महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना दादाची दादागिरी वाटत असली तरी बारामतीकरांना माहितीये आपला दादा कसाय ते..

0

अजित पवार म्हटलं की सडेतोड बोलणं, जे मनात ते तोंडात. एखाद्याचं काम होणार असणार तर ते करणार नाहीतर चटकन लगेच सांगून टाकणार हे होऊ शकत नाही बघ. बोलताना आमचा दादा रोखठोक बोलतो त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला दादाची दादागिरी वाटते पण दादा तसा माणूस नाही. अशी प्रतिक्रिया बारामतीचे शेतकरी रावसाहेब चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली.

ते पुढे बोलताना म्हणाले, बऱ्याच लोकांना अजित पवार खटकतात. त्यांनी पण करावं ना दादासारखं काम. बरेच आमदार लोकांसाठी वेळ काढत नाहीत. आमचे दादा उपमुख्यमंत्री असले तरी लोकांसाठी आठवड्यातून एक दिवस वेळ काढतात. त्यांची काम पाहणाऱ्या माणसांना ये हे काम झालंच पाहिजे अशी देखील तंबी देतात. महाराष्ट्रात असे खूप कमी तालुक्यात घडते. असे शेतकरी रावसाहेब चव्हाण म्हणाले.

आमच्या बारामती तालुक्यात दादावर सगळं सोपवून आम्ही मोकळे होतो म्हणूनच अजित दादा विधानसभा निवडणूक लागली की महाराष्ट्रभर प्रचारसभा घेत असतात. परंतु बारामती तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता आपल्या हातात निवडणूक घेतो त्यामुळे दादा फक्त सांगता सभेला बारामतीला येत असतात. म्हणून तर विरोधकांच डिपॉझिट जप्त होत. दादा कामं करतात म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर घेतो. अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही वारंवार वेगवेगळ्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असते. बारामतीच्या विकासाबाबत बोलायचं झालं तर बारामतीला शरद पवारांनी विकासाच रोल मॉडेल बनवलं आहे यात काही दुमत असण्याचा प्रश्नच नाही. त्याचसोबत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न देखील काही भाग वगळता सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे.

हेही वाचा: आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर.. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई, निवडीपुर्वी बंद दाराआड नक्की काय झाले? 

रोहित पवार यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदी लागणार वर्णी, एवढंच नव्हे तर रोहित पवार.. 

२४ पोते कांद्यांची पट्टी केवळ १३ रुपये; या १३ रुपयांत काय शेतकऱ्याने सरकारचा तेरावा घालायचा का..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.