भारतीय क्रिकेटमध्ये वादळ; कर्णधार म्हणून केलेली कामगिरी पाहवली नसल्यानेच गांगुलीने कोहलीची हाकलपट्टी केली

0

भारताचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या माध्यमांमध्ये तसेच सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. वन-डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांच्यामध्ये प्रचंड मतभेद असल्याचा क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं. रवी शास्त्री यांनी नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत देखील पुन्हा एकदा विराट कोहली चर्चेत आला आहे.

दुबईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर विराट कोहलीला मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं गेलं. या पराभवानंतर विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये देखील मतभेद असल्याचं पाहायला मिळालं. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीला t20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा न देण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो आपल्या निर्णयावर ठाम होता. असं सौरभ गांगुली म्हणाला होता.

सौरभ गांगुली यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर विराट कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, ट्वेंटी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देताना मला कोणीही राजीनामा देऊ नकोस असं म्हणालं नव्हतं. याउलट मी घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं होतं. धक्कादायक खुलासा विराट कोहली ने केला होता. यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये खासकरून सौरभ गांगुलीमध्ये प्रचंड मतभेद आहेत हे सिद्ध झाले.

वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार पदावरून विराट कोहलीची हाकलपट्टी झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र बीसीसीआयकडून क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार निवडणे योग्य नसल्याचे स्वतः सौरभ गांगुलीने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. वन डे क्रिकेटमधून विराट कोहलीचे कर्णधारपद गेल्यानंतर, विराट कोहलीने साऊथ आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिकेच्या पराभवानंतर आपण कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडत असल्याचं जाहीर केलं.

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार सोडल्यानंतर मात्र, क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. सलग पाच वर्षे कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थानी राहिला. ६८ कसोटी सामन्याचे नेतृत्व करताना तब्बल 40 विजय विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने मिळवले. एवढा मोठा दगड रेकॉर्ड असून देखील विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधार पदाचे न सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. आणि चोरीला हा निर्णय घेण्यास भाग सौरभ गांगुलीने पडलं असल्याचं देखील सोशल मीडियावर म्हटलं गेलं.

विराट कोहली कर्णधार म्हणून कमालीचा यशस्वी झाला. यात सिंहाचा वाटा असणारे कोच रवी शास्त्री यांनी एका माध्यमाला काल मुलाखत दिली. यात रवी शास्त्री यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. विराटच्या कसोटी कर्णधार पदावर भाष्य करताना रवी शास्त्री म्हणाले, विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग पाच वर्षे अव्वल स्थान कायम राखले. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला 68 सामन्यात तब्बल 40 विजय मिळवत याने नवा इतिहास रचला. आणि विराट कोहली चे हेच यश अनेकांना पटलं नाही. विराट कोहलीचा सक्सेस पाहून अनेकांच्या पोटात दुखू लागलं. असा अप्रत्यक्ष टोला रवी शास्त्री यांनी सौरभ गांगुली यांना लगावला असल्याचं बोललं जातंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.