राजेश टोपेंच्या कारनाम्याची ‘आव्हाडां’कडून पुनरावृत्ती; जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली,टोपेंना एवढा माज कशाचा आलाय..

0

आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या आरोग्य भरती परीक्षेचा घोळ कायम असतानाच आता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा मुंबईकडून पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा काल रविवारी अचानकपणे रद्द केल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये रोहित पवार यांचा देखील समावेश आहे. आरोग्य विभाग नोकर भरती पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच, म्हाडाच्या परीक्षांचे देखील पेपर फुटल्याच्या प्रकार घडल्याने आता महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थ्यांना विदेशात आणि परराज्यात परीक्षा केंद्र आल्याने त्याचबरोबर एकाच विद्यार्थ्यांना दोन-दोन हॉल तिकीटं मिळाल्यामुळे आरोग्य विभागाची परीक्षा अचानक रद्द करण्यात आली होती. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसह अनेकांनी संताप व्यक्त केला होता. रद्द झालेली परीक्षा आरोग्य विभागाने 24 आणि 31 ऑक्टोंबर ला पुन्हा घेतली. मात्र यावेळी देखील 31 ऑक्टोंबरला झालेला पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

 

एवढं मोठं प्रकरण होऊन देखील, राजेश टोपे यांनी यावर अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. सुरुवातीला आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली होती, तेव्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षा घेण्यात येणार्‍या ‘न्यासा’ कंपनीने योग्य नियोजन केलं नसल्याचं कारण दिले होते‌. मात्र पुन्हा याच कंपनीला आरोग्य विभाग भरतीचे कॉन्ट्रॅक्ट राजेश टोपे यांनी दिले. संबंधित प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असताना देखील, ३१ ऑक्टोंबरला झालेल्या परिक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही त्यांनी अद्याप काहीही खुलासा केला नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाची होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचं मध्यरात्री आपल्या ट्वीटरवरून सांगितलं. ज्या कंपनीला म्हाडाची परीक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते, त्या कंपनीच्या संचालकानेच पेपर छपाई दरम्यान एक पेपर आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घेतला होता,अशी माहिती पुणे पोलिसांच्या तपासात अमोर आली. आणि म्हणून ही परिक्षा तुर्तास रद्द करण्यात येत असल्याचं काल पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

जर पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असती, तर विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता. हा एक प्रकारे नामुष्कीचा प्रकार झाला असता. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली असल्याचाही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. यापुढे म्हाडाच्या सर्व परीक्षा आता म्हाडा स्वतःच घेईल. कोणत्याही खासगी कंपनीला आता यापुढे हे कंत्राट देण्यात येणार नसल्याचे, जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले.

म्हाडाचे पेपर फुटण्याच्या अगोदरच हे पेपर फुटी रॅकेट पकडल्यानंतरही परिक्षार्थी विद्यार्थ्यांची झालेली तारांबळ, गैरसोय झाल्याने, जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची जाहीरपणे माफी मागितली. एकीकडे आव्हाडांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली आहे, मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षातल्या आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाची परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर पुढे ढकलण्यात आली. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 31 ऑक्टोबरला झाली, मात्र या परिक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तरी देखील आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात काही स्पष्टीकरण दिले नाही.

सुरुवातीला आरोग्य भरती प्रक्रियाचा भोंगळ कारभार समोर आल्यानंतर, पेपरफुटी झाली. यामुळे राजेश टोपे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. विद्यार्थ्यांनी ट्विटरवर रिझाईन ‘राजेश टोपे’ हा हॅशटॅग ट्रेंड देखील केला. विद्यार्थ्यांनी राजेश टोपे यांना सत्तेचा आणि पैशाचा माज आला असल्याचे देखील म्हटलं आहे. आरोग्य विभागाचा एक उच्चपदस्थ अधिकारी पेपर फोडण्यात मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावतो. तरीदेखील या विभागाला कानोकान खबर लागत नाही, याला सर्वस्वी राजेश टोपे जबाबदार असल्याचा अनेकांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: अवघ्या ३३ लाखासाठी गड्यानं आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं उघड; टोपेंचं मंत्रीपद जाणार हे निश्चित 

होय..! देवेंद्र फडणवीस द्वेषाने भरलेला आणि कुजलेल्या विचारांचा माणूस; शरद पवारांना शुभेच्छा न देण्याचं कारण आले समोर 

मोदींच्या आवडत्या अॅकरने चक्क दारू पिऊन अँकरिंग केली; बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना गडी काहीही बरळलाय, ऐकून जाल चक्रावून

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.