तब्बल सोळाशे किलो वजन असणारा गजेंद्र आहे तरी कोण? सांगलीच्या शिवार कृषी प्रदर्शनात गड्याची चर्चाच चर्चा

0

सोशल मीडियाच्या या जमान्यात कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. १६ ते २० डिसेंबर दरम्यान सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याकडून ‘शिवार कृषी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेले हे प्रदर्शन तब्बल ‘दीड टन’ वजनाच्या ‘गजेंद्र’मुळे आता चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे.

२०१४ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दरवर्षी शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील कोरोणाचे नियम पाळत, कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या वर्षी आयोजित केलेले कृषी प्रदर्शन चांगलेच चर्चेत आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमांवर असणाऱ्या ‘मंगसूळी’ या छोट्याशा गावचे शेतकरी ‘विलास नाईक’ यांच्याकडे असणाऱ्या दीड टनाच्या ‘गजेंद्र’ची या शिवार कृषी प्रदर्शनात चर्चाच चर्चा रंगली आहे.

आता तुमच्या मनात अनेक प्रश्न आले असतील,हा गजेंद्र आहे तरी कोण? तर हा गजेंद्र दुसरा तिसरा कोणी नसून, ‘विलास नाईक’ या शेतकऱ्याच्या रेड्याचं नाव गजेंद्र असून त्याचे वजन तब्बल दीड टन आहे. दीड टनाचा हा रेडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात अनेकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. गजेंद्र नावाच्या या रेड्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे.

गजेंद्र नावाच्या रेड्याने, आपल्या सौंदर्याने आणि भल्या मोठ्या शरिराने अनेकांना भुरळ पाडली आहे. काल या रेड्याने तासगाव शिवार कृषी प्रदर्शनात हजेरी लावल्यानंतर, आसपासच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी भली मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले‌. अनेकांनी मोठ्या उत्सुकतेने याच्या खुराक विषयी जाणून घेतले. गजेंद्र नावाच्या या रेड्याचं खुराक जाणून घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

शेतकरी पाळीव प्राणी सांभाळत असताना त्याला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे जपतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. शेतीची मशागत करण्यासाठी शेतकरी बैलजोडीची कमालीची काळजी घेतो. शेतकऱ्यांने सांभाळलेल्या बैलांना देखील त्यांच्याविषयी किती प्रेम असतं, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अनेक वेळा पाहिलंही असेल. तसं पाहिलं गेलं तर, शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह निसर्गावर बऱ्यापैकी अवलंबून असतो. ऐन भरात आलेले पीक अचानक पाऊस हिरावून घेतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

हाच तो गजेंद्र नावाचा रेडा

 

अशा अनेक संकटांमधून देखील शेतकरी आपल्याला उपयोगी असणारे पाळीव प्राणी पोटच्या पोराप्रमाणे जपतो, खायला कमी करत नाही. हे त्यातलं विशेष आहे. विलास नाईक यांनी देखील गजेंद्र नावाच्या रेड्याला एखादा बाप आपल्या पोटच्या पोराला जेवढं खायला घालत नसेल, त्याहूनही अधिक या शेतकऱ्याने हा रेडा सांभाळताना काळजी घेतल्याचे पाहायला मिळते. या रेड्याच्या खुराक विषयी विचार केला तर दिवसाला 15 लिटर दूध, उस, गवत याचं तर काही लिमिटच नाही. जवळपास दिवसाला या रेड्यावर दीड हजार रुपये खर्च त्याच्या खूराकावर होत असल्याचं मालक सांगतात. काही महिन्यापूर्वी हा रेडा तब्बल 80 लाख रुपयाला मागितला होता. मात्र हा घरच्या गिर म्हशीचा असल्याने या शेतकऱ्यांने याला विकला नसल्याचे समजते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.