पाकिस्तानचा एक माठ्या भारतीय तरुणीच्या प्रेमात वेडा होऊन चालत चालत आला भारतात, पण झाले भलतेच..

0

प्रेमात बरेच लोक काहीही करायला एका पायावर तयार असतात. आता पाकिस्तानचा मुलगा आणि भारतातील मुलगी असेल तर सानिया मिर्झा आणि शोयब मलिक यांच्या एवढी सोपी ही प्रेमकहाणी नक्कीच नसेल. सडक्या वृत्तीच्या पाकिस्तानातील एक तरूण मुंबईला येण्यासाठी निघाला. त्याचे घर सीमाभागापासून जवळपास ४० किमी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे.

 

मुंबईतील एका 20 वर्षीय तरुणीचे पाकिस्तानच्या 21 वर्षांच्या मोहम्मद आमिरची तिचे लॉकडाऊन मध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. हा पाकिस्तानातील तरूण तरुणीला भेटण्यासाठी उतावळा झाला होता. हे दोघे एकमेकाच्या जवळपास 10 महिन्यांपासून प्रेमात पडले होते. मुलीसोबत लग्न करण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणाला मात्र बीएसएफने बेड्या ठोकल्या.

 

त्याचे नशीब चांगले सडक्या वृत्तीच्या पाकिस्तानप्रमाणे आपल्या सुरक्षा यंत्रणांनी म्हणून त्याच्यावर डायरेक्ट गोळीबार केला नाही. हा तरूण 4 डिसेंबर रोजी भारताच्या हद्दीत घुसला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो उतावळा झाला होता. त्याने अवैधरित्या सीमा पार केल्यानंतर त्याला मुंबई गाठायची होती.

 

राजस्थानमार्गे अवैधरित्या भारतात राजस्थानच्या श्री गंगानगर भागातील अनुपगढ सेक्टरद्वारे बॉर्डर पार करून तो भारतात आला. भारतात आल्यानंतर आता आपण आपल्या प्रेयसीला भेटायचे असा मनसुबा त्याने आखला होता. परंतु घडले भलतेच त्याला सुरक्षा यंत्रणांनी बेड्या ठोकल्या व त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्याची कसून चौकशी करण्यात आली.

 

तरुणाने दिलेल्या पत्त्यावर तरूणी सापडली नाहीच: पाकिस्तानी तरूण आमिरने दिलेली माहिती योग्य आहे की अजून कुठल्या कारणासाठी तो भारतात आला आहे हे पडताळून पाहण्यासाठी राजस्थान पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झाले. तरुणाने दिलेल्या पत्त्यानुसार तरुणीचे घर कांदिवलीत होते. परंतु त्या ठिकाणी ती तरुणी सापडली नाही. तिचे कुटुंबीय दुसरीकडे वास्तव्यास गेले होते. त्यामुळे तरुणीचा पत्ता शोधून काढण्यासाठी पोलिसांना २४ तास लागले.

 

पोलिस मुलीचा पत्ता शोधून काढल्यानंतर मुलीची चौकशी करण्यात आली. त्या प्रेयसी तरुणीने पोलिसांना माहिती दिली, की पाकिस्तानच्या आमिरशी तिची ओळख लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर झाली होती. त्या दोघांमध्ये बरेच महिने चॅटिंग सुरु होती. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघांनीही एकमेकांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

 

तब्बल 1300 किमी अंतर पायी चालत मुंबईला येण्याची केली होती तयारी: पाकिस्तानवरून मुंबईला चालत येण्याची तयारी त्याने केली होती. सबंधित तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत गरीब आणि हलाखीची आहे. गरिबीमुळे त्याला शालेय शिक्षणसुध्दा पूर्ण करता आले नसल्याचे त्याने चौकशीत सांगितले. त्याने कुटुंबातील कोणालाही आपण कुठे निघालो आहे हे सांगितले नाही. आमिरकडे कुठलेही संशयास्पद हत्यारं सापडली नाहीत. त्याला पाकिस्तानला पाठवण्याची तयारी सुरु आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.