पोलिसांच्या हालचाली वाढल्या; राणे पिता पुत्रांबरोबर भाजपच्या या बड्या नेत्यालाही संध्याकाळपर्यंत होणार अटक..

0

सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियानचा मृत्यू होऊन दोन वर्ष उलटले तरी देखील दिशाच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा संबंध असल्याचा अप्रत्यक्ष टोला लगावताना राणे सातत्याने पाहिला मिळतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत दिशा सालियानवर बलात्कार होऊन तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. आता याच विधानामुळे नारायण राणे चांगलेच अडचणीत आले आहेत. नारायण राणे आणि नितेश राणे यांना आता केव्हाही अटक होऊ शकते, असे देखील बोललं जात आहे. एकीकडे नारायण राणे यांनी बलात्कार होऊन हत्या झाल्याचं म्हटलं, मात्र दुसरीकडे दिशाच्या आईवडिलांनी याचे खंडन केले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दिशा सालियानचे आई-वडील म्हणाले, आमच्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आम्ही पाहिला आहे. पोलिसांनी आम्हाला काय झालं होतं याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आमच्या मुलीवर बलात्कार झाला नव्हता, याचे मेडिकल रिपोर्ट देखील आम्ही पाहिले आहेत. आमच्या मुलीला आणि आम्हाला विनाकारण बदनाम आणि त्रास देण्याचे काम सुरू असल्याने, आम्ही व्यथित झालो आहोत. चुकून काही आमच्या जीवाच बरं वाईट झालं तर, त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असणार असा त्यांनी अप्रत्यक्ष नारायण राणे यांना इशारा दिला होता.

नारायण राणे यांनी केलेला दावा खोटा असल्याचं दिशाच्या आई-वडिलांनी म्हटल्यानंतर, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगास पत्र लिहून राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील मालवणी पोलिसांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता या प्रकरणासंदर्भात मालवणी पोलीसांनी रूपाली चाकणकर यांना अहवाल सादर केला असून, नारायण राणे यांनी केलेलं हे वक्तव्य चुकीचं बदनामीकारक असल्याचे म्हंटले आहे.

मालवणी पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल राज्य महिला आयोगाला मिळाल्यानंतर, राज्य महिला आयोगाने आता नारायण राणे यांच्यावर त्याचबरोबर नितेश राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील 24 तासात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मालवणी पोलीसांना दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालवणी पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल देखील केला आहे.

नारायण राणे यांनी दिशा सालियनवर बदनामीकारक केलेल्या वक्तव्यामुळे ते आता चांगलेच अडचणीत आल्याचे, पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या बदनामीकारक वक्तव्याचा प्रसार केल्याबद्दल नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा-.     स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात सोडले साप; पुढे काय झालं? पहा व्हिडिओ…

शिवसेनेच्या अडचणी वाढल्या, दोन दिवस उलटून गेले तरी अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरूच; वाचा काय काय सापडलं..

अमृता फडणवीसांना अपशब्द वापरणाऱ्या नेत्याला चित्रा वाघ यांनी आई-माय वरून केली शिवीगाळ…

पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा! नाना पटोले आणि बच्चूकडू ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं उघड; गृहमंत्री म्हणाले

व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा पहाच…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले..

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.