यमंत्री बनवून दाखवा. अशी जोरदार टीका भाजपाने केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections 2022) पंजाबमध्ये भगवंत मान (bhagavant man) यांच्या नेतृत्वाखाली अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी घवघवीत यश संपादन केले. तब्बल 92 आमदार निवडून आणत, अरविंद केजरीवालांनी एकहाती सत्ता मिळवत इतिहासाची नोंद केली. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या दहा वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत तब्बल दोन राज्यात एक हाती सत्ता मिळवत आपला मुख्यमंत्री बसवला. मात्र दुसरीकडे शरद पवार यांना 55 वर्षे आपल्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्रात कधी स्वतःच्या जीवावर मुख्यमंत्री करता आला नाही. अशी तुलना भारतीय जनता पार्टीने केली आहे.

दरम्यान गोव्यात (goa)  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांचा रोडशो नागपुरात (Nagpur) आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हंटले, महाराष्ट्रात भाजपचे एकहाती सरकार आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. याच विधानावर जोरदार टीका करताना शरद पवार यांनी यापुढे, मी महाराष्ट्र भाजप सरकार येऊ देणार नसल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीचे अनेक युवा आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले असताना, त्यांनी हे विधान केलं.

राजकीय घडामोडींवर तुम्ही जास्त विचार न करता आपल्या मतदार संघात विकास कामांवर भर द्या. या लोकांशी लढाई करण्यात आम्ही समर्थ आहोत, असं म्हणत शरद पवार यांनी आमदारांना विश्वास देत, मनोबल वाढवण्याचं काम केलं. मी लवकरच राज्यव्यापी दौरा करणार आहे. अलीकडच्या काळात तरुण आमदार गरज नसताना नको त्या विषयावर बोलताना पाहायला मिळतात. मात्र त्यांनी बोलताना सांभाळून बोलण्याची गरज असल्याचं देखील शरद पवारांनी आमदारांना म्हटलं. नवाब मलिक यांच्याकडे असणारी खाती सध्या राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाड सांभाळत असल्याचे, देखील त्यांनी यावेळी म्हटलं.

हे देखील वाचा फडणवीसांच्या षडयंत्रामुळे अनिल देशमुखांचा गेला बळी; शंभर कोटीच्या आरोपातून देशमुख यांना क्लीन चिट..

मोदींना जमलं नाही ते बजाज यांनी करून दाखवलं; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, वाचा सविस्तर..

मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ..

पोलीस स्टेशनमध्ये सुरू असलेली  ‘तसली’ पार्टी नागरिकांनी रंगेहात पकडली; वर्दीला काळीमा फासणारी घटना…

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त…

या’ कारणामुळे खतांच्या किंमती दुप्पट वाढल्या; दुप्पट किंमत मोजूनही आता मिळणार नाही खत, वाचा सविस्ततर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.