‘वाइन’विक्री विरोधात अण्णा हजारेंची आमरण उपोषणाची घोषणा; सरकारने उचललं ‘हे’ पाऊल

0

राज्य मंत्रिमंडळाने गेल्या काही दिवसांपूर्वी किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करणार असल्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. पक्षाबरोबरच काही संघटनांनी देखील सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील या निर्णयाचा विरोध केला असून, आमरण उपोषण करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अण्णा हजारे यांनी स्मरणपत्राद्वारे वाईन विक्री संदर्भात आपली भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. किराणा आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा घेतलेला हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून, या निर्णयामुळे राज्यातले अनेक युवक आणि लहान मुले देखील व्यसनाधीन होउ शकतात. फक्त लहान मुलेच नाही, तर महिलांनासुद्धा या किराणा दुकानात होणाऱ्या वाइन विक्रीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो.

युवाशक्ती ही आपली राष्ट्रीय शक्ती आहे. किराणा मालाच्या दुकानात जर वाईन विक्री केली तर, युवाशक्ती बरबाद होऊ शकते. आणि म्हणून युवा शक्ती बरबाद करू पाहणाऱ्या, या निर्णयाचा विरोध केल्याशिवाय पर्याय नाही. वाईन म्हणजे ‘दारू’ नाही असं सरकार कडून सांगण्यात आलं. असा युक्तिवाद करणं हे खूप दुर्दैवी आहे. वरीर गोष्टींचा सरकारने अजिबात विचार केल्या केला नसल्याचं, स्पष्ट जाणवून येत आहे. सरकारने फक्त आपला महसूल गोळा व्हावा, वाइन उत्पादक आणि विक्रेते, यांच्याच फायद्याचा विचार करून हा निर्णय घेतला, असल्याचं अण्णा हजारे यांनी या स्मरणपत्रात म्हटलं आहे.

राज्य सरकारने वाइन विक्रीच्या घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध राज्यातील अनेक घटकांमधून विरोध दर्शवण्यात येतं आहे. महाराष्ट्र राज्यात 36 जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मला वाइन विक्री विरोधात, विरोध दर्शविल्याचे मला पत्राद्वारे कळवले आहे. एवढंच नाही तर बिगर राजकीय सामाजिक संघटना देखील आमच्याकडे येत आहेत. चर्चा करत आहे. या संघटणांनी देखील राज्यभर आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे.

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरणपत्र लिहिताना म्हटले आहे, यापूर्वी देखील मी या विषयावर आपणास दोन पत्रे पाठवली आहेत. आपणाकडून काहीही उत्तर मिळाले नाही. देशाचे पंतप्रधान देखील पाठवलेला पत्राला उत्तर देत नाहीत. आणि आता आपण देखील केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर देत नाही. मी कधीच वैयक्तिक विषयासाठी पत्रव्यवहार केला नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरी देखील सरकार उत्तर देणे टाळत असेल तर, सरकारला जनतेच्या हिताचं काहीही देणं-घेणं नाही, असा त्याचा अर्थ होतो.

हे वाचा‘वाघ’पैसे खातो आणि’वाघिणीला’नेऊन देतो,मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची औलाद! असं ‘राष्ट्रवादी’ का म्हणाली? वाचा सविस्तर

राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावना लक्षात घेतल्या तर, राज्य सरकारने वाइन विक्रीचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची इच्छा असल्याचे दिसून येते. वरील सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने जर ‘वाइन’ विक्रीचा आपला निर्णय मागे घेतला नाही, तर मात्र आंदोलन करावेच लागेल. असा इशारा अण्णा हजारे यांनी या स्मरणपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. लवकरच राज्यातील समविचारी सामाजिक संघटनांची एक बैठक राळेगणसिद्धी या ठिकाणी घेण्यात येईल. आणि पुढची दिशा ठरवली जाईल. असं अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हे वाचा- तिन्हीं पिता-पुत्रांचा शिवसेनेने कसा करेक्ट कार्यक्रम केला?निलेश राणेंनाही या कारणामुळे खावी लागणार जेलची हवा…

वाहन विक्री विरोधात अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला आपला निर्णय मागे घेण्यासाठी 14 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. जर 14 तारखेपर्यंत राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर अण्णा हजारे “आमरण उपोषण” करणार आहेत. अण्णा हजारे यांनी “आमरण उपोषण” करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आता राज्य सरकार चिंतेत असून, यासंदर्भात लवकरच बैठक बोलावून निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- ‘सैराट’फेम तानाजी गलगुंडे रस्त्यावर कोथिंबीर विकताना झाला कैद

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.