मला विचारून ‘लफडं’ केलं का? खासदार नववीत राणाची अश्लील ऑडिओ क्लिप व्हायरल, ऐकून तुम्हीही घालाल शिव्या

0

महाविकास आघाडी सरकार आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा एका व्हायरल क्लिपमुळे चांगल्याच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून अपक्ष निवडणूक अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला. आणि याच जोरावर नवनीत राणा यांनी खासदारकी मिळवली.

नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार झाल्यापासून त्या नेहमी बीजेपीला पूरक अशी भूमिका घेत असल्याचे पहायला मिळत आहे. संसदेत देखील नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. खासकरून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नवनीत राणा वेळोवेळी टिका करताना दिसून आल्या आहेत. नवनीत राणा यांच्या या भूमिकेमुळे त्या नेहमी सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहील्याचे पाहायला मिळते.

आता मात्र नवनीत राणा स्वतः अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. एका पिडीत महिलेच्या तक्रारीवरून नवनीत राणा यांना राज्य महिला आयोगालाकडून देखील नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि पीडित महिलेचा ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नवनीत राणा आणि पीडित महिलेच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार नवनीत राणा पिडीत महिलेसोबत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत बोलत असताना पाहायला मिळत आहे. मला फसवणारा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला न सांगता त्याने दुसरं लग्न देखील केलं. आणि आता तो माझा फोनही उचलत नाही. अशी तक्रार त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. मात्र नवनीत राणा यांनी पीडित महिलेची कोणतीही तक्रार ऐकून न घेता, उलट तिलाच सुनावल्याचं पाहायला मिळत आहे.

पिडीत महिलेच्या तक्रारीवर नवनीत राणा म्हणाल्या, तुमच्या विषयात मी काय करू? मला विचारून लफडं केलं का? अशा अर्वाच्य आणि अश्लील भाषेचा वापर केला असल्याने खासदार नवनीत राणा आता चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. महिलेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देखील नवनीत राणा यांना नोटीस पाठविण्यात आली असून, यासंदर्भात राणा यांनी लेखी खुलासा करावा असं देखील राज्य महिला आयोगाने म्हटलं, असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

पिडीत महिलेची फसवणूक करणारा व्यक्ती हा खासदार नवनीत राणा यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याने, त्याबरोबरच पीडित महिलेला अर्वाच्य अणि अश्लील भाषेत सुनावल्याने नवनीत राणा या आता चांगल्याच अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच या संदर्भातली ऑडिओ क्लिपही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नवनीत राणाच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.