अजित पवार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे रुपाली चाकणकर नाराज; रुपाली ठोंबरे यांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत..

गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे मनसेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार असल्याच्या चर्चा चांगल्याचं रंगल्याच्या आपल्याला पहायला मिळाल्या होत्या. अखेर गेल्या आठवड्यात मनसेला जय महाराष्ट्र करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या रूपात राष्ट्रवादीला एक आक्रमक चेहरा मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र रूपाली पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नाराज झाल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

गेल्या आठवड्यात 16 तारखेला अजित पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश केला. विशेष म्हणजे मनसेचे नेते राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सगळ्यानीच आश्चर्य व्यक्त केले. मनसेत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसे सोडण्याची अनेक कारणे दिली. पक्षात अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात आहेत, आणि त्यामुळे मला काम करता येत नसल्याचे मुख्य कारण पुढे करत, रूपाली ठोंबरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

अनेक माध्यमांना दिलेल्या विविध मुलाखतीत रुपाली चाकणकर यांनी मनसेच्या नेत्यांविषयी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली होती. एवढेच नाहीतर पक्षांतर्गत असणारे वाद थांबले नाहीत तर मला वेगळा विचार करावा लागेल, कारण अशा वातावरणात मला काम करता येणार नाही, कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. असे देखील दुपारी पाटील ठोंबरे म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. ते माझे दैवत आहेत, ते नेहमी माझ्या रूदयात राहतील, असं देखील रूपाली पाटील म्हणत होत्या.

पक्षात अंतर्गत वादाचे कारण पुढे करत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्या उपस्थितीत रूपाली ठोंबरे यांनी पुण्यात प्रवेश केला. रुपाली ठोंबरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कार्यक्रम पुण्यात होऊन देखील रुपाली चाकणकर यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवली. एवढंच नाहीतर रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छाचा एक मेसेज देखील केला नाही.

त्यातच अजित पवार यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना आमच्यासह सगळ्या सहकाऱ्यांकडून भावाच्या नात्याने मदत केली जाईल. बहिण सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे पुढे चालली आहे, आणि आता रूपाली चाकणकरही ज्याप्रमाणे पुढे चालल्या आहेत, तशाच या रूपाली देखील पुढे जातील, यशस्वीरीत्या वाटचाल करत राहतील. असं अजित पवार यांनी म्हटल्याने, रुपाली चाकणकर या नाराज असल्याचं बोललं जातंय. 

रुपाली पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नसल्याने, या चर्चा अधिक रंगल्याचं बोललं जातंय. रुपाली पाटील ठोंबरे यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पुण्यात मोठ्या जल्लोषात झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाला रुपाली चाकणकर या पुण्यात असून देखील उपस्थित राहिल्या नाहीत, त्यामुळे देखील या चर्चांना उधाण आले आहे. 

रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडे आक्रमक नेता म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना रूपाली पाटील यांनी अनेक यशस्वी आंदोलन पार पडली असल्याने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांचा चाहतावर्ग संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचं पाहिला मिळतं. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडे देखील आक्रमक नेता म्हणून पाहिलं जातं. मात्र आता रुपाली ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशामुळे रुपाली चाकणकर यांचं पक्षातील महत्त्व कमी होणार असल्याचं बोललं जातं आहे‌. आणि म्हणून रूपाली चाकणकर या रूपाली पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर नाराज असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.