तिन्हीं पिता-पुत्रांचा शिवसेनेने कसा करेक्ट कार्यक्रम केला?निलेश राणेंनाही या कारणामुळे खावी लागणार जेलची हवा…

0

ठाकरे आणि राणे हा वाद आता राजकीय वाद राहिला नसून तो एक वयक्तीक वाद झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पाहत असल्याचे दिसून येत आहे. राणे कुटुंबीय सातत्याने ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका करताना वारंवार दिसून आल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र या टीकेमुळे राणे कुटुंब वेळोवेळी कायद्याच्या कचाट्यात सापडत, असल्याचे पाहून शिवसेनेने देखील त्यांचा वेळोवेळी कॅरेक्टर कार्यक्रम केल्याचे दिसून येत आहे. आणि आज आपण शिवसेनेने तिन्हीं पिता पुत्रांचा वेळोवेळी कसा करेक्ट कार्यक्रम केला तेच पाहणार आहोत.

ठाकरे आणि राणे हा वाद आता राजकीय वाद राहिला नसून, तो एक वयक्तीक वाद झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पाहत आहे. 2005 साली शिवसेनेने नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेचेत मोठी दरी निर्माण होत गेली. मात्र शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर देखील नारायण राणे शिवसेनेवर कधी फारशी टीका करताना दिसून आले नाहीत.

2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री हा आमचाच होणार असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी झाली. आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर, भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केलं. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री फक्त शिवसेनेवर टीका करण्यासाठीच केलं असल्याचं विरोधकांकडून बोललं जाऊ लागलं.

नारायण राणे यांना शिवसेनेवर हल्लाबोल करण्यासाठीच केंद्रीय मंत्री केलं असल्याचं, पुढे नारायण राणे यांच्या काही वादग्रस्त विधानावरून स्पष्टही होत गेल्याचं पाहायला मिळाले. नारायण राणे हे ठाकरे कुटुंबावर, शिवसेनेवर टीका करताना, वारंवार पातळी सोडताना पाहिला मिळाले. मात्र राणेंनी जेव्हा-जेव्हा पातळी सोडली, तेव्हा-तेव्हा शिवसेनेने देखील, राणेंना कायद्याचा हिसका दाखवत त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं पाहायला मिळालं.

स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले होते, देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आहे, हे उद्धव ठाकरेंना माहिती नाही‌? मी असतो तर कानाखाली वाजवली असती. नारायण राणेंच्या विधानानंतर राज्यात शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. फक्त आंदोलनच नाही, तर शिवसेनेने नारायण राणे यांना कायद्याच्या कचाट्यात पकडत जेवत्या ताटावरून अटक देखील केली होती. नारायण राणे यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊन, त्यांना एक दिवस जेलची हवा देखील खावी लागली होती. नंतर त्यांनी जामीन अर्ज केला. अशाप्रकारे शिवसेनेने राणेंचा पहिला करेक्ट कार्यक्रम केला.

नारायण राणे नंतर आता दुसरा करेक्ट कार्यक्रमाची संधी शिवसेनेला स्वतः नितेश राणे यांनीच दिली. अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या पायरीवर बसून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना, म्याव-म्याव असा आवाज काढला, आणि स्वतःलाच जेलचं आमंत्रण दिलं असल्याचं बोलतं जाऊ लागलं. एकीकडे संतोष परब हल्ला प्रकरण सुरू असतानाच, नितेश राणे यांनी म्याव-म्याव असा काढलेला आवाज शिवसेनेचा चांगलाच लक्षात राहिला.

आता आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते,याची चाहूल लागल्यानंतर नितेश राणे स्व:ताच नॉटरिचेबल झाले. एक दिवस अगोदर सभागृहाच्या पायर्‍यांवर बसून तोरा मिरवणारे नितेश राणे कुठल्या बिळात लपून बसलेत? अशा चर्चा राज्यात रंगू लागल्या. सुरुवातीला सत्र न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. नितेश राणे यांचा जामीन सुप्रीम कोर्टाने देखील फेटाळला, मात्र त्यांना थोडासा दिलासा दिला.

संतोष परब हल्ला प्रकरणाच्या चौकशीसाठी आपल्याला अटक होणार असल्याचं, लक्षात आल्यानंतर नितेश राणे स्व:ता न्यायालयाला शरण आले, आणि आता नितेश राणे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अशाप्रकारे राणे कुटुंबाचा शिवसेनेने दुसऱ्यांदा करेक्ट कार्यक्रम केला. शिवसेनेने राणे कुटुंबाचा दुसऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर, हा कारवाईचा नवा उद्धव ठाकरे पॅटर्न असल्याचं शिवसेनेच्या गोटात बोललं जाऊ लागल्याचं पाहायला मिळू लागलं.

शिवसेनेने राणे कुटुंबाचा दुसऱ्यांदा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर, आता तिसर्‍या करेक्ट कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत शिवसैनिक असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हा तिसरा करेक्ट कार्यक्रम देखील लवकरच पाहायला मिळणार आहे. असंही बोललं जाऊ लागलं आहे. तसं पाहायला गेलं तर, शिवसेनेने राणे कुटुंबाचा तिसरा करेक्ट कार्यक्रम हा जवळपास केलाच आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नितेश राणे न्यायालयाला शरण जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. या गाडीत नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे हे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये नितेश राणे त्यांचे लहान बंधू निलेश राणेंना म्हणत आहेत, अरे.. निलेश जाऊदे.. बोलू दे त्यांना.. वकिलांना बोलू दे… कशाला उगीच… आणि याचीच दखल घेत, शिवसेनेने निलेश राणे यांना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. शिवसैनिकाची मागणी पोलिसांनी देखील मान्य करत, निलेश राणेंवर गुन्हा दाखल केला आहे.

अशाप्रकारे शिवसैनिकांनी आणि उद्धव ठाकरे यांनी गेल्या तीन महिन्यात या तीन्हीं पिता पुत्रांचा आपल्या स्टाइलने करेक्ट कार्यक्रम केला असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. एवढंच नाही तर हा उद्धव ठाकरे यांच्या कारवाईचा नवा पॅटर्न असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे. तिन्हीं राणेंवर आता शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम केला असल्याने, हे तिन्हीं पिता-पुत्र इथून पुढे शिवसेनेवर टीका करताना कशा प्रकारची टीका करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.