‘वाघ’पैसे खातो आणि’वाघिणीला’नेऊन देतो,मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी तुमची औलाद! असं ‘राष्ट्रवादी’ का म्हणाली? वाचा सविस्तर

0

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहत असतात. चित्रा वाघ भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा झाल्यापासून विरोधकांवर अधिक आक्रमकपणे टीका करताना वारंवार पाहिला मिळाले आहे.

दोन दिवसांपासून चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यातील सुरू झालेला वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका गेली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना मेहबूब शेख यांनी पारनेरच्या एका सभेत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

 

शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना म्हटले होते,एका लाचखोर नवऱ्याची बायको आम्हाला नीतिमत्ता शिकवतेय. पहिले आपल्या कुटुंबाला नीतिमत्ता शिकवा,आणि मग आमच्याकडे या. एका लाचखोर नवऱ्याची बायको अशी तुमची ओळख आहे हे विसरू नका.

काय आहे लाचखोर प्रकरण?

‘चित्रा वाघ’यांचे पती ‘किशोर वाघ’ हे मुंबईमधील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये ‘मेडिकल रेकॉर्डर’ या पदावर कार्यरत होते. या पदावर कार्यरत असताना, १९९७ साली एका व्यक्तीच्या भावाचा शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या भावाने पुढे राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार केली. या तक्रारदाराला किशोर वाघ यांनी पंधरा लाखांची भरपाई, त्याचबरोबर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली,असा अर्ज करण्याची सूचना केली होती. आणि याचसाठी किशोर वाघ यांनी तक्रारदाराकडे चार लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

‘किशोर वाघ’यांनी चार लाखांची मागणी केल्यानंतर पुढे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. आणि त्यानंतर एसीबीने ५जुलै २०१६ ला किशोर वाघ यांना रंगेहाथ पकडून अटक केली होती.

आणि म्हणून याच प्रकरणाचा हवाला देत, मेहबूब शेख यांनी म्हटले,वाघ काय खातो तर,वाघ पैसे खातो,आणि वाघीणीला नेऊन देतो. एवढंच नाही तर ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी औलाद’असा देखील घणाघात ‘मेहबूब शेख’यांनी ‘चित्रा वाघ’ यांच्यावर केला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.