राष्ट्रवादी पक्षात मनसे स्टाईल चालणार नाही, असा सल्ला अजित पवार यांनी दिला असून एवढंच नव्हे तर..

0

महिनाभरापूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम करून अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. रुपाली ठोंबरे या पुणे मनसेमधील महत्वाचा चेहरा होता. त्यांच्या जाण्याने मनसेला मोठा धक्का बसला. मनसेच्याच काही पदाधिकाऱ्यांना रिकामटेकडे म्हणत त्यांनी स्वपक्षीय नेत्यांकडून आपली कशी गळचेपी होत आहे, हे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.

 

मी मर्दानी स्त्री आहे, मी हार मानणार नाही असे म्हणत त्यानी राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. रुपाली पाटील यांच्या आक्रमकपणे बोलण्यामुळे त्यांना मानणारा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मनसे पक्षातील आक्रमक महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. परंतु सध्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 

शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुण्यामध्ये एका बैठकानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी अजित पवार व रुपाली पाटील यांच्यात भेट झाली. बदलत्या राजकीय स्थिती लोकांशी कसा संवाद ठेवायचा, आपल्या वक्तव्याने समाजातील कुठलाही घटक दुखावला जाणार नाही आणि त्याचे परिणाम आपल्या वाट्याला येणार नाहीत, याकडे लक्ष देण्याबाबत अजित पवार यांनी रुपाली पाटील यांना सूचना केल्याचे विश्वसनीय वृत्त सूत्रांनी दिले आहे.

 

ज्यावेळी मनसेमधून रुपाली पाटील बाहेर पडल्या त्यावेळी रुपाली पाटील यांनी आपला आक्रमकपणा कायम राहील, असा इशारा त्यांच्या विरोधकांना दिला होता. परंतु त्यांची ही मनसे स्टाईल राष्ट्रवादी पक्षात चालणार नाही, असे अजित पवार यांनी रुपाली पाटील यांनी बैठकीदरम्यान सांगितले. त्यामुळे आता पुढे रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षादेश पाळून आपल्या आक्रमकपणावर संयम ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा: मला विचारून लफड केलं का? खासदार नववीत राणाची अश्लील ऑडिओ क्लिप व्हायरल, ऐकून तुम्हीही घालाल शिव्या 

अमोल कोल्हेंची हकालपट्टी नथूराम गोडसेमुळे राष्ट्रवादीत फूट 

फौजीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा घेतला बदला, कोर्टातच दिलशाद हुसेनला संपवला 

भारतीय क्रिकेटमध्ये वादळ; कर्णधार म्हणून केलेली कामगिरी पाहवली नसल्यानेच गांगुलीने कोहलीची हाकलपट्टी केली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.