‘सैराट’फेम तानाजी गलगुंडे रस्त्यावर कोथिंबीर विकताना झाला कैद

0

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सैराट या चित्रपटातून पदार्पण केलेल्या अनेक नवीन कलाकारांना स्टारडम  मिळाले. परश्या,आर्चीची भूमिका साकारणारे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे दोघेही रातोरात स्टार झाले. तसं पाहिलं गेलं तर, सैराट या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची आपली वेगळी ओळख निर्माण झाल्याचे दिसून आले.

चित्रपट सृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका सामान्य कुटुंबातून आलेल्या,आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांनी आर्ची,परश्या या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली.(Rinku Rajguru and Aakash Thosar)

परशा आणि आर्चीनंतर सैराटमधील लंगड्या (तानाजी गळगुंडे)आणि सल्या (अर्बाझ शेख) या पात्रांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं पाहिला मिळालं होतं.(Tanaji galgunde,)

तानाजी गलगुंडे आणि अर्बाझ शेख(Arbaz Shekh) हे दोघेही सध्या “मन झालं बाजींद” मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले असून ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.

‘सैराट’फेम तानाजी गलगुंडे हा “मन झालं बाजींद” या मालिकेत ‘मुंज्या’ या पात्राची भूमिका साकारतोय. ‘झी मराठी’या वाहिनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘मुंज्या’ म्हणजेच तानाजी गलगुंडेचा शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘मुंज्या’ रस्त्यावर एका अनोख्या अंदाजात कोथिंबीर विकताना पाहिला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाला आहे.

‘मुंज्या'(तानाजी गलगुंडे) दोन्हीं हातांमध्ये कोथींबीरीच्या दोन पेंढ्या घेऊन रस्त्यावर मोठमोठ्याने ओरडून-ओरडून विकताना पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/reel/CTKQ6OqjY1K/?utm_medium=copy_link

कुतमीर घ्या..कुतमीर… दहाला दोन…दहाला दोन..गावरान माल हाय… खाऊन बघा… वास घेऊन बघा..! अशा पद्धतीची गावरान आणि रांगडी भाषा’मुंज्या’ आपल्या व्हिडिओमध्ये वापरताना दिसून येत आहे. मुंज्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडल्याचे देखील पाहिला मिळत आहे.

‘मन झालं बाजींद’ या मालिकेत प्रेक्षकांना राया आणि कृष्णाची प्रेम कहानी पहिला मिळत असून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे मुख्य भूमिका साकारत आहेत.

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.