महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने सोशल मीडियावर भामट्याचा धुमाकूळ; अनेकांना दमदाटी आर्थिक फसवणूक

0

माळशिरस प्रतिनिधी:  महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचे सांगून माळशिरस मधील पिंपरी या गावातील तरुणांना मानसिक त्रास, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आता समोर आला आहे. हा भामट्या वेगवेगळी अकाउंटस् काढून तरुणांना नाहक बदनाम आणि मानसिक त्रास देत असल्याने, संबधित पिडीत तरूण चिंतेत असल्याचे समोर आले आहे.

या बनावट फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाला मानसिक त्रास देऊन, त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. हे अकांऊट गेल्या दोन वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पहायला मिळत आहे. या अकाउंटला फॉलो करणारे अनेकजण पिंपरी गावचेच आहेत. पिंपरीतील अनेकांच्या मनात पोलीस उपनिरीक्षक प्रियंका कर्चे नक्की कोण आहे, याविषयी उत्सुकता असल्याने अनेकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अशी व्यक्ती कोणी प्रियंका पोलीस उपनिरीक्षक असल्याचे दिसत नाही असं स्थानिक तरूण सांगतात. विशेष म्हणजे, प्रियंका कर्चेने तरुणांना केलेल्या चॅटिंगमध्ये वैभव बजबळकर हा माझा मावसभाऊ आहे. असंही सांगत आहे.

प्रियंका कर्चे या अकाऊंटवरून वैभव माझा मावसभाऊ आहे, त्याच्या नादी लागू नकोस अशीही धमकी अनेक तरुणांना देण्यात आली आहे. विनाकारण माफी मागायला लावलेले चॅट देखील अनेकांना पाठवले असून, तरुणांची बदनामी देखील केल्याचा प्रकार आता समोर आला आहे. महाराष्ट्र लोकशाहीने या प्रकरणाच्या खोलात जाऊन पडताळणी केल्यानंतर, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पिडीत अनेक तरुण आता समोर येऊ लागले आहेत.

प्रियंका कर्चे बरोबरच पोलीस उपनिरीक्षक (PSI) अजित मोरे पाटील या अकाउंटवरून देखील अनेक तरुणांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या अकाउंटवरून अजित मोरे पाटील हा प्रियंका कर्चे ही माझी पत्नी असल्याचे सांगत आहे. एकीकडे प्रियंका कर्चे ही अनेक तरुणाशी बोलतेय, तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी तिचा पती असल्याचे सांगणारा अजित मोरे पाटील, त्याच तरुणांशी माझ्या पत्नीशी का चॅटिंग केली? असे सांगून धमक्या देत असल्याचा अजब प्रकार आता समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार गेल्या दोन वर्षापासून सुरू असल्याचं देखील समोर आले आहे. पिंपरी गावातील अनेक तरुणांना शिवीगाळ, धमकी, पोलीस वर्दीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करून, तुझा मोबाईल नंबर दे, तुला पाहून घेतो, अशा प्रकारे बऱ्याच तरुणांना मानसिक त्रास दिला गेला आहे. विशेष म्हणजे, आपण फलटण शहर पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक असल्याचे देखील सांगत आहे.

प्रियंका कर्चे अजित मोरे पाटील, या अकांऊट्स बरोबरच ‘वर्षा शिंदे’ या फेसबुक अकाऊंटवरून देखील गावातील तरुणांची नाहक बदनामी केल्याचं पाहायला मिळत आहे. या अकाउंटवरून देखील आपण महाराष्ट्र पोलीस दलात असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक तरुणाचे चॅटिंग दुसऱ्या तरुणांना पाठवत, मला हे लोक देखील भितात असं ज्ञान देखील वर्षा शिंदे नावाच्या अकाउंटवरून पाजळले आहे. पडताळणी केल्यानंतर या तीनही अकाऊंट चालविणाऱ्या व्यक्ती यांचा महाराष्ट्र पोलीस दलाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होताना दिसत आहे.

प्रियंका कर्चे, अजित मोरे पाटील, वर्षा शिंदे सोबत प्रणिता गोडसे, हे देखील अकाउंट सोशल मीडियावर सक्रिय असून, अशाच प्रकारे पिंपरीतील तरुणांना आणि आटपाडी येथील एका तरुणाला धमकवण्यात आले आहे. त्याचसोबत प्रणिता गोडसे देखील आपण प्रियांका कर्चे व अजित मोरे पाटील यांची नातेवाईक असल्याचं सांगत आहे. या तरुणीच्या अकाउंटला वापरण्यात आलेले फोटो हे दुसऱ्याच एका तरुणीचे असून, हे आपलेच फोटो असल्याचे ती सांगत आहे आणि तरुणांनी फसवत आहे.

