पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा! नाना पटोले आणि बच्चू कडू ‘ड्रग्ज’ रॅकेट चालवत असल्याचं उघड; गृहमंत्री म्हणाले..,”

0

एकीकडे नवाब मलिक अटक प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत देखील देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचं बोललं जात आहे. २०१७/१८ ला पुण्याच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये ड्रग्जचे व्यसन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले. आणि चक्क अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅप केले. अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या धक्कादायक प्रकाराची माहिती मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. दिलीप वळसे पाटील म्हणाले, सार्वजनिक सुरक्षा, दहशतवादी कारवाया त्याचबरोबर शत्रूराष्ट्राशी चाली समजण्यासाठी,अमली पदार्थांच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी, संवेदनशील गुन्ह्यांची उकल व्हावी केवळ याच प्रकरणात फोन टॅपिंग करता येत असते. मात्र माजी पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत नेत्यांचे फोन टॅपिंग केले.

पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये ड्रग्जचे व्यसन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे रश्मी शुक्ला यांनी सांगत, या प्रकरणाची उकल करण्यासाठी एक रॅकेट सुरू असल्याचे सांगितले. आणि चक्क बड्या बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार संजय काकडे माजी आमदार आशिष देशमुख या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला असून, आता याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

विशेष म्हणजे, हे फोन टॅपिंग करत असताना रश्मी शुक्ला यांनी या नेत्यांना टोपण नावे देखील दिली होती. नाना पटोले यांचं नाव अमजद खान ठेवण्यात आलं होतं. बच्चू कडूचे निजामुद्दीन बाबू शेख, असं नाव ठेवलं होत. तर संजय काकडे यांना तरबेज सुतार असं संबोधलं जायचं. अशी माहिती रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग संबंधित अधिकाऱ्यांना सांगून फोन टॅपिंगची परवानगी मिळवली होती, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे महाविद्यालयात सुरू असलेलं हे ड्रग रॅकेट म्हणजे, आंतरराष्ट्रीय कट असल्याचं तत्कालीन पुणे आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सगळ्यांना भासवले. वास्तविक पाहता रश्मी शुक्ला यांनी टेलिग्राफ कायद्याचा भंगच केला. अशी माहिती, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा आणि या प्रकणासंबंधी माहिती पुणे पोलिसांनी परिपत्रक काढून दिली असल्याचं, दिलीप वळसे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील या बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग हे कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणासाठी केले, आणि त्याचा उपयोग कोणाला झाला, याचा अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत. तपासानंतर सगळं पुढे येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत त्यांनी यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही असं देखील म्हटलं. या प्रकरणाची चौकशी पुणे पोलीसच करणार की, यासाठी विशेष काही पथक नेमणार, हे देखील आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजेल, असंही गृहमंत्र्यांनी सांगितले.

हे वाचलं का?  व्हिडिओ: टोमणे मारण्यात पटाईत असणाऱ्या पुणेकरांची अजित पवारांनी एकदम खरडपट्टीच केलीय; एकदा ऐकाच…

तास उलटून गेले तरी अजूनही छापेमारी सुरूच; इन्कम टॅक्सच्या हाती काय काय लागलं? किशोरी पेडणेकर अडचणीत…

केंद्र आणि राज्य संघर्षावर बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाने खळबळ; नरेंद्र मोदी म्हणाले…

मराठा आरक्षण आणि उपोषणावरून संभाजी राजेंची अजित पवारांनी उडवली खिल्ली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..

अजित पवार संभाजीराजे यांना उद्देशून म्हणाले..”घे पायतान अन् मार माझ्या डोक्यात” पहा व्हिडिओ…

प्रेयसीला लॉजवर बोलवून तरुणाने केलेल्या कृत्याने देशभरात खळबळ; वाचून तुम्हीही…

पशुसंवर्धन विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शेळी पालनासाठी तब्बल एवढे अनुदान, ‘असे’ मिळवा अनुदान…

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी करण्यासाठी घेतला हा निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.