‘प्रेग्नेंट’ न राहताही प्रियंका चोप्रा कशी झाली आई? काय आहे ‘सरोगसी’ वाचा सविस्तर

0

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी, प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेचा सुप्रसिद्ध कलाकार प्रियंका चोप्राचा पती निक जोनास या दोघांनी एका बाळाला जन्म दिला असल्याचे दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून जाहीर केलं आहे. अनेक चाहत्यांना प्रश्न पडला असेल, प्रियंका चोप्रा अचानक आई कशी बनली? प्रियंका प्रेग्नेंट कधी होती? प्रेग्नेंट न राहता देखील आई बनता येत. अलीकडच्या काळात अनेक जण या पद्धतीचा अवलंब करतात हे अनेकांना माहितीही असेल.

तर मित्रांनो अलिकडच्या काळात आपण ‘सरोगसी’हा शब्द ऐकला असेल. आणि याच्याच जोरावर प्रियंका चोप्राने प्रेग्नेंट न राहताही बाळाला जन्म दिला आहे. सरोगसीच्या माध्यमातून आपण आई झाल्याचं स्वतः प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून जाहीर केलं आहे. आज आपण या लेखात ‘सरोगसी’ हा काय प्रकार आहे? याविषयी माहिती घेणार आहोत. सरोगसी म्हणजे काय? याविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर, हा लेख अवश्य वाचा.

बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांनी गेल्या काही वर्षांपासून लग्न करण्याचा सपाटा सुरू केला आहे. शाहीद मिरा, ,रणविर दीपिका, प्रियंका निक जोनास, अनुष्का विराट, कॅटरिना विकी कौशल, असे अनेक दिग्गज बाहुल्यावर चढल्याचे आपणा सर्वांना माहितीच आहे. यातले अनेक जोडपे आई-वडील देखील झाले आहेत. यात आता बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्राची देखील भर पडली असून, तीही आई झाली आहे.

                         काय आहे सरोगसी?

तसं पाहायला गेलं तर, ‘सरोगसी’ या शब्दाचा अर्थ गर्भाशय भाड्याने देणे असा होतो. परंतु आपण आणखी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर एखादी महिला गर्भधारणा करण्यासाठी इच्छुक नसेल, किंवा असमर्थ असेल तर, दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात आपलं मुलं वाढवले जाते, या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. पतीचा शुक्राणू आणि पत्नीच्या बीजांड यांच्या मिलनातून तयार झालेला भ्रूण मदरच्या म्हणजेच इतर महीलेच्या गर्भाशयात सोडला जातो, आणि नऊ महीने हा गर्भ सरोगेटच वाढवते. यालाच सरोगसीद्वारे बाळाला जन्म दीला असं म्हटलं जातं.

प्रियंका चोपडा निक जोनास या दोघांनी २०१८मध्ये आपला सुखाचा संसार थाटला. आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असणाऱ्या निक जोनसशी प्रियंका चोप्राने विवाह केल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले. मात्र कोणाकडेही लक्ष न देता समाजाच्या टीकेचा सामना करत या दोघांनी आपला सुखी संसार उभा केला आणि आज एका गोंडस मुलाला जन्म देखील दिला. काही महिन्यापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर प्रियंका चोप्राने निक जोनास हे नाव काढून टाकल्याने या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे नंतर प्रियंका चोप्रानेच स्पष्ट केले होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.