वरील चारही बनावट फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंटची बारकाईने पाहणी केल्यानंतर, त्याचबरोबर या चारही अकाउंटच्या फॉलोअर्सची पाहणी केल्यानंतर, त्याची बोलण्याची भाषा पाहिल्यानंतर, हे चारही बनावट अकाउंट्स ही एकच व्यक्ती चालवत असल्याचं, स्पष्ट  होत आहे. शिवाय या अकाऊंडवरून वैभव बजबळकर हा आमचा पाहुणा असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रियंका कर्चे ही माझी मावस बहीण असल्याचे, स्वतः वैभव बजबळकरने गावातील तरुणांना सांगितले आहे.  त्यामुळे हे चारही अकाऊंट वैभव बजबळकर हाच तरूण चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वैभव बजबळकर हा तरूण आपल्याच गावातील तरूणाची विनाकारण का बदनामी करत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र दुसरीकडे पिंपरीतील पिडीत तरूण या प्रकारामुळे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे.

ज्या तरुणाला प्रियंका कर्चे या फेसबुक अकाऊंटवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. त्याच तरुणांना दोन दिवसांनी व्हॉट्सॲपवरून देखील चॅटिंग करण्यात आली “तुला मी पोलीस मित्र ओळखपत्र काढून देतो, त्यासाठी पैसे दे” असंही म्हणाला. तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. हा प्रकार जवळपास ३० तरुणांसोबत घडला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियाचा वापर हा दुधारी तलवारी सारखा आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर वेगवेगळ्या कंटेंटच्या माध्यमातून अनेकजण लाखो रुपये कमावतात. मात्र दुसरीकडे सोशल मीडियाचा असाही घाणेरडा प्रकार घडत असल्याचे पाहायला मिळते. पोलिसांनी अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत, अन्यथा अशा महाशयांकडून भविष्यात मोठा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस या प्रकरणाची चौकशी करतीलच मात्र, सोशल मिडियाचे वापरकर्ते म्हणून, आपण देखील याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. जर आपल्या सोबत असा प्रकार घडला असेल तर, गप्प बसून अजिबात अशा लोकांना खतपाणी घालू नका.  अशा प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत. आम्ही या प्रकरणासंदर्भात अनेक पिडीत तरुणाशी संपर्क केल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली.

पिडीत अनेक तरुणांनी या विषयी माहिती देताना, आमची नावे कुठे येऊ देऊ नका, असं सांगितल्याने आम्ही याविशी प्रायव्हसी जपली आहे. मात्र हे सांगत असताना यांनी आपल्यासोबत केलेल्या चॅटिंगचे अनेक  स्क्रिन शॉट पाठवले आहेत. एका तरुणाने या प्रकरणाविषयी बोलताना सांगितले, “मी यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. एकवेळ आत्महत्या देखील करण्याचा विचार माझ्या मनात आला होता” मात्र माझ्या मित्राने मला यातून बाहेर काढले” असाही धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.

समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या नांग्या वेळीच ठेचल्या गेल्या नाहीत, तर या नीच प्रवृत्तीच्या भामट्यांना आणखीच प्रोत्साहन मिळेल, आणि कायद्याचा धाक यांना राहणार नाही. हे असंच गुन्हे करत, तरुणांची बदनामी करून मानसिक त्रास देतं राहतील. पोलीसांच्या नावानेच अकांऊट काढून जर तरुणांना मानसिक त्रास देण्याचं काम होत असेल तर, हे खूप गंभीर आहे. या प्रकरणामुळे पोलिसांची देखील विनाकारण बदनामी होत आहे.

हेही वाचा: Maharashtra Budget 2022: शेतकऱ्यांसाठी २३ हजार कोटींची तरतूद; वाचा कोणत्या योजनेतून काय काय मिळणार 

Samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या या फोनने बाजारात केलाय कहर 

Flipkart चा धमाका: Samsung redmi सह अनेक स्मार्टफोनवर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल.. 

पाकिस्तानचा एक माठ्या भारतीय तरुणीच्या प्रेमात वेडा होऊन चालत चालत आला भारतात, पण झाले भलतेच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.