पंजाब,गोवा, उत्तराखंडसह यूपीतही काँग्रेसचीच सत्ता? वाचा काय म्हणतायेत एक्झिट पोल..

0

पाच राज्यांच्या विधानसभा निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी पाच राज्यात कसं सत्ता चित्र असेल, हे जाहीर केलं असलं, तरी प्रत्यक्षात अचूक निकाल हा दहा तारखेलाच पाहायला मिळणार आहे. या सर्वेकडे दुर्लक्ष करता येणार नसलं तरी, जाहीर करण्यात आलेल्या सर्वेत मोठे ऊलटफेर होणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका बीजेपीसाठी खूप आव्हानात्मक असल्याचं बोललं गेलं. भारतीय जनता पार्टीने देखील या पाचही राज्यात मोठ्या ताकतीने निवडणूक लढवल्याचं पाहायला मिळालं. मात्र या पाचही राज्यांमध्ये बीजेपी फारसं यश मिळवू शकणार नसल्याचे, अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. परंतु दुसरीकडे काही मतदानोत्तर चाचण्यांनी केलेल्या सर्वेत बिजेपीलाच यश मिळणार असल्याचं म्हटल्याने, निकालाची उत्सुकता आणखीनच वाढल्याचे चित्र आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक प्रचाराचा विचार केला तर, भारतीय जनता पार्टीने विकास, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत ध्रुवीकरणावर जास्त भर दिल्याचे दिसून आले. काही ठिकाणी मूळ प्रश्न बाजूला सारत मतदारांनी देखील या प्रश्नाला महत्त्व दिल्यास दिसून आलं. भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक खूप मोठी मानली जाते आहे. या राज्याचा विचार केला तर, मतदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेची संधी दिली नाही.

पाचही राज्यांमध्ये महागाई, बेरोजगारी, विकास, याच मुद्यांवर निवडणूक झाल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. मात्र जर असं असेल तर, देशात बेरोजगारी आणि महागाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचा फटका आपोआपच बीजेपीला बसणार हे निश्चित आहे. मात्र सध्या सादर केलेल्या एक्झिट पोलवरून असं दिसत नाही. मात्र दुसरीकडे “एक्झॉट पोल” सर्वेचा ‘एक्झिट पोल’ भाजपच्या मनात धडकी भरवणारा आहे.

एकीकडे सर्वच माध्यमांनी पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार बहुमताने येणार असल्याचे म्हटले आहे. पाचही राज्याच्या निवडणुकांमध्ये पंजाबची निवडणूक काँग्रेससाठी सोपी लढत असल्याचं बोललं गेलं होतं. पंजाबमध्ये काँग्रेस सहज सत्तेवर येईल, असं वाटत असतानाच, आता माध्यमांनी मात्र ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या सर्वेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र दुसरीकडे “एक्झॉट पोल’ सर्वेने पंजाबमध्ये कॉंग्रेसला ६५ ते ७० जागा मिळणार असल्याचं आपल्या सर्वेत म्हटलं आहे.

उत्तराखंडमध्ये देखील भारतीय जनता पार्टीसाठी कठीण आव्हान मानलं जात होतं. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळेल, असा अंदाज अनेकांनी निवडणुकीपूर्वी वर्तवला होता. मात्र अनेक माध्यमांनी सर्वेत भारतीय जनता पार्टीच सत्तेवर येणार असल्याचं म्हंटले आहे. उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांपैकी २६ ते ४६ जागा भाजप जिंकून सत्तेत येणार असल्याचा अनेकांचा सर्वे आहे. मात्र इथे देखील “एक्झॉट पोल” सर्वेने ३८ ते ४२ जागा काँग्रेसला मिळणार असल्याचं आपल्या सर्वेत सांगितले आहे.

उत्तर प्रदेश नंतर सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या गोव्याची विधानसभा निवडणूक देखील चुरशीची झाली आहे. अनेकांनी गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. मात्र, ‘एक्झॉट पोल’ सर्वेने गोव्यात देखील काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आपल्या आपल्या सर्वेत म्हटलं आहे. काँग्रेसला गोव्यात 22 ते 25 जागा मिळणार असल्याचा सर्वे त्यांनी सादर केला आहे.

अनेकांनी मणिपूरमध्ये भाजप ६०पैकी तब्बल तीस ते ४० जागा जिंकून सत्तेवर येईल असे म्हंटले आहे. मात्र ‘एक्झॉट पोल’ सर्वेने मणिपूरमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं म्हंटले आहे. भारतीय जनता पार्टीला मणिपूरमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, मात्र स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मणिपूरमध्ये काँग्रेसला १५ ते १८ जागा मिळणार असल्याचं या सर्वेत सांगितले आहे.

देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 विधानसभेच्या जागांवर मतदान झालं. भारतीय जनता पार्टीसाठी उत्तर प्रदेश मोठं आव्हान मानलं जात होतं, मात्र अनेकांनी केलेल्या सर्वेत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच स्पष्ट बहुमताने उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर येणार असल्याचं, म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीपेक्षा अखिलेश यादव यांच्या सभेला तुफान गर्दी होत होती. महागाई बेरोजगारी विकास, शेतकरी आंदोलन आणि कोरोणाची परिस्थिती पाहता, उत्तरप्रदेशमध्ये सत्ताबदल होणार हे निश्चित मानलं जात आहे.

मात्र अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी बीजेपी२४० जागा जिंकेल असे सांगितले आहे. तर अखिलेशच्या समाजवादी पार्टीला १५० जागा मिळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं आव्हान देणाऱ्या काँग्रेसला, या राज्यात दोन अंकी आकडाही गाठता येणार नसल्याचं म्हंटले आहे. तर एक्झॉट पोल सर्वेने मात्र, उत्तर प्रदेश निकालाचा अंदाज अजून वर्तवला नसून, आज संध्याकाळ साडेसहा वाजता ते आपला सर्वे जाहीर करणार आहेत.

हे देखील वाचा- Video: इंदुरीकर महाराज पुन्हा बरळले; “माझ्या जीवावर कोट्याधीश झाले, त्याची पोरं होणार..,” काय आहे प्रकरण पहा व्हिडिओ..

Skin Care: उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण कसं कराल? तुळशीच्या पॅकने दिसाल ताजे तरुण; अशी करा कृती..

Maruti Suzuki: मारुती सुझुकीचा धुमाकूळ; swift WagonR सह या गाड्यांवर पन्नास हजारापर्यंत सूट! वाचा सविस्तर

या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.