‘युक्रेन’मध्ये अडकलेल्या, सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची विशेष सोय; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

0

रशियाने युक्रेनवर काल हल्ला केला असून, युद्धाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आता समोर येऊ लागले आहे. नागरिक प्रचंड घाबरलेले असून, आता शहरं सोडत असल्याचे चित्र समोर येऊ लागलं आहे. युक्रेनच्या सर्वच शहरांमधून बाहेर पडण्यासाठी वाहनांच्या रांगा, पोलिसांच्या गाड्या बरोबरच धोक्याचे सायरन, असं चित्र आता सगळीकडेच पाहायला मिळत आहे.

रशियाने युक्रेनची राजधानी कीवमध्ये बॉम्ब हल्ले केल्याने युक्रेन सरकारने ‘कीव’मध्ये असणारे विमानतळही बंद केलं असल्याची माहिती आहे. मुख्य विमानतळ बंद केल्याने भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने युक्रेनमध्ये तब्बल सोळा हजार भारतीय अडकून पडले आहेत. सर्व विमानतळं बंद असल्याने, सरकारला भारतीय नागरिकांना बाहेर काढणं अवघड झाले आहे. मात्र भारत सरकार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करत असल्याचे सांगितले जाते.

अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आता बाहेर येऊ लागेल असून, हे विद्यार्थी चांगलेच घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. या विद्यार्थ्यांचे पालक देखील प्रचंड घाबरले असून, आमच्या मुलांना भारतात आणण्यासाठी सरकारला विनंती करतानाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. युक्रेनमध्ये असणाऱ्या भारतीय नागरिकांना भारत सरकारने आता ‘रस्ते मार्गाने’ बाहेर काढण्याची योजना केली असल्याची माहिती आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने हंगेरी आणि पोलंडच्या बोर्डरवर सरकारची पथके पाठवली असल्याची माहिती, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे. युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत आणि माहिती देण्याकरिता परराष्ट्र मंत्रालयाने २४ तास नियंत्रण कक्ष तयार केला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

सोलापूरचे जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी देखील युक्रेनमध्ये अडकलेले सोलापूरचे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ईमेल आणि दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर एक वेबसाईट देखील तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक: जिल्हा नियंत्रण कक्ष,दूरध्वनी 0217-2731012; मेल rdcsolapur@gmail.com ddmo.rfsol-mh@gov.in

हेही वाचा-.  नवाब मलिक कधीच महसूल मंत्री झाले नाहीत,मग ईडीने महसूल मंत्री असताना घोटाळा झाला असं का म्हटलं? शरद पवार आक्रमक…

अकेला फडणवीस क्या करेगा.., सुप्रिया सुळेंनी असं कशाला म्हणायचं? झाला ना करेक्ट कार्यक्रम,आता भोगा फळं; राजकारण पेटलं..

राष्ट्रवादीनंतर ईडीचा शिवसेनेला दणका; शिवसेनेच्या या नेत्यावर धाड, संध्याकाळी होणार अटक..

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमांवर मोदी सरकारने चोळले मीठ; दर कमी व्हावा म्हणून घेतला हा निर्णय..

उत्तमराव जाकर करणार माळशिरसचा कायापालट; ‘अशी’ होणार जलक्रांती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.