अश्लीलतेचा कळस; फडणविसांच्या शहरात’नंगा’नाच, तरूण-तरूणी ‘नागडे’ व्हिडिओ व्हायरल

0

बैलगाडी शर्यतीला कोर्टाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याचे पहिला मिळाला. नागपुर मधील ब्राम्हणी गावातही बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. दिवसा बैलगाडी शर्यत तर, रात्री “नंगा नाच” सुरू असल्याच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात ही दुर्दैवी घटना घडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, या घटनेचा तिव्र निषेध केला आहे.

राज्यातल्या अनेक भागातून बैलगाडी शोकीन बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी अनेक भागात पोहोचत असतात. नागपूरमध्ये देखील बैलगाडीच्या शर्यतीचे आयोजन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बैलगाडी शोकीन शर्यत पाण्यासाठी जमा झाले होते. आणि याचाच फायदा घेत दिवसभर बैलगाडी शर्यत, तर रात्री ‘नंगा’नाच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीचा हा ‘नंगा’नाच पाहण्यासाठी शंभर रुपये तिकीट आकारण्यात आलं होतं. तरीदेखील हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन देखील स्थानिक पोलिसांना याची कसलीही माहिती नसल्याने, बावनकुळे यांनी देखील या घटनेत पोलिसांवर शंका उपस्थित केली आहे. मात्र बावनकुळे यांच्या आरोपात काहीही तथ्य नसून, पोलीस उत्तम प्रकारे काम करत असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

तरूण आणि तरुणी या कार्यक्रमात डान्स करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरस झाला असून, या व्हीडिओने अश्लीलतेचा कळस गाठला आहे. स्टेजवर डान्स करता करता तरुणींनी हळूहळू आपले कपडे उतरायला सुरुवात केली. फक्त तरुणीने नाही तर तरुणांनी देखील आपले कपडे उतरून डोळ्याला न पाहवणारा ‘नंगा’नाच सुरू केला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तरीदेखील पोलिसांना याची कसलीही माहिती नसल्याने विरोधकांनी पोलिसही यात सामील असल्याचे म्हटले आहे.

बैलगाडी शर्यतीच्या नावाखाली प्रेक्षकांना गोळा करायचं, आणि रात्री असा ‘नंगा’नाच तिकीट आकारून आयोजित करायचा आणि पैसे कमवायचे. असे किळसवाणे प्रकार ग्रामीण भागात सुरू असल्याचं बोललं जात असून, विरोधकांनी यात पोलिसांना हप्ते जात असल्याचं देखील म्हटलं आहे. मात्र विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करतील, त्यांना तसे आदेश देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.