फौजीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बला’त्कार करणाऱ्याचा घेतला बदला, कोर्टातच दिलशाद हुसेनला संपवला

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर न्यायालयाच्या आवारात लष्करातील एका जवानाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला गोळ्या झाडून ठार मारत बलात्काराचा बदला घेतला आहे. आरोपी दिलशाद हुसेनवर पिडीत तरुणीच्या माजी लष्कर जवान पित्याने गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत या प्रकरणातील आरोपी दिलशाद याचा जागीच मृत्यू झाला आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या निवृत्त लष्करी जवान पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दिलशाद हुसेन याला त्याच्या वकिलाने फोन करून बोलवल्याने न्यायालयामध्ये आला होता. त्याच वेळी बलात्कार पीडित मुलीचे वडील माजी लष्कर जवान भागवत निशाद यांनी दिलशाद हुसेन याच्या डोक्यात परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडली, त्यात तो जागीच ठार झाला.

मृत आरोपी दिलशाद हुसेन याचे पंक्चरचे दुकान होते. गोरखपूरच्या बधलगंज येथील पटनाघाट तिराहा येथे निवृत्त लष्करी जवान भागवत निशाद यांच्या घरासमोर त्याचे हे पंक्चरचे दुकान होते. त्याचे वय २५ वर्ष होते. मृत आरोपी दिलशान हुसेनच्या याच्या दुकानाजवळ माजी लष्करी जवानाच्या घराचे बांधकाम सुरु होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी दिलशाद हुसेन याने निवृत्त जवानाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते.

१७ फेब्रुवारी रोजी निवृत्त लष्करी जवान भागवत यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दिलशान याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. १२ मार्च २०२१ रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपी दिलशादला हैदराबाद येथून अटक केली आणि पिडीत अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झालेल्या आरोपी दिलशाद हुसेनची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी दिलशाद हुसेन हा बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी असून तो अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील एका खटल्यासाठी गोरखपूर न्यायालयामध्ये आला होता. मृत आरोपीला गोळ्या झाडून ठार केल्यानंतर त्याच्या वकिलाने न्यायालयाच्या आवारात या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा: अमोल कोल्हेंची हकालपट्टी; नथूराम गोडसेमुळे राष्ट्रवादीत फूट 

मोदींच्या मागची पिडा काही संपता संपेना बेटी पटाओच्या घवघवीत यशानंतर; 

प्रेग्नेंट न राहताही प्रियंका चोप्रा कशी झाली आई? काय आहे सरोगसी वाचा सविस्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.