पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड, बँकेचे अध्यक्षपद मिळणार..

0

पवार घराण्याचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत असलेले संभाजी होळकर यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. संभाजी होळकर यांनी इतर मागास प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी प्रचाराला देखील जोरदार तयारी सुरू केली होती. परंतु आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शरद लेंडे यांनी अर्ज मागे घेतल्याने संभाजी होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संभाजी होळकर हे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना बारामतीचे मिनी आमदार म्हणून देखील ओळखले जाते. अजित पवारांना राज्यभरातील व उपमुख्यमंत्री पदाच्या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना बारामती तालुक्याला पाहिजे तेवढा वेळ देता येत नसला तरी अजित पवार यांची कुठलीही कामे रखडत नाहीत.

त्याला कारणही तसेच आहे. अजित पवार यांची सावली म्हणून काम करत असलेले संभाजी होळकर. संभाजी होळकर हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू, अगदी काळजातील म्हटले तरी चालतील असे व्यक्तिमत्व आहे. होळ गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम विभाग सभापती अशी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपद मिळणार?
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा संभाजी होळकर यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते, असा अंदाज बरेच राजकीय क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत. आता अजित पवार जो काही निर्णय घेतील त्यावर पुढील सर्व अवलंबून असल्याचे देखील बोलले जात आहे. सध्यातरी संभाजी होळकर यांचे नाव मात्र चर्चेत आहे आणि अजित पवार म्हणतील तोच निर्णय बँकेत घेतला जातो.

हेही वाचा:महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना दादाची दादागिरी वाटत असली तरी बारामतीकरांना माहितीये आपला दादा कसाय ते.. 

अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे रुपाली चाकणकर नाराज; रुपाली ठोंबरे यांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत.. 

तब्बल सोळाशे किलो वजन असणारा गजेंद्र आहे तरी कोण? सांगलीच्या शिवार कृषी प्रदर्शनात गड्याची चर्चाच चर्चा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.