शपथविधी पूर्वीच आम आदमीचा बुरखा फाटला टराटरा; पंजाबच्या शेतकऱ्यांना केजरीवालचा दणका, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

0

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या (vidhansabha election result 2022) विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला तो पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलेल्या करिष्म्याचा. इतर राज्याच्या तुलनेत पंजाबची निवडणूक (punjab election) काँग्रेससाठी (Congress) सोपी मानली जात होती. मात्र सगळ्यांचे अंदाज चुकवत भगवंत मान (bhagvant man) यांच्या नेतृत्त्वात पंजाब (punjab) विधानसभा निवडणूक (assembly election) लढवली आणि ऐतिहासिक विजय देखील मिळाला. मात्र आता पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वीच केजरीवाल आणि भगवंत मान यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पाचही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभ झाला. काँग्रेस आणि उत्तराखंड या दोन राज्यात काँग्रेस घवघवीत यश संपादन करेल, असं चित्र असताना इतर राज्याबरोबर या दोन्हीं राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महागाई, बेरोजगार, विकास,भ्रष्टाचार याने देश त्रस्त असतानाही चार राज्यात भारतीय जनता पार्टीने एकहाती सत्ता मिळवली. भारतीय जनात पार्टीने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने अनेक राजकीय विश्लेशकांना धक्का बसला. मात्र याच्यापेक्षाही जास्त धक्का पंजाबमध्ये ‘आप’ने केलेल्या कामगिरीची बसला.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 117 जागांपैकी आम आदमी पक्षाने तब्बल 92 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. तर या निवडणुकीत काँग्रेस मोठे यश संपादन करेल असं वाटत असताना, त्यांना केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागलं. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार चरणजीत सिंग चरणी प्रकाश सिंह बादल यांचादेखील आम आदमी पार्टीचा उमेदवारांनी पराभव केला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार दोन्हीं जागेवर पराभूत झाले.

आम आदमी पार्टीने विजयानंतर हे सरकार आम आदमीचे असून, ज्याप्रमाणे दिल्लीत काम करण्यात आलं आहे त्याचपद्धतीने पंजाबचा देखील कायापालट केला जाईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र आता मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीपूर्वीच ‘आम आदमी पार्टी’ने आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ‘भगवंत मान’ यांनी आपल्या शपथपदासाठी जोरदार तयारी केली आहे. ही तयारी करत असताना, ‘खटखडकलां’मध्ये तब्बल ४० एकर गव्हाचे उभे पीक कापून टाकले आहे, आणि त्या जागेवर मैदान करण्याचा कारनामा भगवंत मान यांनी केला आहे.

आपल्या शपथविधी कार्यक्रमासाठी तब्बल ४० एकर गव्हाचे पीक कापून त्याठिकाणी मैदान बनवण्यात आल्याने आता यावर काँग्रेससह अनेकांनी जोरदार टीका केली आहे. एकीकडे आम आदमीच्या गोष्टी करायच्या, दुसरीकडे अशा प्रकारे उभी पिकं नष्ट करायची. वारे आम आदमी! अशी टीका काँग्रेसने केली आहे. पंजाबच्या जनतेने ‘आप’ला स्पष्ट बहुमत दिले असले तरी, येणाऱ्या काळात पंजाबच्या जनतेला आम आदमी पार्टीचा विजय झाला, याचा पश्चाताप होईल. असे भाकित अनेकांनी केले आहे, त्यात ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार राजू परुळेकर यांचा देखील सहभाग आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर नरेंद्र मोदी पेक्षाही विचित्र राजकारण अरविंद केजरीवाल करतात. येणाऱ्या काळात जनतेला ते दिसेलही असंही राजू परुळेकर म्हणाले आहेत.

हे देखील वाचा ‘या’ कारणामुळे अण्णा हजारेंना केजरीवालने मारण्याचा कट रचला होता; कोणी वाचवलं अण्णांना.. 

मोठी बातमी! १०० कोटींसाठी अण्णा हजारेंनी १३ दिवस उपोषण केल्याचं उघड; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

अजित पवारांनी केला गेम! अर्थसंकल्पात तब्बल 57 टक्के निधी राष्ट्रवादीच्या खात्याला; शिवसेनेला केवळ 16 तर कॉंग्रेसला..

‘या’ पद्धतीने मार्चमध्ये केवळ दोनच भाज्या करा, आणि लाखो रुपये कमवा..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! तरुणांच्या टोळक्याने भररस्त्यात तरुणीसोब केले अश्लील घाणेरडं कृत्य; व्हिडिओ व्हायरल..

उत्तर प्रदेश निवडणुक ‘या’ जातीय समीकरणावर झाली; वाचा कुठल्या पक्षाला कोणी आणि किती टक्के मतदान केले.

.Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने बाजारात केलाय कहर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.